पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 5 December 2016

आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्मिती Link

*महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दीपस्तंभ शाळा निर्मितीसाठी अर्ज*

राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाला राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६  च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे.  राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची यानिमित्ताने आपणास संधी मिळाली. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयाच्या ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांची शाळा संकल्पना पत्रात  दिलेले निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  संकल्पना पत्र (Concept Note) विद्या प्राधिकरणाच्या www.mscert.org.in पाहता येईल.

तर दिपस्तंभ शाळेसाठीचे निकष पूर्ण करणा-या शाळांनी  https://www.research.net/r/maharashtrainternationalschools लिंकवर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

No comments :

Post a Comment