पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 31 July 2017

1St std


*इ.१ली*
*स्टुडंट पोर्टल  २०१७ संदर्भात*
-------------------------------------

*स्टूडंट पोर्टलमध्ये इयत्ता १ली च्या नविन प्रवेशित  विद्यार्थ्यांसाठी STUDENTS  ENTRY टॕब आल्याबाबत*

*स्टूडंट पोर्टलमध्ये STUDENTS  ENTRY हा टॕब प्रत्येक मुख्याध्यापक यांच्या  *STUDENTS PORTAL* *लाॕगीन ला दिला असून सदर टॕब लवकरच *येत्या काही दिवसामध्ये अॕक्टीव होणार* *आहे.तरी सर्व मुख्याध्यापक यांनी *इयत्ता १ली* *मधील* *प्रवेशित नविन विद्यार्थी यांची आवश्यक माहीती खालील photo फाईलमधील click hereखालील click here वर click here वर click करून नमुन्याप्रमाने  तयार करुन ठेवावी,जेणे करुन इयत्ता १ली मधिल नविन प्रवेशित विद्यार्थ्यांची  आॕनलाईन *NEW STUDENTS  ENTRY*   *करतांना जास्त अडचण येणार नाही*

         click here
 



 
    

Saturday, 29 July 2017

आधारकार्ड

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀           *आपले आधारकार्ड पँनकार्ड शी कसे जोडावे..??*                 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋   *शासनाच्या निर्देशानूसार आपले आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय सन २०१७/१८ या आर्थिक वर्षात आपण आपले रिटर्न फाईल आपण करू शकत नाही.किंवा आपले पँन कार्ड बाद होवू शकते.त्यासाठी आपले आधारकार्ड पँन कार्डशी त्वरीत संलग्न करून घेणे गरजेचे आहे.*                          🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻                    🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻   *आधारकार्ड पँनकार्ड शी संलग्न दोन पध्दतीने करू शकतो. त्यातील पहीली पध्दत अगोदर पाहू..                                              1⃣  प्रथमतः खालील लिंक वर जा. https://www.incometaxindiaefiling.gov.in/e-Filing/Services/LinkAadhaarHome.html       2⃣  जे पेज ओपन होईल त्यात पँन कार्ड नंबर , आधार कार्ड नंबर टाका.                                                    3⃣ त्याच्या खाली आधारकार्ड वर असलेले आपले नाव टाका. स्पेलिंग मिस्टेक्स नको.                             4⃣ त्याच्या खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे कँप्च्या कोड टाका. व खाली दिलेल्या Link aadhaar या टँबवर क्लिक करा. तुमचा आधारनंबर पँनकार्ड नंबर शी लिंक झाले.   हि प्रक्रिया आपण मोबाईल पण करू शकता.                                   🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄      दुसरी पध्दती ....*                                             *आपण SMS पध्दतीने सुद्धा  आधारकार्ड पँनकार्ड शी जोडू शकता.                                        मेसेज  बाँक्स मध्ये  खालील प्रमाणे मेसेज टाईप करा .......                              UIDPAN>12digit aadhaar no 10 digit pan no                      आणि पाठवा 567678 किंवा 56161 या नंबर वर............*      📲📲📲📲📲📲📲📲

