पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Thursday, 16 August 2018

बातम्या सांगली जि.प

बातम्या
           

72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण
  माहिती : आज दि. 15.08.2018 रोजी सांगली जिल्हा परिषद, सांगली येथे 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मा. श्री. संग्रामसिंह देशमुख (भाऊ), अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा. श्री. सुहास भैय्या बाबर उपाध्यक्ष जिल्हा परिषद सांगली, मा. श्री. अरुण राजमाने सभापती अर्थ व बांधकाम समिती जि. प. सांगली, प्रा. डॉ. सुषमा ताई नायकवडी सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद सांगली, मा. अभिजीत राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सांगली, मा. डी. के. (काका) पाटील सदस्य जिल्हा परिषद सांगली तसेच जिल्हा परिषद सांगली सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण
  माहिती : -

राष्ट्रीय जंतनाशक दिन
  माहिती : राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा जिल्हास्तरीय उद्घाटन समारंभ आज न्यू इंग्लिश स्कुल, वारणावती, ता. शिराळा येथे संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री संग्रामसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजित राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते..

दिव्यांग अभियान राज्यात पथदर्शी ठरेल
  माहिती : -

दिव्यांग मित्र जि.प. चे नाविन्यपूर्ण अभियान
  माहिती : -

समाज कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा
  माहिती : -

मोफत सायकल वाटप चा व्हायरल मेसेज बोगस !
  माहिती : -

ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक, थर्मोकोल संकलन केले जाणार
  माहिती : -

छायाचित्र दालन सांगली जि.प.


मतिमंद मुलामुलींची शाळा वडकेत विकास केंद्र तानंग येथे वृक्षारोपण
  माहिती : श्री अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी; जिल्हा परिषद सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मतिमंद मुलामुलींची शाळा वडकेत विकास केंद्र तानंग येथे वृक्षारोपण करण्यात आले..

प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान 2018
  माहिती : प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान 2018 अंतर्गत आज जिल्ह्यातील सर्व गावात प्लास्टिक संकलन अभियान राबवण्यात आले. यावेळी गावातील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक गोळा करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी या वेळी पथनाट्य सादर केले. तसेच गावामध्ये प्रभात फेरी काढून लोकांमध्ये प्लास्टिक बंदी विषयी जनजागृती करण्यात आली. गावातील ग्रामस्थांसाठी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी प्लास्टिक बंदीची शपथ घेतली .. एकच ध्यास ठेवूया प्लास्टिक पिशवी हटवूया समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करूया. प्लास्टिक टाळा...!! पर्यावरण वाचवा...!!!!

डॉक्टर्स डे
  माहिती : सकाळ तर्फे आयोजित उत्कृष्ट वैद्यकीय सेवा सन्मान सोहळ्यात बोलताना मा. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर

विविध योजना जि प सांगली

विविध योजना सांगली शिक्षण विभाग
   
माहिती : शालेय पोषण आहार योजना ही महाराष्ट्र राज्यात शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र.पूप्राशा/1095/2134/प्राशि-2, दिनांक 22/11/1995 अन्वये इयत्ता 1 ते 5 साठी सुरु केली आहे. तसेच पुढे शासन निर्णय क्रमांक शापोआ-2008/(प्र.क्र./264)/प्राशि-4,दि.08/08/2008 अन्वये ती इ. 6 वी ते 8 वी साठी लागू करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 08 जून 2009 अन्वये शालेय पोषण आहार योजनेची नवीन सुधारीत कार्यपध्दती दि. 1जुलै 2010 पासून अमंलबजावणी सुरु झालेली आहे. सुधारीत अमंलबजावणीनुसार शासनाने नियुक्त केलेल्या पुरवठाधारका मार्फत थेट शाळास्तरावर तांदुळ व धान्यादी मालाचा पुरवठा करणेंत येतो.
       
