पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Monday, 15 October 2018

संकलित चाचणी 1 सन 2018-19

संकलित चाचणी 1 सन 2018-19 शाळास्तरावर घेणे बाबत आज निघाले परिपत्रक

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19

ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 महत्वाचे,
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 संबधीत संपुर्ण माहिती अंतीम करण्याबातची कार्यवाही       
       (FORWARD & FINALIZED) दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत पुर्ण करणे बाबत.
संदर्भ:- मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य्‍ यांचे राज्यस्तरीय विशेष बैठक, दिनांक-06.10.2018 मधील सुचना.

उपरोक्त संदर्भिय बैठकीतील मा.सचिव, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य यानी दिलेल्या सुचनेनुसार शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत सर्व मनपा / जि.प. / सर्व माध्यमांच्या खाजगी शाळांची सन  2018-19 या शैक्षणीक वर्षाकरीता सरल प्रणालीदवारे तयार करण्यात येणा-या ऑनलाईन संचमान्यतेची शाळांनी फ़ॉरवर्ड केलेली माहीती क्लस्टर लॉगीन वरुन दिनांक-18.10.2018 रोजीपर्यंत अंतीम करण्याची कार्यावाही पुर्ण करावयाची आहे.
त्याअनुषंगाने मुख्याध्यापक-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी लॉगीन वरुन खालील महत्वपुर्ण बाबी पुर्ण करण्यात याव्यात.
मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही
१) मुख्याध्यापकांनी आपले शाळा पोर्टल मधील सर्व माहिती 100% FINALIZED करावी.
२) मुख्याध्यापकांनी आपले विदयार्थी पोर्टल मधील विदयार्थी प्रमोशन, REQUEST –TRANSFER & APPROVED, NEW ENTRY, ETC. या सर्व बाबींची पुर्तता करुन दिनांक-04.10.2018 रोजीची अंतीम वर्गनिहाय विदयार्थी संख्या ही SANCHMANYATA TAB मधील REPORT 2018-19 या टॅब अंतर्गत केंद्रप्रमुख लॉगीनला FORWARD TO SANCHMANYATA या टॅब दवारे माहिती पाठविली जावी.
३) मुख्याध्यापकांनी वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती अंतीम केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्या FINALIZED करावी. सदरील माहिती केंद्रप्रमुख लॉगीनला AUTO FORWARD होईल.
केंद्रप्रमुखांनी करावयाची कार्यवाही ∙
१) क्लस्टरने केंद्रातर्गत शाळांनी पाठविलेली स्कुल पोर्टलची माहितीची पुर्नपडताळणी करुन ती 100% FINALIZED करावी. शाळांनी नोंदविलेली चुकीची माहिती REJECT करावयाची सुविधा क्लस्टर लॉगीनला उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ज्या शाळांची माहिती क्लस्टर लॉगीन वरुन REJECT केली जाईल त्या शाळा मुख्याध्यापकांना याबाबत वैयक्तिक संपर्क साधुन अवगत करावे व तात्काळ अचुक माहिती नोंदणी करुन पुनश्च माहीती क्लस्टर लॉगीनला फॉरवर्ड करुन घेतली जावी.