Thursday, 27 July 2017

Apps

शैक्षणिक मोबाईल अॕप्स



शैक्षणिक मोबाईल अॕप्स
 मित्रांनो आपणासाठी सादर आहेत101 selected interactive android educational appsजे आपल्याला  play store वर मोफत उपलब्ध आहेत.मग काय ! होऊन जा tech savvy teachers.                                                                                                           Marathi,
Nursery Rhymes,
50 famous balgeet,
play group english,
abc quiz,
amol goshti,
baby app,
basic operation,
child play,
easy writing,
educational apps for children, educational games for kids, educational grammer,
english to marathi dictionary, foxit pdf ,
flowers coloure,
flashcards for kids,
gadwat,
how to draw, in.co.akshar, indian gk ,
kbc 7 hindi ,
khara mitra,
kids school,
king of math,
learn marathi,
marathi english dictionary, marathi news paper,
marathi pride editor,
marathi balwadi,
math for kids,
math kids,
barbie coloring,
animal n...r kids,
varnamala lite ,
kids doodle,
zebra paint,
marathi ak...,
abc sound ,
kids learn abc .,
alphabets writing,
bubble school lite ,
kids craft ideas ,
draw mo...wing,
animal sound,
abc phonics,
kids flashcards,
eslate,
true or faluse kids,
balwadi,
kids number,
child's play ,
memory game wild animals, mental math ,
number for kid ,
part of the body ,
pratiyogita mantra, shivkalyan raja,
trace&learn,
learn marathi,
puzzle, talking tom 2,
marathi mhani,
piano melody,
math example,
tabla,
memory card ,
marathi pride jokes ,
animal for kids ,
write now,
marathi story,
hindi story,
sliding puzzle,
123s abc kids,
abc song,
abc sound,
alphabets & numbers, animals numbers, educational games,
english speaking,
even or odd,
kido,
kids educational,
kids math,
maths, math book,
math practice,
educational math tricks ,
first grade,
preschool,
math flash,
dr.bhimrao ambetker, mahatma gandhi,
Ezeetest,
shivajiraje,
मुलांसाठी आवश्यक
free app
1st grade,
35kids picture story,
ABC English,
ABC handwriting,
About India,
Amazing science,
Animal encyopedia,
Animal planet,
Archaeoist,
Bheem rupee game,
Biology for kids,
First learning game,
Brain trainer special,
Country list,
Doch sight words,
English conversation,
English for kids,
Evomemo,
Farm scratch,
1st grade words,
1st grade math,
1st grade word play lite,
Forts of Maharashtra,
Fundoscience,
Funny vitamins,
Fun with dots,
Gadwat,
Fun easy learn English,
First words,
Hangama kids,
IMO 1 maths,
Hindi writing,
Isro programs,
Jr science master,
Kids creation,
Kids craft idea,
Kids educational games,
Kids encyclopedia,
Kids gk test,
Kids jigsaw2,
Kids learning flowers names,
Kids learning math lite,
Kids measurements,
Kids science experiments,
Kids tangram free,
Kids creative puzzle,
Four seasons,
Kids maths,
Kidspedia,
Kids zoo,
Know abacus,
Learn body part in English,
Learn Hindi number,
Learn to read,
Learn to read lite,
Lit charm pro,
Lines and shapes free,
Logic free,
Logic with bheem,
Marathi,
Mharathi mhani,
Marathi panchatratra,
Match spell,
Math art for kids,
Math challenge,
Math tricks,
Mind games,
Missing letters,
Nao,
Olypiad eng grade 1,
Panchtratra,
Phonics spelling and sight words,
Piano lessons,
Planet dino,
Planets space,
Play and learn,
Play learn English,
Play ground for kids,
Sage kids,
Sana Olympiad,
Science experiments,
Science lab,
Science school,
Shivaji &maratha empire,
Simple drawing lessons,
Singular plular,
Sky guide for kids,
Smarts kids,
Space puzzle,
Speakaboos,
Spelling,
Tabala master,
True or false,
Barakhadi                                                                                                                                                           धन्यवाद !!!                                                                                                                                                                                                                                                                                                   सोबतच
तंत्रस्नेही शिक्षकांकरीता उपयूक्त अशी
मोबाईलची महत्त्वाची अॅप्स
१) way 2 sms
वरिल अॅप्‍स मोफत मॅसेज पाठविण्‍यासाठी उपयोगी आहे.
२) paytm
वरिल अॅप्‍स वेळेवर डेबिड कार्डवरुन रिचार्ज करण्‍यासाठी उपयोगी आहे.
३) what's app
वरिल अॅप्‍स व्हिडीओ,शब्‍द,चिञ मॅसेज पाठविण्‍यासाठी उपयोगी आहे.
४) hike
वरिल अॅप्‍स व्हिडीओ,शब्‍द,चिञ मॅसेज सोबतच इतर फाईल्‍स पाठविण्‍यासाठी उपयोगी आहे.
५) tube mate
वरिल अॅप्‍स यु टयुब वरिल व्हिडीओ डाउनलोड करण्‍यासाठी उपयोगी आहे.
६) m. dictionary
वरिल अॅप्‍स मराठी इंग्रजी शब्‍दांचे अर्थ माहितीसाठी उपयोगी आहे.
७) Newspaper
वरिल अॅप्‍स सर्वच पेपर्स मधील बातम्‍या पाहयासाठी उपयोगी आहे.
८) Kingsoft Office
वरिल अॅप्‍स मायक्रोसॉफट ऑफिसचे कार्य करते.
९) drop box
वरिल अॅप्‍सवर आपन आपल्या महत्‍वाच्‍या फाईल्‍स जतन करुन ठेवू शकतो.
१०) PicsArt
वरिल अॅप्‍स चिञांमध्‍ये बदल करण्‍यासाठी उपयोगी आहे.
११) home budget
वरिल अॅप्‍स घर खर्चाचा हिशेब ठेवण्‍यासाठी उपयोगी आहे.
१२) uc browser
वरिल अॅप्‍स इंटरनेटचा वापर करण्‍याकरिता.
१३) just marathi
हे अॅप्‍स मोबाईल मध्‍ये मराठी भाषेकरिता आहे.
१४) true caller
हे अॅप्‍स अज्ञात फोन धारकाचा शोध् घेते.
१५) मराठी ग्रिटींग्स
हे मराठी ग्रिटींग्ज चे अँड्रॉयड अ‍ॅप आहे.
१६) गुरुकुल महाराष्‍ट्र
प्रश्‍नसंच,व शाळेची इतर माहितीसाठीचे अॅप्‍स.
१७) Voice to Text
तोंडाने बोला व खाली इंग्रजीत व त्‍याचे मराठी भारूांतर घ्‍या.एकदम मजेशीर व मुलांना आवडील असे अॅप्‍स.तसेच मोठयांना सुद्धा उपयुक्‍त आपणास टायपींग करण्‍याची आवश्‍यकता सुद्धा पडणार नाही.आपण बोललेले वाक्‍य हे अॅप्‍स आपल्‍याला लिहून देते.
१८) All Language Translator
कोणत्‍याही देशाची भाषेला इंग्रजी व हिंदीमध्‍ये बदला वरिल अॅप्‍स डाउनलोड करुन.
मुलांना मोबाईलचे फार वेड ( मुलांनाच दोष देउन फायदा आपल्‍यालाच काय कमी आहे) याचा फायदा जर आपण मुलांच्‍या शिक्षणाकरिता करुन घेतला तर ........
खालील अॅप्‍स असेच आहे.मुलांचे शिक्षण सुद्धा होईल व मजा सुद्धा येईल.या अॅप्‍स व्‍दारे मुले इंग्रजी उत्‍तम प्रकारे श्कितील.याची मला खात्री आहे.
१९) Free Screen Recorder
मोबाईल वरिल स्क्रिनचे रेकॉर्ड करण्‍यासाठी अत्‍यंत उपयोगी अॅप्‍स
२०) Formatfactory
या सॉफ्टवेअरमध्‍ये खराब झालेले व्हिडीओ व ऑडीओ कन्‍व्‍हर्ट करता येते. तसेच इमेज एडिटही करता येऊ शकते
२१ Video converter factory
या सॉफ्टवेअरच्‍या साह्याने अनेक फॉरमॅटमधील फाईल्‍स अतिशय कमी वेळेत पाहिजे त्‍या फॉरमॅटमध्‍ये कन्‍व्‍हर्ट करता येते