     
माहिती : या कार्यक्रमांतर्गत पुढील उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत:
१)प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी एका निश्चित मुदतीची चौकट
२)देशभरात दर्जेदार शिक्षणाच्या गरजेला प्रतिसाद
३)मुलभूत शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्याची संधी
४)शालेय शिक्षण व्यवस्थापनात पंचायती राज संस्था, शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघटना, माता-शिक्षक संघटना, जमातींच्या स्वायत्त परिषदा यांना प्रभावीरित्या सहभागी करून घेण्याचा एक प्रयत्न.
५)उच्च स्तरावर प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठीचे सक्रीय राजकीय पाऊल
६)केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनामध्ये चांगली भागीदारी.
७)राज्यांना प्राथमिक शिक्षणासंदर्भात स्वतंत्र दृष्टी विकसीत करण्याची संधी. 
    
माहिती : शासन निर्णय क्र.पीआरई- 1091/(96148)/ प्राशि-1,दिनांक 10/1/1992 ने इयत्ता 1ली ते 4 थी मध्ये शिकणा-या अनुसूचीत जाती /जमाती/भटक्या जमाती मधील दारिद्रय रेषेखालील मुलींना उपस्थिती भत्ता अदा करणेत येतो.मुलींच्या 75 टक्के उपस्थितीच्या आधारे प्रतिदिन 1 रुपया या प्रमाणे वर्षात जास्तीत जास्त रु. 220/-प्रमाणे रक्कम अदा करण्यात येते सदर पात्र लाभार्थी मुलींची निवड निकषाप्रमाणे तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेकडून करण्यात येते निवड केलेल्या पात्र मुलींच्या संख्येप्रमाणे जिल्हास्तरावरुन गट शिक्षणाधिकारी यांना अनुदान वितरीत करण्यात येते सदरचा खर्च तालुकास्तरावरुन करण्यात येतो. सन 2014-15 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून 3.00 लाख अनुधान प्राप्त आहे. 
    
   
माहिती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती करणेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करणेत येते. या अनुदानामधून शाळा दुरुस्तीची कामे मंजूर केली जातात. 

     
माहिती : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अनुदान मंजूर करणेत येते. या अनुदानामधून नवीन शाळा इमारत बांधकामाची कामे मंजूर केली जातात. 
  
     
माहिती : जिल्हा परिषद सेस अनुदानातुन बांधकामासाठी अनुदान मंजूर करणेत येते. सदर अनुदानातुन शाळा / वर्गखोली दुरुस्ती, शाळांना कंपाऊंड वॉल बांधणे ही कामे मंजूर केली जातात. निधी उपलब्धतेनुसार दरवर्षी कामे घेतली जातात. प्रा.शाळा विशेष दुरुस्तीसाठी विविधस्तरावरुन जी निवेदने प्राप्त होतात, सदर निवेदनामधूल उपलब्ध असलेल्या अनुदाना अनुसरुन व प्राप्त अंदाजपत्रके घेवून कामे घेणेत येतात.  
   
    
माहिती : शासन निर्णय क्र.ओडियो 2883/(दोन)/अर्थसं-1 महाराष्ट्र शासन शिक्षण व सेवायोजन विभाग दि.10 डिसेंबर 1984 नुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाते. जिल्हयातील 100 टक्के मुलींना शाळेत दाखल करणे व त्यांना शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे याकरिता शिक्षकांनी प्रयत्न करावेत हा या योजनेचा उद्देश आहे. शाळेच्या कार्यक्षेत्रातील 100 टक्के मुलींना शाळेत दाखल करणे व त्यांची उपस्थिती 100 टक्के होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षक व विस्तार अधिकारी यांना या योजनेतंर्गत प्रत्येकी ‎ . 100/- प्रमाणे पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात येते.
सदर योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट पटनोंदणीसाठीचे प्रस्ताव मागविण्यात येतात. प्राप्त प्रस्तावातून ज्या शाळांमध्ये जास्तीत जास्त मुली दाखल झाल्या आहेत अशा प्रथम 27 शिक्षकांची व 1 विस्तार अधिकारी यांची निवड करण्यात येते. निवड झालेल्या प्रस्तावांस मा.शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांची मंजूरी घेतली जाते. सदर योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत रक्कम ‎ .4,000/- (चार हजार मात्र) तरतूद मंजूर आहे. 
       
