पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Tuesday 7 March 2017

जागतिक महिला दिन


   
           
*८ मार्च*
         *जागतिक महिला दिन विशेष*
    *🎀भारतातील विक्रमी महिलेचे नाव🎀*

*⚜01 -इंदिरा गांधी=* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला

*⚜02- विजयालक्ष्मी पंडीत=* संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)

*⚜03 -सी. बी. मुथम्मा =*पहिली महिला राजदूत

*⚜04 -सरोजिनी नायडू =*पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)

*⚜05 -सुचेता कृपलानी =*पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)

*⚜06 -राजकुमारी अमृत कौर=* पहिली महिला केंद्रीय मंत्री

*⚜07 -सुलोचना मोदी =*पहिली भारतीय महिला महापौर

*⚜08 -सावित्रीबाई फुले =*पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका

*⚜09- फातिमाबिबी मिरासाहेब=* भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)

*⚜10- कार्नेलिया सोराबजी =*पहिली भारतीय महिला बॅरिस्टर

*⚜11 -हंसाबेन मेहता =*भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)

*⚜12 -मदर टेरेसा=* नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)

*⚜13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)

*⚜14 -भानू अथय्या=* ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला

*⚜15 -मंजुळा पद्मनाभन =*पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)

*⚜16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी=* विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर

*⚜17- कमला सोहोनी=* केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

*⚜18 -किरण बेदी =*पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)

*⚜19 -कल्पना चावला=* अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)

*⚜20 -बच्चेंद्री पाल=* एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)

*⚜21- संतोष यादव =*दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक

*⚜22 करनाम मल्लेश्वरी=* ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल

*⚜23 -आरती साहा =*इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू

*⚜24- कॅप्टन चंद्रा =*पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला

*⚜25 -संगीता गुजून सक्सेना=* युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर

*⚜26 -उज्ज्वला पाटील-धर=* शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला

*⚜27 -डॉ. अदिती पंत =*अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ

*⚜28 सुरेखा यादव-भोसले=* आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर

*⚜29 -देविकाराणी रौरिच=* दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)

*⚜30 -रिटा फारिया =*पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)

*⚜31 -सुष्मिता सेन=* पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)

*⚜32 -डॉ. इंदिरा =*हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर

*⚜33 -इंदिरा चावडा=* भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी

*⚜34 -शीतल महाजन =*
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.

   **************************************    

* जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला / भगिनींना हार्दिक शुभेच्छा !!!


संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.

No comments :

Post a Comment