UDISE

*युडायस म्हणजे काय?*
U-DISE  चा लॉंगफॉर्म Unified District Information System for Education असा आहे. आपण सर्वजण दरवर्षी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती युडायस मध्ये भरून देतो. आणि आपल्या शाळेची माहिती खाली दिलेल्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाते त्यामुळे आपल्याला देशातील कोणत्याही शाळेची युडायस मधील माहिती किंवा *स्कूल रिपोर्ट कार्ड* या वेबसाईटवर मिळू शकतात.
  संपूर्ण देशात कोणत्याही शासन मान्यता प्राप्त शाळेला युडायस असतो. मग ती शाळा कोणत्याही प्रकारची, व्यवस्थापनाची, माध्यमाची असो किंवा खाजगी असो, कोणताही  युडायस हा अकरा अंकी असतो या अकरा अंकांची माहिती आपण पाहूया.
 Udise मधील अकरा अंकांचे पाच भाग पडतात. त्याची माहिती  पुढीलप्रमाणे आहे.
माझ्या जि प प्राथ शाळा ढोराळे शाळेचा युडायस 27300203201 असा आहे आणि तो अकरा अंकी आहे . आणि याचे पाच भाग पुढीलप्रमाणे आहेत.
27,30,02,032,01 म्हणजे देशातील कोणत्याही शाळेचा युडायस हा अकरा अंकीच असतो
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*27:-*27 या अंकाकडे पाहिलं की लगेच ही शाळा महाराष्ट्र राज्यातील आहे हे लक्षात येते.01 नंबर हा जम्मू काश्मीर या राज्याचा असून 36 हा नंबर तेलंगणा या राज्याचा आहे. म्हणजे 01 ते 36 इतके नंबर आपल्या देशात राज्य व केंद्रशासित प्रदेश यांना देण्यात आले आहेत.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*30:-* हा अंक जिल्ह्याचा क्रमांक दर्शवितो. 30  या क्रमांकाचा  जिल्हा सोलापूर असून राज्यात 01 ते 35 क्रमांक जिल्ह्यांना देण्यात आले आहेत . 01 नंबर नंदूरबार जिल्ह्याचा असून 35 नंबर सांगली जिल्ह्याचा आहे. पालघर या जिल्ह्याची माहिती मिळाली नाही.सध्या पालघर जिल्ह्याचा व ठाणे जिल्ह्याचा कोड एकच असावा. असे वाटते.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
 *02:-* वरील युडायसमध्ये 02 हा अंक महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याला देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता अक्कलकोट तालुक्याला 01 तर दक्षिण सोलापूर तालुक्याला 11 क्रमांक देण्यात आला आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*032:-* वरील युडायस मधील 032 हे अंक बार्शी तालुक्यातील गावाचा क्रमांक दर्शवितात.  032 क्रमांक ढोराळे या गावाचा असून बार्शी तालुक्यातील सर्व गावांना 001 ते 140 पर्यंत क्रमांक दिले आहेत. 001 क्रमांक आगळगाव या गावाचा असून 140 क्रमांक राळेरास केंद्रातील तडवळे या गावाचा आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
*01:-* वरील युडायस मधील शेवटचे दोन अंक हे त्या गावातील शाळेचा क्रमांक दर्शवितात.एखाद्या गावात अनेक शाळा असू शकतात त्यामुळे एकाच गावातील अनेक शाळांना 01 ते 99 पर्यंत क्रमांक दिलेले असू शकतात. हे त्या गावातील शाळांच्या संख्येवर अवलंबून असते. परंतु निरीक्षणातून असे लक्षात येते की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांना बहुधा 01 क्रमांक देण्यात आलेला असून खाजगी किंवा इतर व्यवस्थापनाच्या शाळांना पुढील क्रमांक देण्यात आला आहे.
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎
📗📕📋 *रंजक माहिती*📋📕📗
वरील माहिती वाचल्यावर लक्षात येईल की  01010100101 हा युडायस नंबर आपल्या भारत देशातील कोणत्यातरी शाळेचा असेल, तर हे बरोबर आहे. हा युडायस जम्मू- काश्मीर या राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील चामकोटे तालुक्यातील टीतवाल या केंद्रातील BHSS TEETVWAL या शाळेचा आहे आणि ती  देशातील पहिली शाळा आहे असे म्हणू शकतो तर 36104602307 हा युडायस आपल्या देशातील शेवटचा युडायस असून तो तेलंगणा राज्यातील खम्मम या जिल्ह्यातील येरूपेलम तालुक्यातील व केंद्रातील REMIDICHERLA या गावातील MPPS रामपूरम या शाळेचा आहे. तसेच आपल्या राज्याचा विचार करता  27010100101 हा युडायस नंबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्यातरी शाळेचा असू शकतो. तर वरील 27010100101 हा युडायस क्रमांक हा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावातील जि. प. प्राथ.शाळा धानोरा या शाळेचा आहे आणि हा आपल्या राज्यातील  पहिला युडायस म्हणू शकतो आणि 27351104501 हा युडायस शेवटच्या शाळेचा क्रमांक म्हणू शकतो.तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील शिरगाव या गावातील जि प प्राथ. शाळेचा आहे.
आपल्या सोलापूर जिल्ह्याचा विचार करता 27300100201हा  जिल्ह्यातील पहिला युडायस असून तो नगरपरिषद शाळा अक्कलकोट या शाळेचा असून सर्वात शेवटचा युडायस क्रमांक हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील sadepur या गावातील शाळेचा असून तो27301106501 असा आहे.
     *बार्शी तालुक्यातील सर्व युडायसचा विचार करता 27300200101 हा युडायस पहिला असून तो आगळगाव या केंद्रातील व गावातील जि प प्राथ. शाळा आगळगाव या शाळेचा असून तालुक्यातील शेवटचा युडायस राळेरास केंद्रातील तडवळे (या.) या  गावातील मंतीमद निवासी विद्यालय तडवळे या शाळेचा असून तो 27300210004 असा आहे.*
🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎🌎

*आंतरजालातून साभार*

*सौजन्य:-udise.in आणि schoolripoartcards.in*

*वरील सर्व माहिती ही संबंधित वेबसाईटवरून घेतली असून जर माहितीत काही चूक झाली असल्यास ती लक्षात आणून देण्यास हरकत नाही

इ. 1 ते 12 वी पर्यंतच्या कोणकोणत्या शिष्यव़ृत्ती


इ. 1 ते 12 वी पर्यंतच्या कोणकोणत्या शिष्यव़ृत्ती (Scholarship)आहेत
1.सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती
2.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
3.अस्वच्छ व्यवसाय करणार्रया पालकांच्या पाल्यांकरीता शिष्यवृत्ती
4.शालेय गुणवत्ता शिष्यवृत्ती
5.पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.5वी)
6. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.8 वी)
7.मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती (इ.9,10 वी
8. राष्ट्रिय प्रोत्साहन भत्ता (इ.9 वी
9. NTS परीक्षा (इ.10 वी सर्व मुली/मुली)
10. NMMS परीक्षा (इ.8 वी सर्व मुली/मुली)
 11.SSC Board परीक्षा फी
12. Pre-Matric Scholarship
13.Post-Matric Scholarship
14. भारत सरकार (मॅट्रीकेतर)  शिष्यवृत्ती (इ.11,12 वी).             

Wednesday, 26 July 2017

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान

बदलते शैक्षणिक तंत्रज्ञान आणि शिक्षक

    डिजिटल शाळा  : आजकाल शाळांचे पारंपारिक स्वरूप बदलत आहे. पूर्वी खडू, फळा, डस्टर, शैक्षणिक तक्ते, पृथ्वीचा गोल, मातीच्या मण्यांच्या माळा, नकाशे एवढं साहित्य वर्गात असलं की शाळेचा वर्ग सुरळीत चालू राहायचा.

     पण आताचे शिक्षक पाढे पाठ करून घेण्यासाठी आधी ते मोबाईलवर रेकॉर्ड करतात, मग विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतात. आता विद्यार्थ्यांना धडा शिकविणे ज्ञानरचनावादाकडून उलटा प्रवास केल्यासारखा आहे. विद्यार्थी संगणकावर स्वत:च धडा शिकतात.