       
माहिती : योजनेचे स्वरुप:- शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे शासन निर्णय क्रमांक एससीजी 2004/(158/2004)/माशि-7 मंत्रालय विस्तार भवन,मुंबई दिनांक 5 फेब्रुवारी 2005 व शासन निर्णय,शालेय शिक्षण विभाग क्र.पीआरई 1097/1526/प्राशि-1 दिनांक 19 मार्च 1998 अन्वये जिल्हा परिषदेच्या शाळांमधून कब-बुलबुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी ही योजना असून मुलांना कब/बुलबुल असे म्हटले जाते.ही योजना 1ते 4 थी पर्यंत राबविली जाते.मुलांच्या युनीटना कब पथक व मुलींच्या युनीटला बुलबुल असे म्हणतात.कब पथक मार्गदर्शक शिक्षकांना कब मास्टर असे म्हणतात.बुलबुल युनिट मार्गदर्शक शिक्षिकेला फ्लॉक लिडर असे म्हणतात.एका पथकामध्ये किमान 20 मुले किंवा मुली असणे आवश्यक आहे.
योजनेचा उद्देश :-
कब/बुलबुल युनिट मध्ये त्यांच्या कब मास्टर व फ्लॉक लिडर मार्फत त्यांच्या वयोगटानुसार आदर्श नागरिक घडविण्यासाठी नैतिक,शारिरिक शिक्षण देवून त्यांचा मानसिक विकास घडविला जातो.हे प्रशिक्षण खेळ,गाणी,काही प्रकल्प,प्रात्यक्षिके या आधारे दिले जाते.सन 1994-1995 पासून महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शाळेतील समान कार्यक्रमांतर्गत व कार्यानुभव विषयांतर्गत हया अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केला आहे. सदर योजनेकरीता जि.प.सेस मधून सन 2014-2015 करीता ‎.2,00,000/- तरतूद मंजूर आहे.  

    
माहिती : बिट, केंद्र, तालुका, जिल्हास्तरवर विद्यार्थी क्रीडास्पर्धा आयोजित करण्यात येतात, या स्पर्धामध्ये विविध संघीक, व वैयक्तिीक खेळाचा समावेश केला जातो.
स्वरुप :- विद्यार्थ्यामध्ये संघ भावना निर्मण करणे , जिल्हा व राज्य राष्ट्रीय स्तरावर स्पर्धामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करणे, क्रीडस्पर्धा आयोजनासाठी अनुदान देणे, तालुका व जिल्हास्तरावर क्रीडास्पर्धा आयोजित करून विजयी स्पर्धाकाना आयोजनार्थ व गुणवत्तेनुसार बक्षिस,व सन्मान चिन्ह, प्रमाण पत्र देणे, ग्रामिण भागातील विद्यार्थ्याच्या कालागुणना वाव देणे, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये खेळाची संधी उपलब्ध करून देणे. 

  
माहिती : यामध्ये जिल्हास्तरावर घेणेत आलेल्या स्पर्धा मधील वैयक्तीक खेळामध्ये प्रथम,द्वित्तीय क्रमांक विजेत्याना दर महा एका विद्यार्थ्याना 75 रुपये प्रमाणे 10 महिनेसाठी 750/- प्रमाणे एकूण 27000/- हजार मात्र विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती स्वरूपात दिली जाते
स्वरूप :- खेळामध्ये आवड निर्माण करणे, संघ भावना निर्माण करणे, विद्यार्थीसाठी आर्थिक मदत देणे,
विद्यार्थ्यांच्या व्यक्ती विकासाना संधी करून देणे, विद्यार्थ्यांच्या अंगी क्रीडा कैाशल्याची उपासना करणे,जिल्हयातील विद्यार्थ्यांमधून उच्च प्रतींचे खेळाडू निर्माण करणे. इत्यादी  