२) क्लस्टर ने आपले स्टुडंट पोर्टल लॉगीन वरील SANCH MANYATA TAB मधील VERIFY SCHOOL टॅब अंतर्गत आलेली शाळांची वर्गनिहाय विदयार्थी संख्येची अचुक पडताळणी (संदर्भ दिनांक-04.10.2018) अधिकृत अभिलेख्यांच्या आधारे करुन त्यातील योग्य ती विदयार्थी संख्या गटशिक्षणाधिकारी लॉगिनला FORWARD करावी. *जे विदयार्थी प्रत्यक्ष शालेय पटावर नसतील अशा विदयार्थ्यांना REMOVE करण्याची सुविधा देखील क्लस्टर यांचे लॉगीनला देण्यात आलेली आहे. सदर REMOVE केलेले विदयार्थी वगळता उर्वरीत विदयार्थी संख्या हीच गटशिक्षणाधिकारी लॉगीनला दिसून येईल.* क्लस्टरने  केंद्रांतर्गत मनपा शाळांसाठी GROUP FORWARD FOR SANCHMANYATA या टॅब चा वापर करुन क्लस्टर मधील सर्व शाळांची एकत्रित संचमान्यता  शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनला FORWARD करता येईल. मात्र खाजगी व्यवस्थापनाच्या  शाळांची माहिती प्रत्येक शाळानिहायच FORWARD करावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
३) क्लस्टर प्रमुखाने वरील दोन्ही (शाळा-विदयार्थी) पोर्टल मधील माहिती संदर्भातील कार्यवाही पुर्ण केल्यानंतर संचमान्यता पोर्टल लॉगीन करुन त्यावर शाळा मुख्याध्यापकांनी FORWARD केलेली दिनांक-01.10.2018 रोजीची कार्यरत असलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर FINALIZED करावी. सदरील माहिती लॉगीनला AUTO FORWARD होईल.
·         गटशिक्षणाधिकारी यांनी करावयाची कार्यवाही ∙
१)      केंद्रप्रमुखांनी FINALIZED करुन गशिअ स्कुल पोर्टलला FORWARD केलेली सन 2018-19 या वर्षातीत अंतर्गत शाळांची माहिती FINALIZED करावी. सदर कार्यवाही करीत असतांना ज्या शाळांची वर्गवाढ अदयापावेतो शाळा लॉगीनला प्रलंबीत आहे अशा शाळांसाठी दिनांक-13.10.2018 पर्यंत याकार्यालयाचे पुढील सुचनेची प्रतीक्षा करावी.
२)      गटशिक्षणाधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉगीनला केंद्रप्रमुखांनी पडताळणी करुन *ज्याशाळेचे विदयार्थी REMOVE केलेले आहेत अशाच शाळा दिसून येणार आहेत. सदरील शाळेतील REMOVE केलेल्या विदयार्थ्यांना वगळणे अथवा समावेशीत करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना आहेत. ज्या शाळांचे एकही विदयार्थी केंद्रप्रमुखांनी REMOVE केलेला नाही अशा शाळांची विदयार्थी संख्या ही केंद्रप्रमुख लॉगीनवरुनच सरल प्रणालीमार्फत संचमान्यते करीता अंतीम धरण्यात येईल.*
३)      केंद्रप्रमुखांनी संचमान्यता पोर्टलला अंतीम केलेली शिक्षक-शिक्षकेतर (TEACHING-NON TEACHING) कर्मचारी संख्येची पडताळणी करुन ती अचुक असल्याची खात्री झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी संचमान्यता लॉगीन वरुन FINALIZED करावी.
         उपरोक्त नमुद सुचना-मार्गदर्शनानुसार संबधीत जबाबदारी सोपविलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपल्या (स्कुल-स्टुडंट-संचमान्यता) लॉगीन वरील कामाचे स्वरुप समजुन घेवून खालील वेळापत्रकानुसार कार्यवाही करणे बंधनकारक राहील. दिलेल्या विहित मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीमुळे शाळेच्या ऑनलाईन संचमान्यतेवर विपरित परिणाम झाल्यास सर्वस्वी जबाबदारी संबधीत लॉगीन प्रमुखांची राहील याची गांर्भियाने नोंद घ्यावी.
उपरोक्त सुचना गट तथा केंद्रस्तरावरुन अंतर्गत सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापकांना तात्काळ अवगत करुन देण्यात याव्यात. केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी यांनी उपरोक्त ऑनलाईन कार्यवाही दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पुर्ण करण्यासाठी अधिनस्त तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन विहित मुदतीत काम पूर्ण करावे.
ऑनलाईन संचमान्यता सन 2018-19 माहिती नोंदणी FORWARD & FINALIZED करण्यासाठीचे वेळापत्रक-

