पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Sunday, 26 August 2018

प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे?

प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे?

💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢
*🔸 पायाभूत चाचणी 2017 - 2018 🔸*

*🔵 प्रगत विद्यार्थी कोणाला समजावे? 🔵*
💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢🍀💢

*(संदर्भ - 14 जुलै 2017 चा शासन निर्णय)*

*मित्रांनो आजपासून या शैक्षणिक वर्षांतील पायाभूत चाचणी सुरू झाली आहे. या पायाभूत चाचणी मध्ये खालीलप्रमाणे किमान गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रगत समजले जाईल.*

*इयत्ता*   *किती गुणाला विद्यार्थी प्रगत असेल?*

*2री*       *किमान गुण 23 व त्यापेक्षा जास्त*

*3री*       *किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त*
 
*4थी*      *किमान गुण 30 व त्यापेक्षा जास्त*

*5वी*       *किमान गुण 38 व त्यापेक्षा जास्त*

*6वी*       *किमान गुण 38 व त्यापेक्षा जास्त*
 
*7वी*       *किमान गुण 45 व त्यापेक्षा जास्त*

*8वी*       *किमान गुण 45 व त्यापेक्षा जास्त*

*पायाभूत चाचणी 2017 करिता सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.*




💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢


*पायाभूत चाचणी परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्याला प्रगत समजायचे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*१) भाषा*
     *ज्या विद्यार्थ्याला वाचन व लेखन या प्रत्येक मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा पेक्षा अधिक गुण व भाषा विषयात ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*

*२) गणित*

*विद्यार्थ्याला संख्यज्ञान व संख्येवरील क्रिया या मुलभूत क्षमतेत ७५ टक्के किंवा त्या पेक्षा गुण हवेत व गणित विषयात अ व ब श्रेणी हवी आहे*


*३) इंग्रजी (तृतीय भाषा )*

       *विद्यार्थ्याला ६० पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*


*४) विज्ञान*

   *विद्यार्थ्याला ६० टक्के पेक्षा अधिक गुण हवेत म्हणजे अ व ब श्रेणी हवी*



*वरील निकष पूर्ण करणारा विद्यार्थी प्रगत समजावा*

*आपल्याला वरिष्ठ कार्यालयास कोणत्याही प्रकारे गुण  हार्ड कॉपी मध्येभरून द्यायचे नाही न्युपा कडून एक अॅप विकसित केले आहे त्यात ऑनलाईन किंवा ऑफलाईन गुण भरून द्यायचे आहेत*

पायाभूत चाचणी शासन निर्णय

प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया

*"प्रगत चाचण्या 2017-18 शासन निर्णय समजून घेऊया"* ✍🏻

💧वर्षभरात 3 चाचण्यांचे आयोजन.
💧पायाभूत चाचणी ( मूलभूत क्षमता व मागील इत्तेपर्यंतच्या क्षमता)
💧संकलित चाचणी 1 (मूलभूत क्षमता व प्रथमसत्र क्षमता )
💧संकलित चाचणी 2 ( मूलभूत क्षमता,प्रथमसत्रातील काही क्षमता,व द्वितीय सत्रातील क्षमता)

➡ *चाचणी विषय व वर्ग*

💧पहिली व दुसरी - *प्रथम भाषा, गणित.*
💧तिसरा ते पाचवा - *प्रथम भाषा, गणित व इंग्रजी.*
💧 सहावी ते आठवी - *प्रथम भाषा, गणित,इंग्रजी व  विज्ञान*

➡  *मूलभूत क्षमता*
भाषा -वाचन व लेखन
गणित-संख्या ज्ञान (ऐकून संख्या लिहिणे,संख्याची तुलना,विस्तारित रूप,स्थानिक किंमत)
संख्येवरील क्रिया बेरीज,वजाबाकी,भागाकार,गुणाकार.

➡ *प्रगत विद्यार्थी*-
💧मूलभूत क्षमतेमध्ये 75% किंवा जास्त संपादणूक.
💧60 % किंवा जास्त गुण घेणारे.