    काही शाळांमध्ये तर विद्यार्थी स्वत:च डिजिटल धडे पीपीटी च्या साहाय्याने तयार करतात. काही शाळांमध्ये प्रोजेक्टर आहेत. काही ठिकाणी संगणक प्रयोगशाळा (computer lab) आहेत. बरेच उत्साही शिक्षक स्वत:च्या लॅपटॉपचा वापर करतात. काहीजण तर अॅण्ड्रॉईड मोबाईल वरील अॅप्स चा चातुर्याने उपयोग करतात.

   डिजिटल शाळा, डिजिटल शिक्षक!

जिल्हा परिषदेच्या शाळाही कात टाकताहेत. काही शाळांनी अाय एस ओ मानांकनही मिळवलंय. बऱ्याच तरुण शिक्षकांनी स्वत: कष्टाने, अभ्यासपूर्वक वेबसाईटसची निर्मिती केली अाहे. हे सर्व चित्र निश्चितच् अाशादायक अाहे. कारण अाजचा शिक्षक कुठेही कमी नाही. सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून स्वत:ची व्यवसायिक पात्रता वाढवून स्पर्धेच्या जगात टिकून राहतील तेच शिक्षक भविष्य घडवतील.

    शिक्षकांना बदलते तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे अाहे. त्यादृष्टीने पुढील माहिती उपयोगी पडेल.

१. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर (google)play store हा अायकॉन असतो. त्यावर ई-मेल अाय डी सेट केला की हजारो apps चे भांडार खुले होते. क्रेडीट किंवा डेबिट कार्ड असल्यास paid apps विकत घेऊन डाऊनलोड करता येतात. बऱ्याच free apps ही अाहेत. मराठी मूळाक्षरांसाठी varnamala lite ही फ्री अॅप अाहे. Book creator हे अॅप्लिकेशन वापरून डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करता येते. सध्या बाजारात अनेक खाजगी कंपन्यांचे android tablets अॅनिमेटेड स्वरुपात अभ्यासक्रम प्री-लोड करुन देतात. पण book creator या अॅप्लिकेशनच्या साहाय्याने शिक्षक स्वत: डिजिटल धडे किंवा पुस्तक तयार करू शकतात व google play store वर फ्री डाऊनलोडसाठी ठेऊ शकतात.

२. www.youtube.com ह्या वेबसाईटवर व्हिडीअोज शेअर करता व बघता येतात. M S Excel, Powerpoint, Word यावरील फाईल्स कशा तयार करायच्या त्याचे व्हिडीअोज बघता येतात. Animated videos, cartoons, rhymes, मराठी कविता, गाणी, learning English असे विद्यार्थी व शिक्षकांना उपयोगी लाखो व्हिडीअोज यावर अाहेत.

३. परदेशात अायफोन, अायपॅड व अायपॉड चा शिक्षणासाठी अनेक शाळांमधून वापर होत अाहे. मराठी मधून फारच कमी apps असल्यामुळे अापल्याकडे त्याचा वापर केला जात नाही. परंतु भविष्यात अायपॅडचा वापर वाढण्याची शक्यता अाहे. i-Mac किंवा macbook वर ibooks store हे अॅप्लिकेशन तर जबरदस्त अाहे. यावर चित्र, अावाज, टेक्स्ट, व्हिडीओ च्या साहाय्याने digital धडे किंवा पुस्तक तयार करता येते. अधिक माहितीसाठी www.apple.com/in/ला भेट द्या.

४. फेसबुक वर महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक ग्रुप्स अाहेत. त्यावर शैक्षणिक घडामोडी, प्रयोग, उपक्रमशील शाळा व शिक्षक इत्यादींची माहिती अद्ययावत स्वरुपात शिक्षकांना मिळू शकते.

५. भारतातील व परदेशातील शैक्षणिक तंत्रज्ञानासंबंधी उपयुक्त माहिती पुढील वेबसाईटवर मिळू शकते.

   1) www.emergingedtech.com

   2) www.edtechreview.in

   3) www.khanacademy.org

   4)  www.thefreemath.org

   5) www.teachersofindia.org

   6)www.teachersastransformers.org

   7) www.ciet.nic.in



 
  

शनिवार विशेष - दप्तरविना शाळा उपक्रम २०१७-२०१८

शनिवार  विशेष - दप्तरविना शाळा उपक्रम २०१७-२०१८

       

MDM

*MDM app वर OTP  न येण्याची समस्या दूर झाली असून OTP जनेरेट होत आहे*


*नवीन MDM App डाउनलोड केल्यावर सुरळीत सुरू होत आहे*




*पोषण आहार नवीन app डाउनलोड करा*

⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡


*नवीन app इनस्टॉल करण्यापूर्वी जुन्या app चा data application manager मधून क्लियर करा , नंतर जुना app uninstall करून नवीन app इनस्टॉल करा*

*नवीन पोषण आहार app खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा*

https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk


⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡



*नवीन मोबाइल वरुन MDM app वापरता येत नाही*


*नवीन मोबाईल वर MDM app वापरण्यासाठी खालील स्टेप वापरा*

➡ *नवीन मोबाईल मध्ये MDM app इनस्टॉल करा*



➡ *आता सरल मध्ये mdm पोर्टल ला login करा*

➡ *app setting या मेनू मध्ये जा*

➡   *change device मध्ये  जा*
*आता आपल्या शाळेसाठी आपण  वापरत असलेल्या अथवा रजिस्टर केलेल्या सर्व मोबाईल  नंबर ची यादी  दिसेल*

➡ *त्यातून आपला मोबाईल  नंबर निवडा*

➡ *त्याच्या समोर उजव्या बाजूला change device वर क्लीक करा*


➡ *you  are able to use new device असा नोटिफिकेशनचा मेसेज येईल*

➡ *नंतर MDM पोर्टल वरुन logout व्हा*

➡ *या नंतर आपण आपल्या नवीन मोबाईल वरून app रजिस्ट्रेशन करु शकाल*

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ.५ ते १० / अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती १ ली ते १० वी / ९ वी १० वी मट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2017~18 बाबत

*सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इ.५ ते १० / अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती १ ली ते १० वी / ९ वी १० वी मट्रिकपूर्व भारत सरकार शिष्यवृत्ती सन 2017~18 बाबत.*
                    *~ सूचना ~*