१) शाळा लॉगिन मधून केंद्र प्रमुख लॉगिन ला शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती फॉरवर्ड करणे :-    दिनांक 04/10/2018 ते दिनांक 15/10/2018.
२) केंद्र प्रमुख लॉगिन मधून शाळेने पाठविलेली शाळा-विद्यार्थी-संचमान्यता माहिती अंतिम करणे :-  दिनांक-04/10/2018 ते दिनांक- 18/10/2018.
वरील वेळापत्रक तथा सुचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात यावी.
मा. प्रशासकीय अधिकारी यांचे आदेश

Wednesday, 10 October 2018

शाळासिध्दी 2018-19

🌷शाळा सिद्धी🌷

🌷🌷🌷🌷🌷🌷
*शाळासिद्धी  नवीन बदल*
 सर्व शिक्षक बंधू भगिनीना कळवण्यात येते कि   पूर्वी
प्रत्येक क्षेत्राला वेगवेगळे  गुण असे होते त्यात
बदल करून सर्वच क्षेत्रांना समान गुण करण्यात आले आहेत
तसेच
क्षेत्र 1मध्ये  उपलब्धता व उपयोगीत असे 2  भाग होते तेथे  उपयोगीता हा इतर क्षेत्रा प्रमानेच ठेवण्यात आला आहे
या गुणांकनाव्यतीरिक्त 
  शाळा सिद्धीच्या रेकाँर्ड मध्ये कोणताही बदल नाही
46 मानके गुणीले 3=138 गुण
138पैकी 112 गुण पडल्यास
आपल्या शाळेस
अ श्रेणी प्राप्त होईल
आता
 ★ 999 ऐवजी 138 गुणांचे       मूल्यांकन असेल .
क्षेत्र क्रमांक 1 - उपलब्धतेच्या स्तरावर  गुण द्यायचे नाहीत. केवळ उपयुक्ततेच्या स्तरावर गुण द्यायचे आहेत.

* सर्व क्षेत्रासाठी गुणदान -
1ला स्तर - 1 गुण(46 × 1= 46)
२रा स्तर -  2 गुण(46 × 2= 92)
३ रा स्तर - 3 गुण(46×3=138 )
याप्रमाणे..... 46 गाभा मानकांसाठी गुणदान होईल ।
आता केवळ 3 ग्रेड असतील.

81% ते 100 % - A Gread
50% ते80 %.   - B Gread
50 %  पेक्षा कमी - C Gread
या प्रमाणे ......
 *7 क्षेत्र  व 46 गाभा मानकात काहीच बदल नाही केवळ गुणांकनात बदल आहेत.

सन 18 /19 साठी माहिती
🙏🙏🙏🙏🙏



**************************************
🌷शाळासिध्दी 🌷

 2018/ 19 साठी शाळासिद्धी पोर्टल माहिती भरण्यास सुरवात
🌷🌷🌷👍👍👍
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन

*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित  करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे. आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी.
🌷🌷🌷🌷👍
 महत्वाचे
 सन 2018/ 19
 साठीची माहिती भरण्यास  सुरवात  करावे
 पट निश्चीता झालेली समजले की आपला पट खात्री करून फायनल सबमिट करा
 🙏🙏🙏🙏🙏🙏
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.
बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच

*स्टाफ पोर्टल महत्वाचे*

*स्टाफ पोर्टलवर शिक्षक डीटॅच आणि अटॅच  ही  सुविधा उपलब्ध झाली  आहे*.

*डीटॅच*

१)बदलीपुर्वीच्या शाळेतुन आगोदर डिटॅच व्हावे .
२)डीटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .
४) बदली झालेल्या सर्व शिक्षकाना मुख्याध्यापकानी डीटॅच करुन बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करणे आवश्यक आहे .