      
माहिती : मा.आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचे मार्फत दरवर्षी पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात.जिल्हा परिषदेच्या शाळांतून या परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.यासाठी उत्तीर्णंचे प्रमाण व गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना शाळा स्तरावरुन मार्गदर्शन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणे शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येते.
तसेच पूर्व माध्यमिक/माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांचा दर्जा व गुणात्मक वाढ होऊन आत्मविश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांकाने आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह,प्रशस्तीपत्रक पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येते. सदर योजनेकरीता जि.प. सेस मधून ¸‎.2,50,000/- तरतूद मंजूर आहे. 

       
माहिती : शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा परीक्षेपैकी शिष्यवृत्ती परीक्षा ही महत्वाची आहे.या स्पर्धा परीक्षेत आपला विद्यार्थी चमकावा यासाठी अनेक पालक ,शिक्षक अतोनात प्रयत्न करीत असतात.शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा स्त्रोत प्रामुख्याने प्राथमिक शाळांमध्ये होत असतो.जि.प.शाळांतून या परीक्षांना बसणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये अलीकडे लक्षणीय वाढ झालेली दिसून येते.या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन शाळा स्तरावर मिळावे या करीता शिक्षकांना मार्गदर्शनाच्या कामात प्रोत्साहन मिळावे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून सदर योजना जिल्हा परीषदेमार्फत राबविणेत येते.
निकष:-1)इ.4थी पटाच्या 100 टक्के विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून निकाल जास्तीत जास्त लावणे.व गुणवत्ता यादीत विद्यार्थी येणे.
2)इ.7वी पटाच्या जास्तीत जास्त विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून निकाल जास्तीत लावणे व गुणवत्ता यादीत विद्यार्थी येणे.सदर योजनेकरीता जि.प.सेस मधून 20,000/- तरतूद मंजूर आहे. 

   
माहिती : जिल्हा परिषद प्रा.शाळांची विशेष दुरुस्ती 4 % शासन सादील अनुदान, जिल्हा वार्षिक योजना इत्यादीमधून घेणेत येते. 4% शासन सादील अनुदान प्रा.शाळांचे खर्चासाठी सादील अनुदान उपलब्ध होते, सदर अनुदानामधून 10 % अनुदान प्रा.शाळांचे दुरुस्तीसाठी देणेत येतो. दरवर्षी अंदाजे 16.00 ते 18.00 लाख अनुदान उपलब्ध होते.

       
माहिती : जिल्हा परिषद प्रा.शाळा विनामोबदला बक्षीसपत्रासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा
परिषद सेस मधून करणेत येते. ज्या प्रा.शाळांचे बक्षीसपत्र झालेले आहे, अशा प्रा.शाळांचे रजिस्ट्रेशन व मुद्रांक शुल्कसाठी येणारे खर्चाची प्रतिपूर्ती जि.प.सेस मधून तरतूद करुन खर्च करणेत येतो.  

      
माहिती : जिल्हा परिषद प्रा.शाळांचे जागा मोजणी फी साठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जि.प.सेसमधून करणेत येते. प्रा.शाळांचे जागांची हदद निश्चित करणेसाठी मोजणी करुन घेणेत येते. सदरची मोजणी फीचे झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करणेत येते. 
     
