पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday, 27 September 2017

भारत देश माहिती

भारत देश माहिती 

▃▃▃     मेरा भारत महान    ▃▃▃▃


आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती
भारताने लावलेले शोध
🔰 बुद्धिबळ
🔰   शून्य
🔰 आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला
🔰  जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे.
🔰 पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
🔰 सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव यासारख्या सर्जरी करायचे.
🔰 योग - ५००० वर्षांपूर्वी
🔰 मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला.
🔰जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
🔰ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात श्रीमंत देश होता.
♦ भारताबाहेर:भारतीय ♦
🔹अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत.
🔸 अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत.
🔹 NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
🔸 Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
🔹 Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
🔰अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता.
🔰 Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो.
🔰दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो.
🔰 जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे.
🔰 जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
🔰जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत.
🔰 हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत.
🔰एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे.
🔰स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे.
🔰. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत.
🔰जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे.
🔰 प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 
👉१८ प्रमुख भाषा,
👉१,६०० द्वितीय भाषा,
👉२९ प्रमुख सण,
👉६,४०० जाती
   आणि उपजाती
👉७ संघराज्य,
👉२९ राज्य,        
👉६ मोठे धर्म,
👉५२ मोठ्या जमाती

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती

महाराष्ट्राबाबत माहिती
स्थापना -  01 मे 1960
राजधानी - मुंबई
राज्यभाषा - मराठी
एकूण जिल्हे - 36
एकूण तालुके -  355
( मुंबई उपनगर मधील अंधेरी बोरीवली कुर्ला ही फक्त शासकीय कामासाठी केलेली 3 तालुके मिळुन 358
 (355 + 3 = 358)
ग्राम पंचायत -  28,813
पंचायत समित्या 355
 एकूण जिल्हा परिषद - 34
आमदार विधानसभा  288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा - 720 किमी
नगरपालिका - 226
महानगरपालिका - 27
27 वी मनपा पनवेल 1oct 2016
शहरी भाग - 45.2 %
ग्रामीण भाग 55 .8 %
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
महाराष्ट्राने देशाचा 9.36 % प्रदेश व्यापला आहे
महाराष्ट्राची घनता 365
देशातील 9.29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते.
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - पुणे  ( 94.3 लाख )
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा - सिंधुदुर्ग (8.50 लाख)
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा
जनगणना 2011नुसार नंदूरबार 64.4 %
2014  पासुन पालघर 57.14 %
MH लिंग गुणोत्तर  - 929
सर्वाधिक रत्नागिरी - 1122
MH बाल लिंग गुणोत्तर - 894
सर्वाधिक पालघर - 967
महाराष्ट्रातील सर्वात जास्त निरक्षर लोक पुणे जिल्ह्यात  (10.71लाख ) आहेत.
अनुसुचित जाती पुणे प्रथम क्रमांकावर
अनुसुचित जमाती नाशिक प्रथम क्रमांकावर
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा - नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर  कळसूबाई (1646मी)
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग - न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर ( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - रत्नागिरी
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
पहिला संपूर्ण डिजीटल     जिल्हा - नागपुर
(Oct 2016)