➡ *प्रगत शाळा कोणत्या शाळेस म्हणायचे*
      शाळेतील प्रत्येक विदयार्थ्यास मूलभूत क्षमतेत किमान 75%  व प्रगत चाचण्यात 60 % पेक्षा जास्त गुण.

➡ *शिक्षक/मु अ भूमिका*
💧60%पेक्षा कमी गुण विद्यार्थी यादी करणे.
💧निर्देशित अँप द्वारे सरल प्रणालीत गुणांची नोंद करणे.
💧विद्यार्थी/क्षमतानिहाय कृती कार्यक्रम तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे.
💧मूलभूत क्षमतेत मागे असणारे विद्यार्थी यांची प्रति महा चाचणी घेऊन ,निकाल CRG ला कळवणे.
💧प्रतिमाह चाचणीत प्रगत होणा-या विद्यार्थ्यांना वगळावे.
💧CRG (केंद्र संसाधन समुह)  अधिक कार्यक्षम करणे.
💧मित्र अँप/विद्या प्राधिकरण/इतर संकेत स्थळ वरील प्रश्न पिढी वापरणे, स्वतः प्रश्नपञिका विकसित करणे,व मूल्यमापन करणे.
💧संकलित विद्यार्थी संपादणूक बाबतचे सर्व अहवाल (विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत गुण वगळून) शिक्षक,पर्यवेक्षीय यंत्रणा, अधिकारी,,पालक,समाज या सर्वासाठी उपलब्ध करून दिले जातील.

➡ *वार्षिक कामकाजाचे मूल्यमापन*
PAR (performance Apprasal Report) या वर्षाचा शिक्षक,/मु अ/पर्यवेक्षीय अधिकारी/अधिकारी यांचा वरील कार्याच्या आधारेच होईल.

➡ *प्रत्येकास पञ*
💧 *अभिनंदन पञ* - सर्व विद्यार्थ्यांना 80% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.💧 *उत्तेजनार्थ पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 60% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.(गुणवत्ता वाढीच्या सुचनासह)
💧 *संपादणूकीस प्रेरित करणारे पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 40% पेक्षा जास्त गुण असणा-या शिक्षक/शाळेस.
💧 *कमी संपादणूकीची दखल घेणारे पञ-* सर्व विद्यार्थ्यांना 40% पेक्षा कमी गुण असणा-या शिक्षक/शाळेस कमी संपादणूकीची दखल घेऊन गुणवत्ता वाढीसाठी निश्चित उद्दिष्टे देणारे पञ.

➡ *पर्यवेक्षीय अधिकारी भूमिका व जवब्दऱ्या*
      चाचणीच्या वेळेस प्रत्येक दिवशी एका शाळेवर उपस्थित रहातील.याचा अर्थ त्या शाळेची परीक्षा त्यांनी घेतली असा समजला जाईल. तसेच चाचणी नंतर नियमित भेटी करून मूलभूत व वर्ग पातळीवरील क्षमता बाबत विद्यार्थी संपादणूक पडताळणी करतील.
💧केंद्रप्रमुख स्वत: चाचणी घेऊन गुणांची नोंद उपलब्ध करून दिलेल्या APP मध्ये करतील.माञ दोघांच्याही मूल्यमापनात ञुटी आढळल्यास राज्यस्तरावरून मूल्यमापन केले जाईल.
➡ *प्रत्येकाची जबाबदारी निश्चित*
  💧म्हणजे मागील दोन वर्षातील चाचण्यांचा विचार करता केवळ इंग्रजी व विज्ञान विषय चाचणीसाठी वाढले नसून प्रत्येक घटकाची जबाबदारी वाढली आहे. ती समजून घ्यावी.

     महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण विभाग

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची पध्दत

पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत

*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*


वर्गाचे शेकडा प्रमाण

मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.

  सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
  ------------------------------------------------
   वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण

उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12  विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.

340 × 100
------------------
12 × 40

   34000
 = -----------
    480

= 70.83


शाळेचे शेकडा प्रमाण

विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.

सर्व वर्गांच्या शेकडा प्राणाची सरासरी काढावी.

उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण

 2 री  72%
3 री   85.5%
4 थी  91%


शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =

72 + 85.5 + 91
------------------------
        3

=    82.83

असेच गणित विषयासाठी करावे.


शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.

मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
------------------------------------------------

                        2

उदा.
गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.


82.83 + 92.5
---------------------
          2

= 87.66%

आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.

81 ते 100   अ
61 ते 80     ब
41 ते 60     क
0   ते 40      ड

(पाहा: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR पान नं  10 व 11 )


वरील मार्गदर्शक सूचनांचा विचार करता गुणांकन खालीलप्रमाणे होईल
   1ली/2री
-------------
25 ते 30 गुण--(अ)
19 ते 24 गुण--(ब)
13 ते 18 गुण --(क)
00 ते 12 गुण--(ड)
------------------
3री। /4थी
----------
33 ते 40  (अ)
25 ते 32 (ब)
17 ते 24 (क)
00 ते 16 (ड)
------------
5वी /6वी
------------
41 ते 50--(अ,)
31 ते 40--(ब)
21 ते 30--(क)
00 ते 20--(ड)
------------
7वी/8वी
----------------
49 ते 60 (अ)
37 ते 48 (ब)
25 ते 36 (क)
00 ते 24 (ड)

प्रगत / अप्रगत श्रेणी निकष २०१८-१९

प्रगत/अप्रगत श्रेणी व निकषाबाबत


*_प्रगत/अप्रगत श्रेणी व निकषाबाबत_*

*-(सन-2015-16 व सन-2016-17)-*

प्रगत श्रेणी - अ,ब,क (40%पेक्षा जास्त )

अप्रगत श्रेणी - ड (40%पेक्षा कमी)
[संदर्भ शा.नि.22 जून 2015]



*-(सन-2017-18)-*
प्रगत श्रेणी - अ,ब (60%पेक्षा जास्त )

अप्रगत श्रेणी - क,ड (60%पेक्षा कमी)


[संदर्भ शा.नि.14 जुलै 2017]
तसेच


सन-2017-18 ह्या चालू शै.वर्षात


~ प्रगत साठी निकष ~
1)मराठी व गणित या विषयांमध्ये मूलभूत क्षमतांवर आधारित प्रश्नांना 75% किंवा त्यापेक्षा जास्त आणि एकूण गुणांपैकी 60% पेक्षा जास्त गुण असावेत.(श्रेणी अ व ब)


2)इंग्रजी व सा.विज्ञान या विषयांमध्ये 60%पेक्षा जास्त गुण असावेत.(श्रेणी अ व ब)
~अप्रगत साठी निकष ~

*प्रगत साठी असणारे निकष पूर्ण न करणारे विद्यार्थी (श्रेणी क व ड)*

पायाभूत चाचणी निकाल श्रेणी २०१८-१९

पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
पायाभूत चाचणी चा निकाल श्रेणीनुसार तयार करावयाचा आहे .
त्या श्रेणी खालीलप्रमाणे आहेत...        
💎💎💎💎💎💎💎💎

     🌷इ.२री साठी 🌷

💎  २५ ते ३०   -    अ              
💎  १९ ते २४    -   ब
💎  १३ ते १८    -   क
💎   ०  ते १२      -  ड
                       
        श्रेणी द्यावी
💎💎💎💎💎💎💎💎

🌷इ.३री ४थी 🌷

🎯३३ ते ४०     -  अ
🎯२५ ते ३२      -  ब
🎯१७ ते २४     -    क
🎯० ते १६        -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷५ वी ६ वी साठी 🌷

🚩   ४१ ते ५०    -    अ
🚩   ३१ ते ४०   -     ब
🚩   २१ ते ३०    -   क
🚩   ० ते २०     -    ड

💎💎💎💎💎💎💎💎

🌷७ वी ८ वी साठी🌷

🎯  ४९ ते ६०     -  अ
🎯  ३७ ते ४८   -    ब
🎯  २५ ते ३६     -  क
🎯  ०० ते २४   -   ड