        सांगली जिल्हातील सर्व जि.प.शाळा. / विद्यालय / महाविद्यालय यांच्या मुख्याध्यापक / संबधित क्लार्क यांना सूचित करण्यात येते की, सन 2017~18 या शैक्षणिक वर्षांपासून समाज कल्याण विभागामार्फत  www.mahaeschol.maharastra. gov.in हे  संकेतस्थळ बंद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य यांनी दुसरे पोर्टल विकसित केले आहे.
ते दिनांक :- 1/08/2017 रोजी सक्रिय होईल. परंतु आपल्याला काही  महत्वाच्या सूचना देण्यासाठी हा sms पाठविण्यात येत आहे.
  या पोर्टल मध्ये बरेच बदल आहेत ते आपल्याला कार्यशाळा घेते वेळी समजावून सांगण्यात येतील.थोडक्यात काही बाबी पुढील प्रमाणे.
1) सन 2017~18 पासून  E~Scholership Site :- www. mahadbt.gov.in हे आहे.
2) विद्यार्थी बँक खाते क्रमांक हा आधार कार्ड शी संलग्न करणे.
3) विद्यार्थी आधार कार्ड हे मोबाईल न.शी संलग्न करणे.अनिवार्य. *:-मोबाइल न.आधार कार्ड शी संलग्न करण्यासाठी आपल्याला जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जाणे.*

टिप :- सन 2016-17 ची शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी काही वेळ लागेल. Ecs तयार करण्यासाठी website बंद असल्यामुळे.
 🙏🏻🙏🏻)
👉🏻 कृपया हा संदेश आपल्याकडे असलेल्या सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना / संबंधित काम करणा-या कर्मचा-याना पाठवा.ही.विनंती.🙏🏻
          राधाकिसन देवढे
 जिल्हा समाजकल्याण अधिकारी
 . .  . जिल्हा परिषद सांगली

MITRA APP

*अतिमहत्वाचे*

प्रति,
गटशिक्षणाधिकारी सर्व
केंद्र प्रमुख, सर्व
मुख्याध्यापक (सर्व)/शिक्षक (सर्व)
सर्व व्यवस्थापणाच्या सर्व माध्यमाच्या शाळा


विषय:- आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी MITRA App Download  करण्याबाबत
             उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास सूचित करण्यात येते कि, जि.प.शिक्षण विभाग मध्ये कार्यरत असणारी पर्यवेक्षिय यंत्रणा ते सर्व शिक्षक बंधु भगिनीना आवाहन करण्यात येते कि, मा.नंदकुमार साहेब.प्रधान शिक्षण सचिव.मा.धीरजकुमार साहेब.आयुक्त शिक्षण,यांच्या मार्गदर्शनात व आय टी.विभाग विभाग विद्याप्राधिकरण पुणे,एक स्टेप कम्युनिटी टिम.व राज्यभरातील उत्कृष्ट तंत्रस्नेही शिक्षक टिम या सर्वांच्या सहकार्याने तयार झालेले MITRA App  मा.शिक्षण मंत्री महोदयाच्या हस्ते अनावरण झाले आसुन सदरिल ॲप आता प्ले स्टोअर ला उपलब्ध असुन त्याची डायरेक्ट डाउनलोड ची लिंक खाली दिली आहे.

या ॲप मध्ये महाराष्ट्रातील तंत्रस्नेही शिक्षक,विद्याप्राधिकरण टिम,व एक स्टेप यानी एकत्रित येउन शालेय पाठ्यपुस्तकातील प्रत्येक वर्ग व विषय व पाठनिहाय दर्जेदार आभ्यासक्रम तयार केला आसुन तो आपणास आता मित्रा ॲप व्दारे मोफत उपलब्ध झालाय...

आपल्या केंद्रातर्गत कार्य करणार्या सर्व शिक्षकांनी तात्काळ हे ॲप आपल्या स्मार्ट फोन मध्ये डाउनलोड करुन घ्यावे.व आपल्या पंचायत समिती क्षेत्रातील सर्व शिक्षकाना हे ॲप डाउनलोड करण्यास सांगावे*
सदरिल काम आज दिवासभरात पुर्ण होईल हि आपेक्षा.

सदर अँप आपण येथून डाउनलोड करू शकता 👇.

https://play.google.com/store/apps/details?id=net.mavericklabs.mitra

गट
शिक्षणाधिकारी

जुने जनरल रजिस्टर नोंदी

शालेय शिक्षण  विभाग

जुने जनरल रजिस्टरमध्ये लिहा

◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टरच्या शेवटच्या नोंदीखाली पुढिलप्रमाणे शेरा लिहित आहे.
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील शेवटची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी बंद करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार जनरल रजिस्टर बुक क्र. ------------ मध्ये करण्यात येतील . ""


                                 मुख्याध्यापक सही
                                        व शिक्का



नवीन रजिस्टरच्या प्रारंभी लिहा

"या रजिस्टरमध्ये  पान न.... ते ..... पान न ...... अशी एकुण .... पृष्टे आहेत ...जनरल  रजिस्टर क्र .... पासुन नोंदी या मध्ये नोंदवण्यात येतील."
असे प्रमाणित करण्यात येत आहे .

 
◀शासन निर्णय दि.१९/०९/२०१६ नुसार दाखला(L.C.) व जनरल रजिस्टर  नमुना बदल शासन निर्णयाची अमलबजावणी संपुर्ण राज्यात , जिल्ह्यात व  तालुक्यात एकसुत्रता येण्यासाठी ...
सद्ध्या वापरात असलेले जनरल रजिस्टर आपण बंद करुन शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासुन सुधारीत नमुन्यातील रजिस्टर सुरु करत आहोत त्यासाठी आपल्या सद्ध्याच्या जनरल रजिस्टर बंद करुन नविन जनरल रजिस्टर सुरु करत आहे.
"" शासन निर्णय १९/०९/२०१६ सुधारीत दाखला आदेशानुसार या रजिस्टरमधील सुरुवातीची नोंद क्र -----------------असुन याठीकाणी हे रजिस्टर नोंदीसाठी सुरुवात करण्यात येत आहे . यापुढील नोंदी नवीन नमुन्यानुसार स्टुडंट आय -डी व युआयडी सह करण्यात येतील . ""
 


मुख्याध्यापक सही        शिक्का

Monday, 24 July 2017

शालेय आभिलेखे व जतन कालावधी

*शालेय अभिलेखे व जतन कालावधी*

शालेय अभिलेख्याचे पुढील प्रकार पडतात –
१) *विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे*

     दाखल खारीज रजिस्टर,
    पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
     जन्म प्रमाणपत्र फाईल,
     शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
     विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
     टी.सी. फाईल,
     टी.सी. जावक रजिस्टर,
     निकाल रजिस्टर,ग
     बढती रजिस्टर
     गळती रजिस्टर,
     मूल्यमापन नोंदवही,
     बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
     अपंग विद्यार्थी रजिस्टर