सणावळ्या

सणावळ्या व ऐतिहासिक घटना

सणावळ्या ऐतिहासिक घटना, वर्षे व स्थळे
* १८२९ : सती बंदीचा कायदा
* १८४८ : महात्मा फुल्यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली.
* १८५६ : विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा.
* १८५७ : मुंबई, चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना
* १८७६ : वासुदेव बळवंत फडके यांचा सशस्त्र उठाव
* १८८५ : राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना.
* १८९१ : विवाह संती वयाचा कायदा.
* १८९२ : कौन्सिल सुधारणा कायदा संत.
* १८९३ : महात्मा गांधी वकिलीच्या कामानिमित्त द.आफ्रिकेत
* १९०० : ङ्कमित्रमेळाङ्क ही क्रांतिकारी संघटना स्थापन.
* १९०४ : अभिनव भारतची स्थापना
* १९०५ : बंगालची फाळणी व रशिया-जपान युद्ध.
* १९०६ : राष्ट्रीय सभेच्या चतुःसूत्रीची घोषणा.
* १९०६ : मुस्लीम लीगची स्थापना.
* १९०६ : बारींद्रकुमार घोष-भूपेन्द्रनाथांचे युगांतर वृत्तपत्र.
* १९०६ : गांधीजीचा द. आफ्रिकेत अन्यायाविरुद्ध सत्याग्रह
* १९०७ : भारतीय राष्ट्रीय सभेत फूट.
* १९०८ : लो. टिळकांना सहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा.
* १९०९ : मोर्ले- िमंटो सुधारणा.
* १९०९ : नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून.
* १९१५ : होरूल लीगची चळवळ.
* १९१५ : गांधींजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले.
* १९१६ : लखनौ करार.
* १९१७ : भारतमंत्री माँटेग्यू यांची घोषणा.
* १९१९ : माँटफर्ड कायदा.
* १९१९ : रौलट कायदा, जालियनवाला बागेतील हत्याकांड.
* १९२० : नागपूर अधिवेशनात असहकार चळवळीस मंजुरी.
* १९२१ : ब्रिटनचे राजपुत्र भारतात आले.
* १९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत  िहंसा
* १९२२ : राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना.
* १९२३ : झेंडा सत्याग्रह.
* १९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनङ्कची स्थापना.
* १९२७ : बार्डोली सत्याग्रह
* १९२७  : मार्च : महाड सत्याग्रह.
* १९२८ : हिंदुस्थान  सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
* १९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
* १९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
* १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
* १९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
* १९३० : एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
* १९३१ : गांधी-आयर्विन करार.
* १९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
* १९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसèया गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
* १९३१ : भगतqसग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
* १९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
* १९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
* १९३२ : सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
* १९३२ : सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
* १९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
* १९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
* १९३६ : ऑगस्ट : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
* १९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
* १९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
* १९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
* १९३९ : सप्टेंबर ३ : दुसèया महायुद्धाला सुरुवात.
* १९३९ :  नोव्हेंबर १ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
* १९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
* १९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
* १९४० : ऑगस्ट १७ : वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
* १९४०  मार्च : राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
* १९४०  मार्च : क्रिप्स मिशन भारतात आले.
* १९४२ ऑगस्ट ८ : ङ्कछोडो भारतङ्कचा ठराव संत.
* १९४३ ऑक्टोबर २१ : आझाद हिंद सरकार स्थापन.
* १९४३  नोव्हेंबर : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
* १९४४  मे : आझाद qहद सेनेने ङ्कमॉवडॉकङ्क हे आसाममधील ठाणे qजकले व भारतीय भूीवर पाय ठेवला.
* १९४५  ऑगस्ट १८ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
* १९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
* १९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
* १९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
* १९४६  : मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
* १९४६  जुलै : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
* १९४६  ऑगस्ट १६ : बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना ङ्कप्रत्यक्ष कृतिदिनङ्क पाळण्याचा आदेश.
* १९४६  सप्टेंबर २ : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार
* १९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
* १९४६  फेब्रुवारी १८ : मुंबई येथील ङ्कतलवारङ्क या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
* १९४७  फेब्रुवारी २८ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
* १९४७  जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा

GIF (Video) इमेज तयार करा

GIF (Video) इमेज तयार करा

व्हाट्सअपमधे GIF (Video) इमेज तयार करा 
1) प्रथम आपले व्हाट्सअप ओपन करून  आपण ज्यांना इमेज पाठवणार आहात त्याचे नाव सिलेक्ट करा.
2) त्यानंतर gallery मधील  विडीओ मधून कोणताही एक विडियो सिलेक्ट करा.
3) आता हा व्हीडीओ सेंड करण्यापूर्वी ६ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी लांबीचा करून घ्या 
4) ज्यावेळी तो ६ सेकंद वा त्यापेक्षा कमी लांबिचा होईल  त्याचवेळी उजव्या कोपऱ्यात वरील बाजूस विडिओ  कॅमेराचे चिन्ह जावून तेथे GIF असे नाव  दिसेल.त्यावर क्लिक करा.
5) विडिओ कॅमेरा चे चित्र जाईल व तिथे GIF असे नाव येईल.
6) आता तुम्ही  ही GIF इमेज सेंड करण्यासाठी  तयार आहे.

