*जिल्हांतर्गत बदल्यांबाबत* 2022-2023
*दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी चे शासन परिपत्रक*
*दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे "विवरण पत्र - १ बदलीस पात्र शिक्षक" बाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :*
*जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र- १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.*
*पत्र डाउनलोड करा.*👇
No comments :
Post a Comment