२) *शिक्षकांसंबंधी अभिलेखे*

    शिक्षक हजेरी रजिस्टर,
    पगारपेड रजिस्टर,
    शिक्षक सुचना रजिस्टर,
    शिक्षक हलचल रजिस्टर,
    शिक्षक रजेचे रजिस्टर,
    शिक्षक रजा अर्ज फाईल,
    वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
     मासिक अभ्यासक्रम प्रगतिपत्रक रजि.,
    पाठ टाचण वही,
     पगारपत्रक फाईल,
    मुख्याध्यापकांचे लॉगबुक



३) *आर्थिक अभिलेखे*

     स.शि.अ. रोकड रजिस्टर,
    स.शि.अ. खर्चाची पावती फाईल,
    स.शि.अ. लेजर रजिस्टर,
    सादील रोकड रजिस्टर,
    सादील खर्चाची पावती फाईल,
    सादील लेजर रजिस्टर,
    बांधकाम खर्चाची पावती फाईल,
    बांधकाम रोकड रजिस्टर,
    बांधकाम लेजर रजिस्टर,
    शाळा सुधार फंड रोकड रजिस्टर,
    शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
    धनादेश नोंद रजिस्टर

४) *शासकीय योजना अभिलेखे*

    मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
    मोफत गणवेश वाटप रजिस्टर,
    शालेय पोषण आहार रजिस्टर,
    उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
    उपस्थिती भत्ता देयके फाईल,
    अपंग शिष्यवृत्ती रजिस्टर,
    आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती रजिस्टर,
    दत्तक पालक योजना रजिस्टर


५) *जडवस्तुसंग्रह अभिलेखे*
(डेडस्टॉक रजिस्टर)

     जंगम मालपुस्तिका,
     सामान्य मालपुस्तिका रजिस्टर


६) *कार्यालयीन इतर अभिलेखे*

    पालक संपर्क रजिस्टर,
    आरोग्य तपासणी रजिस्टर,
    आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
    परीक्षा पेपर फाईल


अभिलेख जतन कालावधी
अ.क्र.  अभिलेख श्रेणी  अभिलेखाचे नाव  जतन करावयाचा कालावधी
(01)  अ  सर्वसाधारण प्रवेश नोंदवही / जनरल रजिस्टर  कायम
(02)  अ  फर्निचर, ग्रंथालय, प्रयोगशाळा साधनसामग्री इ. संग्रह नोंदवही  कायम
(03)  अ  परिपत्रके, आदेश फाईल  कायम
(04)  अ  भविष्य निर्वाह निधी लेखा नोंदवही  कायम
(05)  अ  मुख्याध्यापकाचे लॉगबुक  कायम
(06)  ब  रोकड वही / खतावणी (सादील / वेतनेतर अनुदान)  30 वर्षे
(07)  ब  कर्मचा-यांचे पगारपत्रक पावत्या, वेतनस्थिती  30 वर्षे
(08)  ब  विवरण पत्र – लेखा परीक्षित विवरणपत्रासह निरीक्षण अहवाल  30 वर्षे
(09)  ब  नेमणूक केलेल्या शिक्षकांकडून मिळालेली कार्यमुक्ती प्रमाणपत्र  30 वर्षे
(10)  ब  रोकड वही / खतावणी (स.शि.अ.)  30 वर्षे
(11)  ब  विद्यार्थी संचयी नोंदपत्रक  30 वर्षे
(12)  ब  सेवा पुस्तिका  कर्मचारी शाळेत काम करीत असेपर्यंत व नंतर 2 वर्षे
(13)  क-1  इतर शाळेकडून मिळालेली शाळा सोडल्याची प्रमाणपत्रे  10 वर्षे
(14)  क-1  शाळा सोडल्याचे दाखले  10 वर्षे
(15)  क-1  फी, पावतीपुस्तके / फी वसुली नोंदवही  10 वर्षे
(16)  क-1  आकस्मिक खर्च नोंदवही, बिले प्रमाणके  10 वर्षे
(17)  क-1  विद्यार्थी व कर्मचारी हजेरी पत्रके  10 वर्षे
(18)  क-1  वसतिगृह खोलीभाडे नोंदवही  10 वर्षे
(19)  क-1  महत्त्वाच्या स्वरूपाचा संकीर्ण पत्रव्यवहार  10 वर्षे
(20)  क-1  फी माफी व शिष्यवृत्तीसाठई केलेले अर्ज आणि विविध सवलती बिलांच्या कार्यालय प्रती  10 वर्षे
(21)  क-1  सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन नोंद वही (वार्षिक नोंदी बाबत)  10 वर्षे
(22)  क-2  जमा खर्च दर्शविणारी खातेवही व सत्र फीसाठी वेगळी खातेवही  5 वर्षे
(23)  क-2  आवक-जावक नोंदवह्या व मुद्रांक (तिकिट) हिशोब  5 वर्षे
(24)  क-2  रोकडवही (शा. पो. आ.)  5 वर्षे
(25)  क-2  शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ / माता पालक संघ इतिवृत्त नोंदवही  5 वर्षे
(26)  ड  सर्व वर्गांच्या मूल्यमापन उत्तरपत्रिका (विद्यार्थ्यांना परत न करावयाच्या)  18 महिने
(27)  ड  शिक्षक व अन्य कर्मचा-यांचे नैमित्तिक रजेचे अर्ज  18 महिने.

UDISE शोध

💢💢💢💢💢💢💢💢💢💢



*आपल्याला महाराष्ट्रातील शाळांचा  UDISE code शोधण्यासाठी www.depmahaonlinemis.com ही website काम करत नसल्यामुळे सध्या UDISE code शोधता येत नाही*



*महाराष्ट्रातील कोणत्याही शाळांचा UDISE कोड कसा शोधावा हे पाहूया*



http://schoolreportcards.in/SRC-New/LocateSchool/LocateSchool.aspx



➡ *सर्वप्रथम वरील लिंक वर क्लिक करा*
        click link here


➡ *आपल्या समोर जी स्क्रीन येईल त्यात State महाराष्ट्र निवडा , District निवडा , तालुका निवडा व फक्त Village मध्ये जो गाव आपल्याला हवा असेल तो निवडा*



➡ *खाली सर्चची 🔍 image असेल त्याच्यावर क्लिक करा*



➡ *आपल्या समोर त्या गावातील सर्व शाळांचे UDISE कोड दिसतील*

पायाभूत चाचणी

पायाभूत चाचणी  नवीन बदल

      CLICK  HERE 
 
 
*प्रगत चाचणी च्या पुन्हा वेळात बदल*

*वेळेत बदल  नोंद घ्यावी*

7 सप्टेंबर 12 सप्टेंबर 2017

संचालक पुणे यांचे पत्र आज चा पत्र
दिनांक: 10 ऑगस्ट 2017
👆



***************************************************







---------------------------------------------------
  जुनी post
*📚पायाभूत चाचणीचे वेळापत्रक जाहीर
Maharashtra Times | Updated Jul 24, 2017, 04:00 AM IST