आपल्या मोबाइलमध्ये दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल

आपल्या मोबाइलमध्ये  दुसऱ्यांचे Whatsapp कसे सुरु कराल
सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.
आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची  निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.
यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.
उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे।
कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.
यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.
स्त्रोत : whatsapp

Whatasapp Messages save process

व्हाट्सअॅप मेसेज सेव्ह करा

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
Wps office हे अप्लिकेशन प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा.या अप्लिकेशन च्या मदतीने तुम्ही सर्व pdf file, ppt वाचू शकता,पाहू शकता तसेच व्हाट्सअॅप वरील मेसेज सेव्ह करू शकता
मागील पोस्टमध्ये आपण WPS Office ऍपच्या सहाय्याने pdf कशी तयार करावी हे पहिले, आज याच ऍपच्या मदतीने व्हाट्सपवर आलेली महत्वपूर्ण माहिती कायमस्वरूपी कशा प्रकारे जतन करता येते व सदैव संग्रही कशी ठेवता येते हे पाहूया
व्हाट्सअॅप वरील मेसेज कसे सेव्ह करावे ?
व्हाट्सअॅप वर खुप महत्वाचे मँसेज येत असतात . एवढे सर्व मँसेज कुठे सेव्ह करावे हा तुम्हाला नेहमीच पडणारा प्रश्न आहे. आज त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे.
WPS Office नावाचे अतिशय सुंदर अॅप गुगल प्ले- स्टोर वर आहे. ते डाउनलोड करा.
यात Pdf, word, Excel, power point सर्व फॉर्मट सपोर्ट होतात
सेव्ह करण्याची पध्दत :
● तुम्हाला जो मँसेज जतन करुन ठेवायचा आहे त्या मँसेजवर काही क्षण बोट दाबुन धरा मँसेज फिक्कट निळा होइल व तुमच्या मोबाईल स्क्रिनच्या वरील बाजुस उजव्या कोपऱ्यात छोटा आयत दिसेल. त्या आयताला स्पर्श करा. आता तुमचा मँसेज कॉपी होईल.
● WPS OFFICE हे अँप ओपन करा. केल्यावर तुम्हाला + असे चिन्ह दिसेल
या चिन्हावर क्लीक केल्यावर तुम्हाला खालील चार पर्याय दिसतील
1) new spreadsheet
2) new presentation
3) new memo
4) new documents
वरील चार पर्यायांपैकी new documents वर क्लीक करा तुम्हाला Blank व custom templates हे दोन पेज दिसतील
Blank वर क्लीक करा.
↓
word format चे पेज ओपन होइल.
↓
या पेजवर जावुन काही क्षण पेजवर बोट दाबुन धरा.
↓
तुम्हाला select = select all = paste
हे तीन पर्याय दिसतील.
पैकी paste हा पर्याय निवडी व paste ला क्लीक करा.
तुमचा मँसेज कॉपी झाला.
↓
याच स्क्रिनवर खालच्या भागात मधोमध tool हे अॉप्शन आहे. त्यावर क्लीक करा.
↓
तुम्हाला save as असे अॉप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.
↓
आता तुम्हाला
phone
SD card
my documents
असे तीन पर्याय दिसतील शक्यतो SD card (memory card) हाच पर्याय निवडा.
Memory Card नसेल तर phone ( phone memory) हा पर्याय निवडा.
↓
तुमच्या फाइलला मनपसंत नाव द्या. तुमची माहिती कायमस्वरुपी सेव झाली.
तुमच्या माहितीचे ई-पुस्तक तयार झाले.
आता पुन्हा याच ई-पुस्तकात नवीन मँसेज सेव करायचा असेल तरपुन्हा सांगितल्यानुसार कॉपी करा.
↓
तुमच्या मोबाईलच्या
file browser मध्ये जाउन तुम्ही सेव केलेली फाइल शोधा
↓
क्लीक करुन else office मध्ये ओपन करा.
↓
ई-पुस्तक ओपन होइल.
↓
याच स्क्रिनवर खालच्या उजव्या बाजुस keyboard हा टँब दिसेल. त्यावर क्लीक करा.
↓
Mobile keyboard ओपन होइल.
↓
Keyboard वरील enter चे बटन दाबुन स्क्रिनवरील कर्सर खाली आणा.
↓
वर सांगितल्यानुसार पुढील सर्व कृती करा.
↓
अशा रीतीने तुम्ही दररोजचे महत्वपूर्ण मँसेज कायमस्वरुपी सेव करु शकता.
↓
डेटा केबल किंवा ओटीजी केबल द्वारे ही फाईल कम्प्युटर वर कायमस्वरूपी सेव ठेवु शकता
तेही अतीशय कमी जागेत
mb मध्ये नाही kb मध्ये.

