पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

विद्यांजली पोर्टलवर शाळा नोंदणी कशी करावी?

  विद्यांजली पोर्टलवर शाळा नोंदणी कशी करावी? |vidyanjali portalvar shala nondani kashi kravai? 

School Ragistration link 

   Click here






विद्यांजली पोर्टलवर शाळा नोंदणी  कशी करावी |vidyanjali portalvar shala nondani kashi kravai? 

आजच्या लेखात आपण विद्यांजली या पोर्टलची ओळख व विद्यांजली पोर्टल वर शाळा नोंदणी कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत.विद्यांजली पोर्टल वर school registration करण्या आनोंदणीधी विद्यांजली  पोर्टल किंवा हा उपक्रम काय आहे?कसा कार्य करणार आहे ?याविषयी माहिती पाहूया.


विद्यांजली पोर्टल उपक्रमाविषयी,योजना माहिती |vidyanjli upkram project 

विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला व  शाळांच्या बळकटीकरणासाठी चा एक सुंदर उपक्रम(योजना) आहे. या विद्यांजली उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात अनमोल असे बदल घडवून आणण्यासाठी भारत सरकारने हाउपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमाची माहिती पाहण्या आधी या शब्दाचा अर्थ पाहूया.

 विद्यांजली शब्दाचा अर्थ |vidyanjli arath concept

विद्यांजली हा संस्कृत भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला गेलो व त्याची फोड केली तर,विद्या म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज आणि अंजली म्हणजे अर्पण. आपल्या दोन्ही हाताने अर्पण करणे पण काय तर भौतिक साधने आणि ज्ञान असे यात अपेक्षित आहे.थोडक्यात काय तर आपण अनेक गोष्टी इतरांना देत असतो अर्पण करत असतो ,त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रात देखील आपण ही अर्पण भूमिका ठेवणे. म्हणजेच देण्याची भूमिका ठेवणे हे यामध्ये अपेक्षित आहे. थोडक्यात शिक्षण क्षेत्रात बदल करण्यासाठी लोकांनी ,समुदायांनी वेगवेगळ्या संस्थांनी पुढाकार घेणे आणि शिक्षण व्यवस्था मजबूत करून भारताला शिक्षण क्षेत्रात अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न करण्याचे माध्यम म्हणजे विद्यांजली होय.

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अपेक्षा| NEP 2020 chi apeksha

आपण जर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 चा बारकाव्याने अभ्यास केला तर, त्यामध्ये शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांचा तसेच खाजगी क्षेत्रातील इच्छुक लोकांचा सहभाग घेऊन आपल्याला शिक्षण क्षेत्रात बदल घडवता येतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.किंवा शिक्षण क्षेत्रात छान बदल घडण्यासाठी जे जे इच्छुक आहेत त्या सर्वांची मदत घेणे असे यात अपेक्षित आहे यासाठी जे प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे.ते म्हणजे विद्यांजली पोर्टल 2.0होय. या विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात बहुतेक सुख सुविधा आणि गुणवत्ता वाढ यासाठी लोकांची मदत घेणे अशा दोन्ही पातळीवर काम चालणार आहे.

   विद्यांजली उपक्रमाचा उद्देश | vidyanjali upkrmachaa uddesh a

विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने सुरू केलेला एक छान  उपक्रम आहे.हा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि ते दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सार्वजनिक त्याच पद्धतीने खाजगी क्षेत्रातील लोकांचे योगदान या उपक्रमासाठी घेतले जाणार आहे. थोडक्यात काय तर लोकांचा आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात किंवा सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळांच्या दर्जात अमुलाग्र बदल करणे भौतिक सुख सुविधा साधने शाळांना पुरवणे ,त्याचबरोबर शाळांची गुणवत्ता देखील वाढवणे.ती वाढवण्यासाठी समाजातील विविध घटकांची मदत घेणे, यासाठी विद्यांजली उपक्रम सुरू केलेला आहे.