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीचे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार पहिली ते ८वीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी १८ ते १९ ऑगस्टदरम्यान होणार असल्याचे विद्या परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता १ली ते ८वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात तीन शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नववी इयत्तासाठी नैदानिक चाचणी घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा प्रकल्प असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना भाषा, ३री ते ५वीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, इंग्रजी विषय असणार आहे. ६वी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये प्रथम भाषा, गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषय असणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे. नववी इयत्तेची नैदानिक चाचणी परीक्षा १८ आणि १९ आगॅस्ट २०१७ या कालावधीमध्ये होणार आहे. या पायाभूत चाचणीत प्रश्नपत्रिका १९ जुलैनंतर सर्वत्र पाठविण्यात येणार आहे. या प्रश्नपत्रिका शाळांमध्ये परीक्षा सुरू होण्याच्या २ ते ३ दिवस आधी पोहोचावी याची दक्षता घेण्यात यावी, असे परिषदेतर्फे म्हटले आहे.
➖➖➖Ⓜ💲🅿➖➖➖

Saturday, 22 July 2017

प्रगती चाचण्या 2017-2018

  *हा १४ जुलै २०१७ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयाचा सारांश होय.*

✍🏻 *२२ जुन २०१५*च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्यात *प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र*(PSM) नावाचा कार्यक्रम इयत्ता १ ली ते ८ वी साठी लागू करण्यात आला. हाच शासन निर्णय १४ जुलै २०१७ च्या शासन निर्णयाचे अधिष्ठान होय.

👉🏻सन २०१६-१७ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वीच्या भाषा व गणित विषयाच्या १) पायाभूत चाचणी (baseline test), २) संकलीत चाचणी-१ (summative test), ३) संकलित चाचणी -२ अशा  तीन चाचण्या घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांच्या ऐकूण गुणांची नोंद
देशपातळीवर शैक्षणिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केले जातात. त्यामध्ये NCERT (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली) ही शासकीय संस्था NAS (National Achievement Survey) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करत असते तसेच प्रथम नावाची सेवाभावी (NGO) संस्था ASER (Annual Status of Education report) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करत असते. तसेच राज्यस्तरावर SCERT (विद्या प्राधिकरण अर्थात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे) ही संस्था SLAS (State Level Achievement Survey) नावाचा शैक्षणिक सर्वेक्षण अहवाल सादर करीत असते. या विविध अहवालावरून भाषा, इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांच्या संपादणूकीचा स्तर टक्केवारीच्या रुपात प्रसिद्ध केला जातो व त्यानुसार पुढील दिशा व कार्यक्रम ठरवला जातो.

👉🏻सन २०१६-१७ मधील सरल प्रणालीमधील संकलित माहितीच्या आधारे आलेले निष्कर्ष विचारात घेवून सन २०१७-१८ मधील प्रगत चाचण्यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

*मा. मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांचे स्वप्न – राष्ट्रीय पातळीवरील विवध संस्थांच्या मुल्यामापनात महाराष्ट्राचा कक्रमांक प्रथम तीन मध्ये यावा.*

✍🏻 *सन २०१७-१८ मधील प्रगती चाचण्यांचे स्वरूप*–👇🏻

१) सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या इ.१ली ते ८ वीच्या सर्व विद्यार्थ्यासाठी चाचण्या असतील.
२) वर्षभरात ३ चाचण्या राज्य स्तरावरून प्रश्नपत्रिका पुरवून घेतल्या जातील.
३) *पहिली चाचणी* ही पायाभूत चाचणी (baseline) असेल. ही चाचणी प्रथम सत्रात सुरुवातीला घेतली जाईल व या चाचणीत मुलभूत क्षमता व मागील इयत्तेपर्यंतच्या क्षमता यावर आधारित प्रश्न असतील.
४) *दुसरी चाचणी*  ही प्रथम सत्राच्या अखेरीस घेतली जाईल व ती *संकलित चाचणी – १* (summative) या नावाने ओळखली जाईल. या चाचणीत मुलभूत क्षमता व प्रथम सत्रापर्यंतच्या क्षमता यांवर आधारित प्रश्न असतील.
५) *तिसरी चाचणी* ही *संकलित चाचणी-२* या नावाने ओळखली जाईल व या चाचणीत मुलभूत क्षमता व प्रथम सत्रातील काही क्षमता व दुसऱ्या सत्रातील क्षमता यांवर आधारित प्रश्न असतील.
६) *मुलभूत क्षमता* म्हणजेच वाचन, लेखन, संख्याज्ञान (ऐकून संख्या लिहिणे, संख्यांची तुलना, संख्येचे विस्तारित रूप, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत) व संख्यांवरील क्रिया (बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार) अशा एकूण *१० क्षमतांचा* समावेश केलेला आहे.
७) या मुलभूत क्षमता प्रथम भाषा व गणित या विषयासाठी व इ.१ली ते ८ वी साठी असतील.
८) या व्यतिरिक्त शिक्षकांना करावयाचे अकारिक मूल्यमापन (formative) करावे लागणार आहे.

👉🏻 *कोणकोणत्या वर्गासाठी कोणकोणत्या विषयाची चाचणी होईल?*

*इ. १ ली व २ री साठी* – प्रथम भाषा व गणित (२ विषय)
*इ. ३ री ते ५ वी साठी* - प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा) व गणित (३ विषय)
*इ. ६ वी ते ८ वी साठी* - प्रथम भाषा, इंग्रजी (तृतीय भाषा), गणित व विज्ञान (४  विषय)

✍🏻 *कार्यवाही*
१) चाचण्यांचे गुण शिक्षकांनी अप्लिकेशन मध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाईन भरायचे आहेत. हे अप्लिकेशन सरल प्रणालीशी जोडलेले असल्याने ते गुण आपोआप सरल प्रणालीत जातील.
२) शिक्षकांना ताबडतोब वर्गाचा निकाल कळेल.
३) वरिष्ठ कार्यालय निकालाची कोणतीही हार्डकॉपी मागणार नाही.

👉🏻 *विद्यार्थी प्रगत झाला हे कसे ठरवणार (निकष)*–
विद्यार्थ्याने वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत.

✍🏻  *वर्ग प्रगत झाला हे कसे ठरवणार (निकष)* –
वर्गातील सर्व विद्यार्थ्यानी वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्षमतांमध्ये एकूण गुणांच्या ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत.

✍🏻 *शाळा प्रगत झाली हे कसे ठरवणार (निकष)*–
प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन, लेखन, संख्याज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या मुलभूत क्षमतांपैकीप्रत्येक क्षमतेमध्ये ७५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले पाहिजेत आणि एकूण गुणांपैकी ६० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास ती शाळा प्रगत समजली जाईल.