*अटॅच*
१)बदली झालेल्या नविन  शाळेत आगोदर अटॅच व्हावे .
२) अटॅच  झाल्यानंतर बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे .
३)बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करुन घ्यावे .

*अटॅच व्हेरीफिकेशन*
*शिक्षक अटॅच झाल्यानंतर बीईओ लॉगिनवरुन व्हेरीफाय करावे लागते परंतु ज्या शाळेत आपण अटॅच होत आहात त्या शाळेतील बदलीपुर्वीचे शिक्षक डीटॅच व्हेरीफाय न झाल्यामुळे आपण अटॅच होण्यास अडचण येत आहे म्हणुन मुख्याध्यापक यानी आपल्या शाळेतुन बदलीने गेलेल्या सर्व शिक्षकाना डीटॅच करुन बीईओ लॉगिनला फॉरवर्ड करावे म्हणजे आपणास अटॅच व्हायला अडचण येणार नाही*

या प्रोसेस ने आपन डीटॅच व अटॅच ही प्रोसेस करुन घेवु शकतोत .

अनेकवेळा स्टाफ पोर्टलवरील आपले फॉर्म व्हेरीफाय झालेले नसतात त्यावेळी आपणाल डीटॅच ला प्रॉब्लेम येवु शकतो त्यामुळे सर्व फॉर्म व्हेरीफाय करुनच डीटॅच व्हावे . याची जबाबदारी स्वत: घ्यावी कारण चुकिचे फॉर्म व्हेरीफाय केल्याने भविष्यात अडचणी येवु शकतात . सर्व काम खात्रीशीर करावे .


Tuesday, 9 October 2018

संचमान्यता फॉरवर्ड करण्यापूर्वी खालील कामे पूर्ण करा*

30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता

*♦30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता निकष ♦* 👆🏻

       सर्व शिक्षक बांधवांना माहीतीस्तव कळविण्यास येते की,सध्या  अस्तित्वात असलेल्या  आपल्या शाळांमध्ये शिक्षक संचमान्यता शासनाच्या *28 ऑगस्ट 2015* च्या जी.आर.नुसार पुढीलप्रमाणे आहे.तरी आपल्या शाळेतील पद कमी होणार नाही किंवा कसे वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती.
*🔸प्राथमिक शाळा -1ते4/1ते5 साठी निकष 🔸*
1)सर्व विद्यार्थी *मिळुन 60 पर्यंत -2 शिक्षक.*
2)60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास *प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक.*
3)1ते4 किंवा 1ते5 मध्ये *वर्ग 3 किंवा 4 किंवा 5 मध्ये 20 विद्यार्थी* असतील तर अतिरिक्त 1 शिक्षक.
4) *मुख्याध्यापक मान्य पदासाठी*
 1ते4 किंवा 1ते 5 ची पटसंख्या 136 असावी.
*🔸उच्च प्राथमिक शाळा :-5ते7 किंवा 6ते8 साठी निकष 🔸*
1)तिनही वर्ग मिळुन *36 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक* (1गणित/विज्ञान, 1भाषा,1सामाजिक शास्त्र)
2)विद्यार्थी संख्या *105 पेक्षा जास्त असल्यास 35 च्या* पटीने 1 अतिरिक्त शिक्षक
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी संख्या आवश्यक
*🔸माध्यमिक शाळा -9वी ते 10 वी साठी निकष 🔸*
1) 9 वी 10 वी चे विद्यार्थी मिळुन *40 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक*(1भाषा,1गणित/विज्ञान, 1सामाजिक शास्त्र )
2)9 वी किंवा 10 वी कोणत्याही एका वर्गामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 1 अतिरिक्त शिक्षक.
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी असावेत.
*🔸संयुक्त शाळा -1ते7/1ते8/1ते10 असल्यास-मु.अ. पदासाठी निकष 🔸*
1) *101 विद्यार्थी संख्येस मुख्याध्यापक पद मान्य.*
टिप:-1)नवीन शाळा किंवा नवीन वर्ग ओपन करायचे असतील तर वेगळे निकष आहेत.
2)वरील निकष हे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष आहेत.
*3)जर शाळा 1ते7 किंवा 1ते8 किंवा 1ते10 किंवा 5ते 8 किंवा 8 ते10 असेल तर त्या  शाळेत फक्त 1 च मुख्याध्यापक पद मान्य असेल.*
4) 5 ते7 किंवा 6 ते 8 या वर्गांसाठी *प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे* पहिले पद गणित/ विज्ञान, दुसरे पद भाषा व तिसरे पद सामाजिक शास्त्र या विषयाचे जी.आर.नुसार.