💎💎💎💎💎💎💎

Tuesday, 21 August 2018

Mahastudent app

नमस्कार!
सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या *Mahastudent* app ची लिंक खाली दिली आहे.28 ते 31 ऑगस्ट 2018 दरम्यान होणाऱ्या पायभूत चाचणीत विद्यार्थ्यांना मिळालेले गुण या app वरून भरावयाचे आहेत.हे app इन्स्टॉल केल्यानंतर शाळेचा UDISE नंबर टाकावा.सरल पोर्टलसाठी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकावा.नंतर पासवर्ड सेट करावा.नंतर हे app सुरू होईल.मग विद्यार्थ्यांचे गुण भरता येतील. https://play.google.com/store/apps/details?id=io.cordova.MahaStudent

click  here

*अँप विषयी अजून अधिकृत सूचना आली नाही वरील message हा फक्त आपल्या माहिती स्तव होता त्यामुळे signin ला प्रॉब्लेम येत आहेत*
*App विषयी अजून माहिती मिळाल्यास लवकरच सांगण्यात येईल*

Saturday, 18 August 2018

SSG18

*https://play.google.com/store/apps/details?id=com.fmgizmo.ssg
आपणाला विनंती वरील लिंक मधून *स्वच्छ सर्वेक्षण (SSG) 18*   हे App डाऊनलोड करून  महाराष्ट्र राज्य  व *सांगली जिल्हा* निवडून  विचारलेल्या ४ ही  प्रश्नाना  १ नंबरचेच उत्तर निवडा. आपल्या *सांगली* जिल्ह्याचे गुणांकन वाढवून देशातील स्वच्छ जिल्हा निवडण्यास  व *"स्वच्छ जिल्हा  - सांगली जिल्हा"* मोहिमेस सहकार्य करा .
तुम्ही करा व इतराना सांगा.
धन्यवाद..🙏🙏

Plz Vote for sangli

जिल्हा परिषद सांगली.*

Thursday, 16 August 2018

सांगली जिल्हा परिषद  APP
FOR  DOWNLOAD CLICK 

     CLICK    HERE



    

जि,प.सांगली नाविन्यपूर्ण उपक्रम

जि,प.सांगली नाविन्यपूर्ण उपक्रम
दिव्यांग मित्र अभियान 
माहिती : सदर अभियानाची अंमलबजावणी करत असताना पुढीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. १.जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची १००% नोंदणी करून ती संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करणे. २.अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे. ३.तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनांद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे. ४.दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करू देणे. (उदा. ३% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, सी.एस.आर. इत्यादी ) ५.प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इत्यादी )

सांगली जिल्हा पर्यटन स्थळे

सांगली जिल्हा पर्यटन स्थळे

   

श्री गणपती मंदिर
  माहिती : सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती अप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर 1843 साली बांधले. मिरज व सांगली संस्थानच्या वाटणीनंतर पटवर्धन हे 1808 पूर्वी सांगलीस आले व सांगली हेच त्यांनी राजधानीचे ठिकाण ठरविले. पटवर्धन हे सांगलीत आले त्यावेळी सांगली शहर हे केवळ पाच हजार लोकवस्तीचे लहान गाव होते. ते राजधानीचे ठिकाण केल्याने गणेशदुर्ग किल्याची उभारणी करण्यात आली. त्याचवेळी सन 1813 च्या सुमारास श्री गणपती मंदिराच्या कामास सुरुवात झाली. कृष्णा नदीच्या काठी हे देऊळ बांधलेले असून पूरापासून ते सुरक्षित रहावे म्हणून या मंदिराची कल्पकतेने उभारणी करण्यात आली आहे. सर्व मंदिराचा आकार तीस/चाळी फूट खोल चुनेगच्चीने भरुन कितीही पाणी वाढले तरी ते देवालयात येणार नाही अशी रचना करण्यात आली आहे.श्री गणपती मंदिर हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून सांगलीकर नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. केवळ हिंदूच नव्हे तर सर्व धर्मियांची या श्री गजाननावर दृढ श्रद्धा आहे. सध्या गणपती मंदिर परिसर अतिशय देखणा करुन गणपती मंदिर परिसराचा कायापालट करण्यात सांगलीचे राजेसाहेब श्रीमंत पटवर्धन यांनी महत्वाकांक्षी योजना राबविली आहे. सांगली रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच कि.मी. अंतरावर सांगली शहरात हे श्री गणपती मंदिर आहे.

ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेब दर्गा
  माहिती : मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणाऱ्या ज्या अनेक वास्तू आहेत त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबांचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लिम भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे. हुतात्मा अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन हे तुर्कस्थानातील काशगर या गावचे. त्यांच्या बालमनावर जनसेवा म्हणजेच ईश्वरसेवा या उच्च तत्वाचे संस्कार झाले होते. ते बालपणीच कुराण पठण करू लागले. वयाच्या 18व्या वर्षी ख्वाजा शमशोद्दिन हिंदुस्थानात आले.ख्वाजा साहेबाबद्दल खूपच आख्यायिका आहेत. मिरजेचे राजे श्रीमत पटवर्धन ख्वाजासाहेबांना मानीत असत. मिरजेच्या किल्ल्याला एकदा पडलेला वेढा ख्वाजासाहेबांच्या कृपेनेच निघाला व संकट टळले, अशी आख्यायिका आहे. मिरजेचा हा दर्गा सन 1668 मध्ये बांधण्यात आला. 200 फूट लांब आणि 200 फूट रुंद अशा चौथऱ्यावर हा दर्गा बांधला आहे. स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खाँ यांची कबर याच दर्ग्याच्या आवारात असून त्यांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी येथेचे संगीत सेवेन साजरी करतात. त्यावेळी दर्ग्यामध्ये सतत तीन-चार दिवस देशातील विख्यात संगीत कलाकार येऊन आपली हजेरी लावत असतात. या भागातील संगीत शौकिनांना ही एक प्रकारची पर्वणीच असते. मिरज रेल्वे स्टेशनपासून मिरज शहरात 1 कि.मी. अंतरावर हा दर्गा आहे.

रामलिंग बेट
  माहिती : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात बोरगावजवळ बहे येथे कृष्णा नदीच्या पात्रात रामलिंग बेट तयार झालं आहे. इस्लामपूरहून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या निसर्गरम्य व कृष्णामाईच्या संथ वाहणाऱ्या प्रवाहात धनाजी पाटील व माणिक कारंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बालाजी बोट क्लब स्थापन केला आहे. बोरगाव-रेठरे रस्त्यावरील रामलिंग येथील कृष्णा नदीवरील भव्य पूलाच्या उजव्या बाजूला रामलिंग पुरातन मंदिर परिसर तर डाव्या बाजूला कृष्णेचं विस्तीर्ण पात्र व शांत डोह पसरलेला आहे. हे ठिकाण इतक मोहित करणारं आहे की तिथं पोहोचल्यावर कृष्णेच्या शांत आणि मनाला उल्हासित करणाऱ्या पात्रात नौका विहाराला प्रवृत्त व्हायलाच होत. एकूणच आता नौका विहारासाठी लांबवर कोकणात जायला नको. सांगली जिल्ह्यात एक चांगली व अनोखी अशी नौका-नयनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. शांत व विस्तीर्ण कृष्णामाईचा प्रवाह, कृष्णाईच्या काठावरची हिरवीगार शिवारं, निसर्गरम्य वातावरण, रामलिंग बेटावरची पुरातन देवालय आणि नौका-विहार. रोजच्या दैनंदिन जीवनातील तोच-तोचपणा घालवायचा असेल व मनाला चैतन्य प्राप्त करून घ्यायच असेल तर रामलिंग नौका विहाराचा आनंद लुटायला लवकरच जायला हवं.