Adhar

आधारकार्ड अपडेट करा

१. प्रथम https://uidai.gov.in/ या बेवसाईटवर जा.
२. 'Update Your Aadhaar Card' या टॅबवर क्लिक करा.
३. नवं पेज उघडल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं आधार कार्डावरील चुका दुरुस्त करू शकता.
पहिली पद्धत म्हणजे फॉर्म डाऊनलोड करून ऑफलाईन पद्धतीने आणि दुसरी म्हणजे ऑनलाईन पद्धतीने.
४. 'Fill up 4-Step Online Request' च्या खाली चार स्टेप दिल्या आहे. त्यातील 'Update Aadhaar Data' या ऑप्शनवर क्लिक करा.
५. नवं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाल तीन प्रश्न दिसतील. आणि त्यांची उत्तरंही. 
(१) ज्यांच्याकडे मोबाईल आहे ते आपलं आधार कार्ड अपडेट करू शकतील. व्यक्ती आपलं नाव, पत्ता, लिंग,जन्मदिवस, मोबाईल क्रमांक आणि ईमेल या पोर्टलच्या मदतीनं अपडेट करू शकतात
(२) डिटेल्ससाठी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी 'click here'  वर क्लिक करा.
(३) अपडेट रिक्वेस्टसोबत तुम्हाला कोणती कागदपत्रं ऑनलाईन पाठवायचीत त्यांची माहिती तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात मिळेल.
६. यानंतर तुम्हाला 'To submit your update/ correction request online please' च्या समोर 'Click Here' वर क्लिक करावं लागेल.
७. यानंतर 'Aadhaar Self Service Update Portal' ओपन होईल. तिथे तुम्हाला अगोदर ज्या आधार कार्ड वरील माहितीची सुधारणा करावयाची आहे त्या आधार कार्ड वरील '12 अंकांचा आधार क्रमांक' टाकावा लागेल. 
८. त्यानंतर  टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर 'OTP' चा मेसेज येईल.
९. त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता,मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी यातील जी माहितीमध्ये बदल करावयाचा आहे त्यावर क्लिक करा
१०. 'Data Update Request'  ओपन झाल्यानंतर त्यावर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
११. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती एका पानावर दिसेल, त्यात काही चुका असल्यास त्या दुरुस्त करा.
१२. सबमिट केल्यानंतर  'Document Upload'  चा भाग समोर येईल. इथे तुम्ही तुमच्या कागदपत्रांचे फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करू शकता.
१३. तिथेच तुम्हाला बीपीओ सर्विस प्रोव्हायडरचं नाव सिलेक्ट करावं लागेल.
१४. यानंतर तुम्हाला मोबाईलवरही एक मॅसेज येईल, या मॅसेजमध्ये असलेल्या URN क्रमांकानं तुम्ही तुमची रिक्वेस्टची स्थिती पाहू शकता. 
आधार कार्डवरील माहितीत जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नंबर किंवा आणखी इतर काही बदल करायचा असेल तर हे सर्व आपण कोठेही सायबर कॅफे किंवा इतर ठिकाणी न जाता व एकही पैसा खर्च न करता घरबसल्या काही मिनिटात ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