माहिती : प्राथमिक शाळेतील अनुसुचित जाती/जमाती,भटक्या जमाती, व विमुक्त जातीच्या मुलांची इतर मुलांपेक्षा पटसंख्या फार कमी आणि असमाधानकारपणे असते. व या जमातीचे मुलांकडे तुलनात्मकरित्या पहाता इतर मुलांपेक्षा शाळेतील उपस्थिती फारच कमी असल्याने त्याचा परिणाम प्राथमिक शिक्षणाच्या पटनोंदणीवर होतो. परिणामी पटनोंदणी कमी होते. म्हणून प्राथमिक शाळेतील वरिल जाती/जमातीच्या मुलांची पटसंख्या वाढविण्यासाठी वरिल योजना कार्यान्वीत करणेत आलेली आहे. 

      
माहिती : या योजनेमध्ये ग्रामिण भागातील जि.प.च्या प्राथमिक शाळा म्हणजे, इ.1 ली ते 4 थी च्या 09 शाळा व उच्च प्राथमिक म्हणजे इ.5 वी ते 7 वी च्या 09 शाळा आशा एकूण 18 शाळांची निवड समितीमध्ये निवडल्या जातात. इ.1 ली ते 4 थी च्या शाळा रक्कम रूपये 500/- व इ.5 वी ते 7 वी च्या शाळांना रोख रक्कम रूपये, 1000/- व सन्मान चिन्हा, प्रमाण पत्र, देवून गौरव केला जातो.
स्परूप :- रोख रक्कम व प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देवून गौरव करणे,परिसरातील इतर शाळांना प्रेरित करणे, ग्रामस्थांना आपल्या गावातील शाळांना आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड व्हावी म्हणून शाळागृह सुधारणेसाठी प्रवृत्त करणे, शिक्षकांच्या मानात ईर्षा निर्माण करणे , व विद्यार्थ्यामध्ये स्पर्धात्मक भावना तयार करणे,
निकष :- उपस्थिती टिकविणे, पटनोंदणी लक्ष्य 100 टक्के साध्य करणे, स्पर्धात्मक परीक्षांना विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे, शैक्षणिक कामात ग्रामस्थांचा सहभाग मिळविणे, शैक्षणिक योजना यशस्वीपणे राबविणे इत्यादी.  

   
माहिती : शिक्षणाचा मोठया प्रमाणावर प्रसार व्हावा म्हणून शासनाने वेळोवेळी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. असे असून देखील अनेक मुली व स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांची हलाखीची आर्थिक स्थिती. ही स्थिती लक्षात घेता मुलींच्या शिक्षणाला चालाना देण्याचा दृष्टीने व मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सहाय्यभूत होईल अशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शासनाने सन 1983-84 मध्ये सुरु केली.
शिक्षणाचा मोठया प्रमाणावर प्रसार व्हावा म्हणून शासनाने वेळोवेळी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. असे असून देखील अनेक मुली व स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांची हलाखीची आर्थिक स्थिती. ही स्थिती लक्षात घेता मुलींच्या शिक्षणाला चालाना देण्याचा दृष्टीने व मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये सहाय्यभूत होईल अशी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना शासनाने सन 1983-84 मध्ये सुरु केली.

लाभार्थी मुलींच्या निवडीचे निकष :
ग्रामीण भागात आर्थिक व सामाजिक दृष्टया मागासलेल्या मुलींना आणि शहर तसेच उपनगरीय झोपडपट्टयांमधील गरजू मुली.
1) अनुसूचित जाती/जमाती , भटक्या आणि विमुक्त जातीतील मुलींना प्राधान्य देण्यात येते.
2) इयत्ता 1 ली ते 8 वी इयत्तेत शिकणा-या मुली या योजनेत आर्थिक मदत मिळण्यास पात्र राहतील.
3) दत्तक पालकांकडून दत्तक मुलीस तीचे इयत्ता 8 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरमहा रु.30/- आर्थिक मदत देण्यात येते.