सागरेश्वर अभयारण्य
  माहिती : १०.८७ चौ. कि. मी. क्षेत्रफळ असलेले सागरेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यांपैकी एक आहे. कराड नजिक कृष्णा नदीच्या खोऱ्यात हे ठिकाण आहे. याठिकाणी सुमारे सात-आठशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात अदमासे ५१ मंदिरं असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. याशिवाय इतरही अन्य देवदवतांची मंदिरं आहेत. सागरेश्वराच्या या देवळापासून जवळच एक लहानसा घाट ओलांडला की अभयारण्य सुरू होते. या अभयारण्याचा विस्तार अवघा ५-६ चौ. कि. मी. इतकाच असला तरी हे अभयारण्य नैसर्गिक नसून मानवी प्रयत्नातून आकाराला आले आहे हे विशेष होय. एकीकडे माणूस स्वार्थापोटी क्रूर जंगलतोड करीत असल्याचं दिसत असताना दुसरीकडे परिश्रमपूर्वक जंगलाची लागवड करणारे मानवी हात पाहिले की अचंबा वाटते. या परिश्रमांमागे प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे. त्यामुळेच उजाड माळरान असलेल्या या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सागरेश्वराच्या जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे. वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.

सागरेश्वर मंदिर
  माहिती : देवराष्ट्र गावच्या हद्दीत सागरेश्वराचे एक फार प्राचीन मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या सभोवताली लहान-मोठी 40 ते 50 मंदिरे आहेत. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे आहे. याठिकाणी पूर्व मुनी राहत असत असे म्हणतात. या भागास पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणत. त्यापैकी ही देवालये बांधली असावीत असे संशोधकाचे मत आहे. देवळांची बांधणी हेमाडपंथी आहे. सागरेश्वराहून देवराष्ट्र गावात जाताना एक प्राचीन तळे आहे. हे कुंतल नरेशाने दुरुस्त केले असे म्हणतात. पूर्वी सूत नावाचे एक महाऋषी होते. त्यावरुन सूत उवाच असा पुराणातील उल्लेख आहे. सूत हा पुराणचा मोठा कथाकार होता. सूताने एकदा व्यासास म्हटले गुरुदेव मी सारी तीर्थे हिंडलो परंतु मला मानसिक समाधान नाही. मला आत्मिक समाधान लाभेल असे ठिकाण सांगा. व्यासानी समुदेश्वराच्या महादेवाचे मंदिर सुचविले. तेव्हापासून ऋषीनी याठिकाणी अनंत तप केले व ती भूमी पावन झाली असे म्हणतात.

संगमेश्वर देवस्थान, हरिपूर
  माहिती : सांगली शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हरिपूर हे छोटेसे गाव आहे. येथे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो. याठिकाणी संगमेश्वर हे देवस्थान असून श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक भाविक येथे येतात. नद्याच्या संगमाचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी लोक येतात. तसेच नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले आहे. तो पार आजही येथे पहावयास मिळतो.

रेवणसिध्द रेणावी
  माहिती : विटा-खानापूर रस्त्यावर रेणावी गावाजवळ श्री रेवणसिद्धाचे स्वयंभू स्थान आहे. देवालयाच्या पूर्व बाजूस उसळसिद्ध व पश्चिम बाजूला भुयारात विश्वाराध्य आहे. देवापुढे एक मोठा नंदी असून नंदीमागे पंच कलशाप्रमाणे प्राचार्य आहेत. हा रेणावी डोंगर पूर्वी पंच धातूचा म्हणजे सुवर्ण, तांबे, लोखंड वगैरे धातूंचा होता अशी आख्यायिका आहे. डोंगरावरील पांढऱ्या खड्यांचा भस्माप्रमाणे उपयोग करतात. तालमीसाठी लागणाऱ्या तांबड्या मातीच्या खाणी या डोंगरावर आहेत. येथे निरनिराळ्या रंगाची माती सापडते. त्यामुळे संशोधन करण्यासारखे हे ठिकाण आहे. या डोंगरावर 84 तिर्थे होती असा उल्लेख आहे.

