*पहिली ते आठवीसाठी नैदानिक ऐवजी “प्रगती चाचण्या’*
*पुणे,दि.12 (प्रतिनिधी)- राज्यात आतापर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या नैदानिक चाचण्यांऐवजी प्रगती चाचण्या घेण्यात येणार आहेत. भाषा आणि गणित या विषयांबरोबर विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचाही या प्रगती चाचणीत समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रगत विद्यार्थ्यांची व्याख्याही बदलण्यात आली असून आता 75 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्रगत समजले जाणार आहे.*
*शिक्षण हक्क कायदा आल्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीसाठी नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दोन ते तीन वर्षापूर्वी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या नैदानिक चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता यामध्ये बदल करत प्रगती चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचण्या नैदानिक प्रमाणेच आहेत मात्र प्रगती चाचण्यांमध्ये विषयांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.*
*प्रगती चाचण्यांतर्गत नैदानिक प्रमाणेच पायाभूत, संकलित मुल्यमापन एक व दोन अश्या तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. मात्र नैदानिक चाचण्या या केवळ भाषा आणि गणित विषयांच्या घेण्यात येत होत्या. प्रगती चाचण्या या इयत्ता पहिली व दुसरीच्या प्रथम भाषा व गणित, तिसरी ते पाचवीच्या भाषा, गणित व इंग्रजी भाषेच्या घेण्यात येणार आहेत तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रथम भाषा, गणित, इंग्रजी आणि विज्ञानाच्या घेण्यात येणार आहे.*
*नैदानिक चाचण्यांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरले जात असले तरीही ते सर्वत्र जाहीर केले जात नव्हते. मात्र आता पुढील काळात प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्याला मिळालेले गुण हे जाहीर केले जाणार आहेत.*
▶ *राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन समजणार*📶
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
No comments :
Post a Comment