निधी संकला पध्दती :
1) योजना सुरु होताना पहिली 2 वर्षे 100 रु. व 50 रु ची पावती पुस्तक छपाई करुन निधी संकलित केला.
2) त्यानंतर 10 रु. ची पावती पुस्तके तयार करुन शिक्षकांमार्फत निधी संकलित करणेत आला.
3) पुढे nab च्या अंधानिधी प्रमाणे card तयार करुना विद्यार्थ्यांच्या मार्फत निधी जमा करण्यात आला.
4) त्यानंतर आतापर्यंत समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत रु.3000/- किंवा त्या पटीत देणगी स्विकारुन सदरची देणगी यासाठी स्थापन झालेल्या व्यवस्थापन समितीच्या नावे मुदतबंद ठेवी(एफ.डी) केली जातो. 

     
माहिती : समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे आवश्यक असून, देशातील बहुतांशी समाज ग्रामीण भागात राहत असल्याने देश व राज्य यांच्या विकासासाठी शहरी भागातील शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षण गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभाग, दि.7 जानेवारी 2013 च्या शासन निर्णयान्वये गुणवत्ता विकास कार्यक्रमानुसार शाळांचे मूल्यांकन करताना शालेय व्यवस्थापन, लोकसहभाग, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता इ.बाबी लक्षात घेवून 200 गुणांपैकी मूल्यांकन केले जाते.
सन 2014-15 मध्ये गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत सर्व तालुक्यांना त्यांच्या गटातील शाळांचे मूल्यांकन करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार प्रथमत: केंद्रप्रमुख व विस्तार अधिकरी यांचेमार्फत सर्व शाळांकडून स्वयंमूल्यमापन प्रपत्र घेण्यात येईल. शासन निर्णयात नमूद केल्यानुसार तालुकास्तरावर समितीची स्थापन करण्यात येईल. या समितीमार्फत दि.01 जानेवारी 2015 ते 20 जानेवारी 2015 या कालावधीत शाळांचे मूल्यांकन करण्यात येईल. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातून 3 याप्रमाणे एकूण 27 शाळांची निवड करुन त्यांचे मूल्यांकन जिल्हास्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत करण्यात येईल व त्यातून जिल्हास्तरावर प्रथम तीन शाळांची निवड करुन त्यांचा गुणगौरव करण्यात येईल. 

    
माहिती : समाजाची निस्वार्थी भावनेने ,निष्ठेने शैक्षणिक तसेच सामाजिक सेवा करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना अंगिकृत कामात त्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक पुरस्कार दिला जातो. सांगली जिल्हयातील 9 प्राथमिक व 1 विशेष (कला, क्रीडा, संगीत, अपंग यांपैकी) अशा एकूण 10 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो. पंचायत समिती स्तरावरुन आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी व सभापती यांच्या शिफारशीने प्राप्त होतात. त्यानंतर जिल्हा स्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यात येते. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून 1 याप्रमाणे 9 प्राथमिक व संपूर्ण जिल्हयातून 1 विशेष शिक्षक (कला, क्रीडा, अपंग व संगीत ) अशा 10 प्राथमिक शिक्षकांची निवड केली जाते. तसेच सदरच्या निवडीला मा. आयुक्त यांची कार्योत्तर मंजूरी घेतली जाते. शिक्षक पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या दिवशी केले जाते. सदर योजनेसाठी जिल्हा परिषद सेस मधून रक्कम 40,000/- (चाळीस हजार मात्र) तरतूद मंजूर आहे. तसेच सन 2014-15 या आर्थिक वर्षापासून जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी रक्कम . 50,000/- तरतूद आहे. 

       
     
उत्तर : शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी ,प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यत मुलांचा औपचारिक /आनौपचारिक शिक्षण प्रक्रियेत सहभाग होण्याच्या दृष्टीने किमान शैक्षणिक कौशल्ये /गुणवत्ता यांची प्रगतीसाठी ,बालकांना शिक्षण प्रक्रियेचा आनंद घेता यावा यासाठी कृतीयुक्ती अध्ययन पद्धती कार्यक्रम उपयुक्त आहे. 