शाळासिध्दी

🍁 *शाळासिध्दी* 🍁
शाळासिध्दी कार्यक्रमाचे दोन टप्पे आहेत.
1) स्वयंमूल्यमापन
2) बाह्यमूल्यमापन

*स्वयंमूल्यमापन*
1) सन 2015-2016 या वर्षी आपण शाळा स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
2) सन 2016 - 2017 या वर्षी देखिल आपण राज्यातील जवळपास 100 टक्के शाळांचे स्वयंमूल्यमापन केलेले आहे.
3) सन 2017- 2018 ची माहीती भरण्याची गरज नाही कारण वेबपोर्टल अपडेशन व NUEPA नवीदिल्ली यांचे धोरणानुसार सन 2016-17 व 2017- 18 ची माहीती एकत्रित  करण्यात आलेली आहे.( आपण www.shaalasidhhi.nuepa.org या वेबपोर्टल मध्ये सदर माहीती 2016-2018 अशी झालेली पाहू शकता. )
4) सन 2018-2019 ची स्वयंमूल्यमापनाची माहीती आपणास भरावयाची आहे. करीता शिक्षक निश्चिती व विद्यार्थी पट निश्चिती होणे आवश्यक आहे. आपल्या शाळेची माहीती भरण्यासाठी वेबपोर्टल हे 365 दिवस सुरुच आहे. आपल्या शाळेचा पट 30 सप्टेंबर या संदर्भ दिनांकावर निश्चित झाला म्हणजे आपण आपली माहीती सबमिट करावी.
वरील सर्व बाबींसाठी शाळासिध्दी वेबपोर्टलवरील सूचनांचा वापर करावा.

( *बाह्यमूल्यमापन*- शाळांच्या बाह्यमूल्यमापनासाठी संपूर्ण देशातील शाळांचा (जवळपास पंधरा लक्ष) समग्र विचार करुन बाह्यमूल्यमापनाची पध्दती व टॅब वेबपोर्टलवर दिला जाणार आहे. यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.)

attach व detach टॅब ऍक्टिव्ह

स्टाफ पोर्टल मध्ये attach व detach टॅब ऍक्टिव्ह झाला आहे तसेच End of service हा टॅब ही active झाला आहे तरी शाळांनी आपल्याकडे असलेला कार्यरत staff हा स्टाफ पोर्टल मध्ये तात्काळ अद्यावत करून घ्यावे आपल्या शाळेतील सध्या कार्यरत असलेला व शालार्थ id असलेल्या स्टाफ ची माहिती स्टाफ पोर्टल मध्ये भरण्याची जबाबदारी त्या शाळेची असेल कारण पवित्र पोर्टल द्वारे आता नवीन शिक्षक हा स्टाफ पोर्टल मध्ये येणार आहे
                    

संचमान्यता

संचमान्यता

Mdm

*सूचना*
*पालघर सांगली जळगाव बुलढाणा अकोला वाशिम*
*जिल्ह्यातील शाळांच्या बँक खात्यावर माहे एप्रिल व जून 2018 महिन्याचे इंधन व भाजीपाला अनुदान वर्ग झालेले आहे*
*सर्व शाळांनी नोंद द्यावी*