😎 *पर्यवेक्षण*–
१) प्रत्येक चाचणीच्या वेळी प्रत्येक दिवशी प्रत्येक शाळेवर कोणी ना कोणी पर्यवेक्षीय किंवा वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहील व ती चाचणी त्याने घेतली असे समजले जाईल.
२) DIECPD चे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता तसेच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख हे चाचणीच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित असतील.
३) १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णय नुसार केंद्र स्तरावर प्रगत शाळांतील उत्कृष्ठ शिक्षकांचा CRG ग्रुप समूह संसाधन गट बनवला जाईल.
४) पायाभूत चाचणी नंतर १ महिन्याच्या आत केंद्रप्रमुख CRG ग्रुप समूह संसाधन गट यांच्या मदतीने केंद्रातील सर्व शाळांच्या सर्व इयत्तांच्या सर्व विद्यार्थ्यांची पडताळणी चाचणी घेण्यात येईल.
५) दोन्ही चाचणीतील तफावत पहिली जाईल. *तफावत २० टक्के पेक्षा जास्त* असल्यास शिक्षकांना ज्ञापन (नोटीस) देवून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी कालबद्ध उद्दिष्ट दिले जाईल.
६) शिक्षक व केंद्रप्रमुख दोघेही वास्तव मूल्यमापन करत नसतील तर राज्यस्तरावरून तपासणी करण्यात येईल.
७) पडताळणी नंतर मुलभूत क्षमतेत ७५ टक्के पेक्षा कमी गुण व वर्ग पातळीवरील क्षमतेत ६० टक्के पेक्षा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय याद्या बनवायच्या आहेत.
८) अशा अप्रगत मुलांना विशेष मदत करावयाची आहे.
९) अशी अप्रगत मुले प्रगत होई पर्यंत *दर महिन्याला* शिक्षकाने चाचणी घ्यावयाची आहे.
१०) अनियमित मुले प्रगत नसतील तर त्यांचा पण या यादीत समावेश करावयाचा आहे.
११) चाचणीच्या दिवशी गैरहजर राहणाऱ्या मुलांना शून्य गुण द्यावयाचे आहेत अन्यथा त्यांना शाळेत आणून वन्य दिवशी चाचणी घेवून गुणदान करावायचे आहे.
१२) अशी अप्रगत मुले प्रगत झाल्या नंतर त्यांना मासिक चाचणीतून वगळावयाचे आहे.

👍 *शिक्षांकासाठी प्रोत्साहनपर योजना* –
१) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ८० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस *अभिनंदन पत्र*
२) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ६० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस *गुणवत्ता वाढीच्या सूचनेसह उत्तेजनार्थ पत्र*
३) एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ४० टक्के पेक्षा जास्त गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता उंचावण्यासाठी *प्रेरित करणारे पत्र*
४)  एकूण गुणांपैकी सर्व विद्याथ्यांना ४० टक्के पेक्षा कमी गुण असल्यास शिक्षक व शाळेस गुणवत्ता वाढीसाठी *निश्चित उद्दिष्ट देणारे पत्र*

👌🏻 *प्रश्नपेढी व मित्र अप्लिकेशन*–
शिक्षकाने दर महिन्याला चाचणी घेण्यासठी विद्या प्राधिकरण (SCERT,पुणे) यांच्या संकेतस्थळावर मित्र MITRA (Mahrashtra In-service Teacher Recourse App) दिले जाईल ते इंस्टाल करून वापर करावा.

😟 *गुणावता विकासाची जबाबदारी फिक्स*– शिक्षक,मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, DIECPD चे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता तसेच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख या सर्वांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन PAR (Performance Appraisal Report) निर्गमित केला जाईल त्यात शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक यांच्यासाठी वर्गातील / शाळेतील विद्यार्थी संपादणूक हा दर्शक (इंडिकेटर) असेल तर पर्यवेक्षीय अधिकारी यांच्यासाठी कार्यक्षेत्रातील शाळा / विद्यार्थी यांची संपादणूकह हे महत्वाचे दर्शक असतील.

☺😊 🤝 *चला तर शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे जबादारीने नियोजन करून अंमलबजावणी करूया महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्या प्रगत बनवूया. देश घडवूया*

प्रगती चाचण्या २०१७-२०१८

 
         *पहिली ते आठवीसाठी नैदानिक ऐवजी “प्रगती चाचण्या’*

*पुणे,दि.12 (प्रतिनिधी)- राज्यात आतापर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या नैदानिक चाचण्यांऐवजी प्रगती चाचण्या घेण्यात येणार आहेत. भाषा आणि गणित या विषयांबरोबर विज्ञान आणि इंग्रजी या विषयांचाही या प्रगती चाचणीत समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रगत विद्यार्थ्यांची व्याख्याही बदलण्यात आली असून आता 75 टक्‍के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्रगत समजले जाणार आहे.*
*शिक्षण हक्‍क कायदा आल्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीसाठी नापास न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर दोन ते तीन वर्षापूर्वी शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांच्या नैदानिक चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता यामध्ये बदल करत प्रगती चाचण्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चाचण्या नैदानिक प्रमाणेच आहेत मात्र प्रगती चाचण्यांमध्ये विषयांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.*
*प्रगती चाचण्यांतर्गत नैदानिक प्रमाणेच पायाभूत, संकलित मुल्यमापन एक व दोन अश्‍या तीन चाचण्या घेण्यात येणार आहेत. मात्र नैदानिक चाचण्या या केवळ भाषा आणि गणित विषयांच्या घेण्यात येत होत्या. प्रगती चाचण्या या इयत्ता पहिली व दुसरीच्या प्रथम भाषा व गणित, तिसरी ते पाचवीच्या भाषा, गणित व इंग्रजी भाषेच्या घेण्यात येणार आहेत तर इयत्ता सहावी ते आठवीच्या प्रथम भाषा, गणित, इंग्रजी आणि विज्ञानाच्या घेण्यात येणार आहे.*

*नैदानिक चाचण्यांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरले जात असले तरीही ते सर्वत्र जाहीर केले जात नव्हते. मात्र आता पुढील काळात प्रत्येक पातळीवर विद्यार्थ्याला मिळालेले गुण हे जाहीर केले जाणार आहेत.*


▶ *राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ऑनलाईन समजणार*📶

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Online admission form-2017 -2018 z p school no.1dighanchi

Online  admission form 2017-2018 z.p.school dighanchi no.1,tal.atpadi, dist.-sangli
   click link
   
       https://goo.gl/forms/gcGMFOR83PDkjSd33