उत्तर : सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळामध्ये सुरु असलेल्या इयत्ता १ली ते ८ वी च्या शाळामध्ये गणित व विज्ञान शिक्षकांची असलेली कमतरता भरून काढून विद्यार्थ्यांना गणितातील कठीण पाठ्यांशाच्या अध्यापनावर विशेष भर देणे तसेच विज्ञान विषयातील प्रयोगांचे प्रात्यक्षिकामार्फत संबोध स्पष्ट् करणे व प्रयोगातून पडताळा घेवून निष्कर्ष काढणे आणि गणित व विज्ञान विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे यासाठी या योजनेंतेर्गत प्रत्येक तालुक्यातील विज्ञान महाविद्यालयातील विध्यार्थी शाळावर जावून विध्यार्थ्यांना अध्यापना करतील . 
    


 वारंवार विचा 

रले जाणारे प्रश्न

Thursday, 9 August 2018

💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊

💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊

*दि.10/08/2018* रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना (वय वर्ष 1 ते 19) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.

🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺आतड्याला सुज येणे.

🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.

🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.

🔹 *जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम*

🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे.

🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 10/08/2018* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.

🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन दि 16-08-2018 गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे.
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या be नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही...
👶👦 *SMT*

Thursday, 19 July 2018

Mdm

*MDM Rejected केलेल्या दिवसाचा डाटा भरण्यासाठी सुविधा उपलब्ध.*
                     *तसेच*
*MDM मागील राहिलेल्या दिवसांची माहिती भरण्यासाठी आता 8 मार्च 2017 पर्यंत मुदतवाढ.*
        *MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरण्यासाठी दिनांक 1/03/2017 ते 5/03/2017 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. पण अजूनही काही शाळांची माहिती भरणे बाकी आहे. म्हणून यासाठी आत्ता 8/3/2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.तसेच आपण यापूर्वी चुकलेली माहिती BEO Login वरून reject करून घेतली होती. ही Rejected माहिती पुन्हा एकदा नव्याने भरण्यासाठी पण सुविधा उपलब्ध झाली आहे.*
           *मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की  MDM चे बील हे कोणत्याही परिस्थितीत अॉनलाईन काढले जाणार आहे. म्हणून MDM Login केल्यानंतर आपल्या शाळेची आजअखेर प्रत्येक दिवसाची माहिती आपण अॉनलाईन भरली आहे का हे प्रत्येक महिन्याचे कॅलेंडर ओपन करून पहा आणि ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली असेल त्या त्या दिवसाची माहिती केंद्रप्रमुख लॉगिन वरून भरून घ्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक महिन्याचे अॉनलाईन बील योग्य प्रकारे मिळण्यास मदत होईल.*

*@ MDM केंद्रप्रमुख लॉगिन वरून कसे भराल?@*
   *आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांना केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आता ही मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येईल.*

*User ID - केंद्रप्रमुखांचा*
*Password - केंद्रप्रमुखांचा* 

       🙏 *शिवाजी नवाळे सर* 🙏

 *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*

   https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
   *MDM Daily INFO वर क्लिक करा.*
⬇
  *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो दिवस व महिना तारखेच्या कॉलम मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
* उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
                   
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
🙏😂🙏

Mdm

*@ MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती मोबाईल वरून कशी भरावी?*

🙏 *शिवाजी नवाळे सर* 🙏

*मित्रांनो या आर्थिक वर्षांत एप्रिल 2018 पासून शालेय पोषण आहार योजनेसाठी दरमहाचे इंधन मानधन व भाजीपाला हे बील राज्यस्तरावरून अॉनलाईन आपल्या शाळेच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यासाठी आपली MDM ची एप्रिल 2018 पासून आजअखेरची राहिलेल्या दिवसाची माहिती अॉनलाईन भरून घ्या.यासाठी 14 जुलै 2018 ते 19 जुलै 2018 अशी मुदत दिली आहे.*

▶ *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*मोबाईल मधील Google Chrome ओपन करा.त्यामध्ये खालील वेबसाइट टाका.*
 https://education.maharashtra.gov.in/mdm

