भाषासंगम उपक्रम
*विषय : “एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत - भाषा संगम” कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत .*
*1)* भारत सरकारने राष्ट्रीय
एकात्मता वाढीसाठी “एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB)” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने *दि.२० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८* या कालावधीत *“भाषा संगम”* हा उपक्रम सर्व शाळांमधे सर्व भारतीय भाषांबद्दल अधिक प्रेम व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने घ्यावयाचा आहे.
*2)* देशातील २२ भाषांमधील सामान्यत: बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परीपाठामधे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावयाची आहेत. यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका https://goo.gl/PfNDUu या लिंकवर उपलब्ध आहे.

*3)*“भाषा संगम” अंतर्गत घ्यावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक माहिती पुस्तिकेच्या (पान क्र II ) वर दिले असून पुढीलप्रमाणे कृतिकार्यक्रम घ्यावा.
i) ज्या तारखेला जी भाषा संवादासाठी सुचवली आहे, त्या भाषेची ५ वाक्ये परिपाठात वाचावीत. (उदा. दिवस पहिला - असामी, दिवस दुसरा - बंगाली) शिक्षक, पालक, शासकीय कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांना अशी वाक्ये वाचण्यासाठी निमंत्रित करावे .
ii) काही विद्यार्थ्यांना या वाक्यांवर आधारित भित्तीपत्रके (posters) तयार करण्यास सांगावीत व तयार केलेली भित्तीपत्रके शाळेमध्ये सर्वत्र लावावीत. व या संदर्भाने इतर काही पुरक उपक्रम घ्यावेत.
*4)* सोबत दिलेल्या माहिती पुस्तिकेच्या पान क्र.V वरील मुद्दा क्र. 3 ( i ते xii ) नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या दैनंदिन कार्यक्रम व उपक्रमांचे videos, photoes “Bhasha sangam youtube channel” वर दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत.

*5)* या उपक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य DIECPD यांनी काम पहातील.
जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील माहितीचे दिनांकनिहाय संकलन करून या कार्यालयाच्या marathilangdept@maa.ac.in या इमेलवर दररोज पाठवावी.

*6)* क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांनी “भाषा संगम” कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने शाळाभेटी कराव्यात.
*अधिक माहितीसाठी उपक्रमाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.जगराम भटकर (उपसंचालक भाषा विभाग) (९४२३७२८४८६) यांच्याशी संपर्क करावा.*
*(विद्या प्राधिकरण ) पुणे*
No comments :
Post a Comment