इंटरनेट बँकिंग NEFT / RTGS / IMPS

इंटरनेट बँकिंग NEFT / RTGS / IMPS

जाणून घ्या NEFT आणि RTGS मध्ये नेमका फरक काय ?
Difference Between IMPS, NEFT, RTGS
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही नेहमी पाहत असाल की आपल्याला NEFT आणि RTGS हा पर्याय दाखवतो. पण कधी तुम्ही विचार केलाय का, काय आहे हे NEFT आणि RTGS? त्याचं महत्त्व काय? आणि नेमका त्यांच्यामधील फरक काय? चला तर जाणून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत, ज्यातील प्रमुख प्रक्रिया आहेत-
१. National Electronic Fund Transfer – NEFT
२. तात्काळ पैसे पाठवणे (Real Time Gross Settlement – RTGS
३. Immediate Payment Service – IMPS
आपण आता या तिन्ही प्रक्रियांविषयी स्वतंत्रपणे जाणून घेऊया:
१. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT)
ही भारतातील सर्वात प्रमुख पैसे हस्तांतरण प्रणालीपैकी एक आहे. ही प्रणाली नोव्हेंबर २००५ मध्ये सुरु करण्यात आली. या पद्धतीने पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत, या प्रणालीमध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. ही सुविधा देशाच्या ३०००० बँकांमध्ये उपलब्ध आहे.
२. रीअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS)
भारतीय RTGS प्रणाली महिन्याच्या केवळ १६ दिवसात देशाच्या जीडीपी एवढी देवाण – घेवाण करते. RTGS च्या माध्यमातून मोठमोठी देवाणघेवाण केली जाते. देशातील ९५% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही प्रक्रिया जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे १९८५ पर्यंत केवळ ३ देश ही पद्धत वापरत असतं, पण आज  जगातील १०० पेक्षा जास्त देश या प्रणालीचा वापर करतात. RTGS प्रणालीच्या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात.
३. इमीडेट पेमेंट सर्विस (IMPS)
ही सेवा भारतामध्ये २२ नोव्हेंबर २०१० रोजी सार्वजनिकरीत्या सुरु करण्यात आली होती. या सेवेमार्फत एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. एकीकडे NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या २४ तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते.
NEFT आणि RTGS मध्ये काय फरक आहे?
१. NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात.
२. NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत कमी २ लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते.
३. NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो, पण RTGS मधून पैसे लगेच हस्तांतरीत होतात.
४. NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते.
५. ट्रान्सफरसाठी आकारण्यात येणारे शुल्क :
NEFT मध्ये आकारण्यात येणारे शुल्क
१ लाखांपर्यंत आकारण्यात येणारे शुल्क:- ५ रुपये + सेवा कर
१ लाखापेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमीसाठी आकारण्यात येणारे शुल्क :
१५ रुपयापेक्षा जास्त नाही + सेवा कर
२ लाखापेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
२५ रुपयापेक्षा जास्त नाही+सेवा कर
६. RTGS मध्ये लागणारे शुल्क :
२ लाख रुपये ते ५ लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ३० रुपये
५ लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क :
प्रत्येक ट्रान्सफरला कमाल ५५ रुपये
स्त्रोत : Whatsapp

OTG cable

OTG केबलचे उपयोग

KEYBOARD मोबाईलला जोडा 
OTG द्वारे तुम्ही कीबोर्ड मोबाइल ला कनेक्ट करू शकता OTG मोबाइलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्ट ला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही TYPE करू शकता कीबोर्ड ने मोबाईल वर याचा उपयोग तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला जास्त मजकूर TYPE करायचा असेल किंवा मोठा मेल TYPE करायचा असेल.
माऊस मोबाईलला जोडा 
OTG द्वारे तुम्ही मोबाइलला माऊस जोडू शकता. यासाठी OTG मोबाइलला जोडा व त्या OTG USB ला माऊस USB जोडा या नंतर तुम्ही माऊस ने मोबाईल OPERATE करू शकता.
USB फॅन मोबाईलला जोडा
OTG केबल द्वारे तुम्ही मोबाईल ला USB फॅन जोडू शकता बाजारात 60 पासून 300 रुपयापर्यंत USB फॅन मिळतात.या USB फॅन ची हवा हि उत्तम येते व या द्वारे गरम होणारे मोबाईल सुद्धा थंड करता येतात.
कार्ड रीडर मोबाइलला जोडा 
OTG ने मोबाइलला कार्ड रीडर जोडता येते. यासाठी OTG मोबाइलला कनेक्ट करा व त्यानंतर कार्ड रीडर OTG ला जोडा आता तुम्ही डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.
GAME कंट्रोलर मोबाइलला जोडा 
आपले आवडते Game आपण मोबाइल वर खेळतो पण आपली बोटे त्याने दुखत असतात.अशा वेळी आपण मोबाइलला game console attach करू शकतो यासाठी आपल्याला OTG ला GAME CONSOLE USB ATTACH करावा लागेल. CONSOLE वरून मनमुराद गेमिंग चा आनंद घेऊ शकता.
USB LIGHT  मोबाइलला जोडा
Otg केबल ने आपण मोबाईल ला usb light जोडू शकतो यासाठी otg कनेक्ट करून त्या otg ला usb light जोडा मोबाईल फ्लॅश light पेक्षा जास्त चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.
Lan Cable मोबाइलला जोडा
ब्रॉडबँड connection जर डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट करायचे असेल तर otg द्वारे आपण ते करू शकतो प्रथम मोबाइलला otg जोडा व otg ला lan केबल जोडा यानंतर ब्रॉडबँड पिन lan केबल ला जोडा अश्या प्रकारे wifi व डेटा connection बंद होऊन मोबाईल मध्ये नेट सर्विस आपण वापरू शकतो.
हार्ड डिस्क मोबाइलला जोडा
Otg केबल ने आपण 500 gb 1 tb 2 tb हार्ड डिस्क मोबाईल ला कनेक्ट करू शकता डेटा कॉपी पेस्ट delete करू शकता.
DSLR 
Camera चा dslr आपण otg ने ऑपरेट करू शकतो यासाठी प्ले स्टोर वरून फक्त एक dslr डॅशबोर्ड अप्लिकेशन घ्यावे लागेल
ऑडिओ साऊंड कार्ड मोबाइलला जोडा
ऑडिओ आउटपुट सुद्धा otg ने करता येते यासाठी otg मोबाइलला कनेक्ट करून एक ऑडिओ कार्ड या otg ला कनेक्ट करू शकता यानंतर हेडफोन्स त्या ऑडिओ कार्ड ला जोडून music चा आनंद घेऊ शकता मोबाईल चा ऑडिओ आउटपुट डेड झाल्यास याचा चांगला उपयोग बाजारात असे ऑडिओ कार्ड उपलब्ध आहेत.
OTG ने मोबाईल चार्जिंग
तुमच्या मोबाईल ने दुसऱ्या मोबाइलला चार्ज करता येते या साठी तुम्हाला फक्त otg मोबाईल ला कनेक्ट करायचे आहे व त्यानंतर त्या otg ला चार्जिंग केबल कनेक्ट करायची व त्या चार्जिंग केबल चे दुसरे टोक दुसऱ्या मोबाईल ला कनेक्ट करायचे दुसरा मोबाईल चार्ज व्हायला सुरुवात होते