*केंद्रप्रमुखांचा MDM चा User ID आणि Password टाकून लॉगिन करा.*
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो महिना व तारीख तारखेच्या कॉलम मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
*उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
                *शिवाजी नवाळे सर*
                  *राहुरी अ'नगर*
                  *समूह प्रमुख*
         *प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र समूह*
               *WhatsApp number*
                   *7758074275*
                *Calling number*
                   *9284726399*
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
                 
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
*ता:क- याच माहितीचा उपयोग कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून MDM मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरण्यासाठी करू शकता.*

Mdm

*@ MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती मोबाईल वरून कशी भरावी?*
👇👇💥💥🇮🇳🇮🇳

 *MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*मोबाईल मधील Google Chrome ओपन करा.त्यामध्ये खालील वेबसाइट टाका.*
 https://education.maharashtra.gov.in/mdm

*केंद्रप्रमुखांचा MDM चा User ID आणि Password टाकून लॉगिन करा.*
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो महिना व तारीख तारखेच्या कॉलम मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
*उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
      🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
            *सतिष वरोकार*
           *9890850971*
       
  🔵🔶🔵🔶🔵🔶🔵🔶🔵
                 
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
*ता:क- याच माहितीचा उपयोग कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वरून MDM मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरण्यासाठी करू शकता.*

Mdm

*अत्यंत महत्वाचे*
*mdm app विषयी थोडेसे*

1) आताच बऱ्याच जिल्ह्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पार पडल्या काहींच्या बाकी आहे यानंतर आपण जे mdm app वापरणार आहात ते आपली बदली झाल्यामुळं नवीन शाळेसाठी वापरणार आहोत. त्यासाठी आपणाला आपल्या मोबाईल मध्ये पूर्वीच्या शाळेचे reg असलेले mdm app uninstall करणे आवश्यक आहे. परंतु uninstall करण्यापूर्वी app setting मध्ये mdm app ला क्लीक करून शेवटी खाली उजवीकडे clear data करावा व नंतर uninstall करावे. आता आपली शाळा बदलल्यामुळे नवीन शाळेचे app आधीच्या शिक्षकाच्या मोबाईल ला reg असल्या कारणाने आपल्याला otp sending fail असा msg येणार आहे, यासाठी शालेय पोषण कार्यालयातून आपल्या नवीन शाळेसाठी आपला मोबाईल क्रमांक reg करून घ्यावा आणि मग नवीन शाळेचे रजिस्ट्रेशन आपला मोबाईल नंबर टाकून करावा.
2) आपली शाळा बदलली नसेल पण आपण मोबाईल (device) नवीन घेतला असेल तर (आपला register मोबाईल नंबर बदलला नसेल तर) mdm च्या hm लॉगिन ला जाऊन app सेटिंग मध्ये जाऊन  change device वर क्लिक करावे. नवीन मोबाईल मध्ये app install करावे आणि registration करून घ्यावे
App साठी खालील लिंक वर क्लीक करावे
https://education.maharashtra.gov.in/mdm/files/ucbrowser/MDMApp.apk

*शिक्षक हितार्थ*.......!

अध्ययन स्तर

अध्ययन स्तर निश्चिती  2018-2019 https://goo.gl/forms/qa1xlASyA8CrhZFf2

click here

सदर लिंक अजून काही शाळांनी भरलेले नाही .म्हणून लिंक भरण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढविले आहे.तरी सर्व राहिलेल्या शाळांनी दिनांक 20 जुलै 2018 अखेर भरावी.त्यानंतर मुदत वाढविले जाणार नाही.

                            प्राचार्य
                     DIECPD सांगली.

Saturday, 7 July 2018

4 th/ 7 वी जि.प. Scholarship परीक्षा syllabus

4थी व 7वी  जिल्हा परिषद शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार
  SYLLABUS

    DOWNLOAD


          CLICK  HERE