श्री. दत्त मंदिर औदुंबर
  माहिती : सांगली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांपैकी श्री क्षेत्र औदुंबर हे एक श्री दत्तात्रयाचे जागृत देवस्थान आहे. पलूस तालुक्यात भिलवडी गावाजवळ कृष्णा नदीच्या काठी रम्य वनश्रीमध्ये नदीच्या काठावर हे देवालय आहे. देवालयामध्ये श्री दत्ताच्या पादुका आहेत. भिलवडी रेल्वे स्टेशनपासून पश्चिमेस चार किलोमीटरवर हे तीर्थक्षेत्र आहे. कृष्णेच्या घाटावरील श्री दत्तात्रयाचे देऊळ, ब्रम्हानंद स्वामीचा मठ, श्री भूवनेश्वरी देवीचे देऊळ या सर्व क्षेत्र समुहामुळे या परिसराचे महात्म्य वाढले आहे. श्री ब्रम्हानंद स्वामी इ.एस.1826 मध्ये श्री क्षेत्र औदुंबर येथे आले व त्यांनी मठी उभारुन तप करण्यास सुरुवात केली. पुढे या क्षेत्रीच त्यांनी समाधी घेतली. त्यांची शिष्य परंपरा अजूनही चालू आहे. श्री दत्त पादुकावर दगडी देवालय पूर्वाभिमुखी आहे. नदी पलिकडे श्री भूवनेश्वरीचे सुंदर देवालय आहे. देवीची मुर्ती काळ्या दगडाची असून सुंदर आहे. एक जुनी शिल्पकला म्हणून देवळावरील गोपूर पाहण्यासारखे आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला याठिकाणी मोठी यात्रा भरते. याठिकाणी विश्रामगृह बांधण्यात आले असून मंदिरासाठी नदीकिनारी पूरसंरक्षक भिंतीचे काम करण्यात आले आहे.

तासगाव गणेश मंदिर
  माहिती : सांगली जिल्ह्यातील तासगाव या तालुक्याच्या ठिकाणी श्री गजाननाचे जुने मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी हे मंदिर आणि दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपूर गणेश मंदिराच्या पुढे बांधले आहे. गोपूरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मुर्ती कोरल्या आहेत. मंदिरात जाताना उजव्या बाजूस श्री गजाननाचा एक मोठा लाकडी रथ होता, तो निकामी झाल्याने त्याच्याऐवजी आता लोखंडी रथ तयार केला आहे. दरवर्षी गणपती उत्सवात हा रथ बाहेर काढतात. तो शेकडो माणसे मोठ्या भक्तीभावाने ओढतात. तासगावचा हा श्री गजानन उजव्या सोंडेचा असून तो जागृत आहे.

दंडोबा हिल स्टेशन
  माहिती : सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुका हा धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध आहे. ही ठिकाणं अनेकांची श्रद्धास्थानं आहेत. काहीसा दुष्काळी असूनही इथली पर्यटनस्थळं ही एका दिवसाचे पिकनिक स्पॉट ठरली आहेत. या ठिकाणांचा विकास होण्याची गरज आहे. याच तालुक्याच्या सीमेवर खरशिंग गावानजिक असलेला दंडोबा डोंगर हे असंच रमणीय ठिकाण आहे.

चांदोली अभयारण्य
  माहिती : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकास चांदोलीजवळ वारणा नदीवर ‘वारणा प्रकल्प’ हे 34.20 टी.एम.सी क्षमतचे धरण बांधले आहे. वसंतसागर जलाशय म्हणून ओळखल जाते. धरणाची लांबी 1580 मीटर असून ह्या धरणाचा बांध मातीचा आहे. या धरणाचा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जमिनीच्या सिंचनासाठी लाभ होत आहे. अलिकडेच बांधण्यात आलेले मोठे धरण आहे. धरण परिसर पर्यटकांचे आकर्षक ठिकाण झाले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली अभयारण्य असून हे नैसर्गिक अभयारण्य सांगली-कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर आहे. कसे जावे... चांदोली राष्ट्रीय उद्यान हे मुंबईपासून ३८० किलोमीटरवर तर पुण्यापासून २१० किलोमीटरवर आहे. सांगली शहरापासून फक्त ८५ किलोमीटर तर कोल्हापूरपासून ८० किलोमीटरवर आहे. याठिकाणी बसने जाता येते.