Vdo making

व्हिडिओ तयार करा

!! शैक्षणिक व्हिडिओ तयार करुया !!
हल्लीच्या तंत्रस्नेही युगात व्हीडीओ तयार करण्यासाठी power director, kinemaster, viva video यासारखी एप्लीकेशन उपलब्ध आहेत , त्यापैकी viva video च्या मदतीने शैक्षणिक व्हीडीओ कसा तयार करायचा ते आपण पाहूया :
▶ Video मेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज video .
2) शैक्षणिक video
▶ आपल्या कडे viva video app असेल तर ठीक आहे नसेल तर play     store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या
▶ Viva video ओपन करा
▶ Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व    
   slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू       लागतील
▶ ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन    करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस        येतील .
▶ सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा      आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Done आहे
▶ सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶ Vdo बोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर            दिसतील
▶ प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम 
   डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम
   डाऊनलोड होईल
▶ एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdo तयार होतो
▶ खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶ या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर   क्लिक करा
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶ मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण    
   कोणतेही   
   गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या naतर add हा शब्द येईल त्या    वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdo वर जाईल.
▶ तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶ आपल्या vdo ला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला    
   कमीतकमी 5 सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdo चा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति   
   महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात . 
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,text व transition हे 
   महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶ दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु 
   शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdo च्या खालील बाजूस vdo रील दिसेल    ▶ आपणास vdo ला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶ सुरुवातील नाव देऊ
▶ थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶ थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶ Vdo च्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶ Aa वर क्लिक करा
▶ Aa या फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdo var एक चौकोन दिसेल .    त्या मध्ये please title here असे असेल
▶ Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶ पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶ मराठीत असेल तर अति उत्तम
▶ खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶ चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध   
   गोल आहे
▶ त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶ अक्षरे मोठी झाली का ?
▶ आता अक्षरांना कलर देवूया
▶ खालील बाजूस Aa बाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब    टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶ त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर    
   क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल.
▶ वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर तसेच video च्या खालील    
   बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील   
  पुढे सरकते ok   .video वर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे ठरवा.    प्रथम आपणवरील चिन्हावर क्लिक करा video खाली तसेच चिन्ह     असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .video थांबतो   रील थांबते .नंतर थांबा.
▶ एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव 
   ठेवा
▶ एक स्लाइड संपताच video च्या खाली ✅हे चिन्ह आहे क्लिक करा       vdo थांबेल.
▶ नंतर video च्या वर ✅हे चिन्ह दिसेल त्या वर क्लिक करा म्हणजे      
   तुमचे  नाव video वर फिक्स होईल.
▶ अशा पद्धती ने दोन तीन वेळा कृती करा म्हणजे तुमचे सर्व नाव    
   फिक्स    
   होईल .videoतयार होईल.
▶ अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶ Videoमधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड    बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा video      तयार    झाला .
▶ तो video draft मधे सेव करा.
▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो video मोबाईल च्या gallery मध्ये      येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे    
   exporting होईल व gallery मध्ये येईल.