 

विद्यांजली उपक्रमात सहभागी होण्याचे दोन मार्ग

भारत सरकारच्या या शिक्षण क्षेत्रात क्रांती असणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी दोन मार्ग सांगितलेले आहेत या दोन मार्गांमध्ये


विद्यांजली उपक्रम सहभाग |vidyanjli upkrma sahbahg  


  1. शाळेसाठी भौतिक सुविधा पुरवणे | shalela bhautik suvidha purvane

एखाद्या शाळेमध्ये मानवी किंवा मनुष्यबळ व्यवस्थित  असेल परंतु त्या शाळेला इमारत पंखे, स्वच्छता, शैक्षणिक साहित्य यासारख्या सुविधा नसतील तर अनेक संस्था किंवा व्यक्ती पुढे येऊन एखाद्या शाळेला मदत करू शकतात. आणि या मदतीतून शाळेचा कायापालट होऊ शकतो. थोडक्यात यामध्ये भौतिक साधनांचा समावेश केलेला आहे 


2 शालेय सेवा पुरवण्यात मदत | sevaa puravane

यामध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी,अध्ययन क्षमता अशा  वेगवेगळ्या पद्धतीने आपण मदत करू शकतो. यासाठी आपण  शाळेमध्ये स्वयंसेवक म्हणून देखील काम करू शकता. थोडक्यात भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल करण्यासाठी लोक आणि समूह यांचा संयुक्त सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती आणण्यासाठी विद्यांजली उपक्रम सुरू करण्यात आला आहे. 

  

विद्यांजली उपक्रम सहभाग | vidyanjli upkram sahbhag

विद्यांजली पोर्टल द्वारे सहभाग| vidyanjli dware sahbhag


विद्यांजली पोर्टल च्या साह्याने भारतीय शिक्षण प्रणालीत हातभार लावणाऱ्या शाळांना, सेवाभावी संस्थांना, स्वयंसेवकांना विद्यांजली पोर्टलच्या माध्यमातून सहभागी होण्याची सोय करण्यात आलेली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सेवानिवृत्त शिक्षक ,संशोधक सरकारी अधिकारी, माजी सैनिक ,विविध शैक्षणिक संस्था, शिक्षण क्षेत्रात आवड असणाऱ्या व्यक्ती अध्यापन क्षेत्रात मदत करू पाहणारे व्यक्ती सहभागी होऊ शकतात.

 

विद्यांजली उपक्रमासाठी  कोणत्या प्रकारची मदत आपण देऊ शकता.| vidyajlis konti mdat karu shakta

विद्यांजली या भारत सरकारच्या उपक्रमातूम  आपण भौतिक सुख सुविधा शाळांना पुरवू शकता ?याचबरोबर मुलांच्या अध्ययनामध्ये प्रगती व्हावी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी मार्गदर्शक म्हणून देखील काम करू शकता? शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षनेआयोजित करू शकता त्याचबरोबर विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण या संदर्भात मार्गदर्शन देखील करू शकता.


थोडक्यात काय तर विद्यांजली या भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत व्यक्तिगत आणि सामुदायिक पातळीवर जे स्वेच्छेने तयार आहेत.अशा सर्वांची मदत घेऊन शिक्षण व्यवस्था बळकट करणे हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020  nep 2020 यामध्ये देखील अशीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे. यासाठीच आपल्याला विद्यांजली पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करणे हे अतिशय गरजेचे आहे.

विद्यांजली उपक्रमातून लोकांना संधी| vidyanjli sahbhag

विद्यांजली उपक्रम किंवा योजनेच्या माध्यमातून ज्या लोकांना शिक्षण क्षेत्रातील किंवा अध्यापनाच्या क्षेत्रातील अनुभव किंवा विद्यार्थ्यांना देण्यासारखे नवीन असे ज्ञान आहे व्यक्तींना एक खुले व्यासपीठ मिळणार आहे. त्याचबरोबर अशा काही व्यक्ती ज्यांना नियमानुसार शाळांमध्ये जाऊन अध्यापन करता येणार नाही, परंतु ते शाळेसाठी आपले योगदान देणार आहेत. अशांना शाळेमध्ये जाऊन अध्यापन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. थोडक्यात काय तर शिक्षण प्रणालीत सर्वच पातळीवर बदल होण्यासाठी भारत सरकारने एक आगळावेगळा उपक्रमाला आहे.हे नक्की.

भारत सरकारच्या स्कूल शिक्षा आणि साक्षरता विभाग शिक्षा मंत्रालय यांनी विद्यांजली वेब पोर्टलला अतिशय आकर्षक असे रूप देऊन वेगवेगळ्या सेवाभावी संस्था, स्वयंसेवक शाळांशी संपर्क करून शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक दर्जा सुधारण्यासाठी मदत करू शकतात.


विद्यांजली पोर्टल वर शाळा नोंदणी कशी करावी| विद्यांजली portal school registration process

विद्यांजली पोर्टलवर लॉगिन करणे | vidyanjli var login 

  विद्यांजली पोर्टलवर लॉगिन करून आपण रजिस्ट्रेशन करू शकता. विद्यांजली  पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.त्यामध्ये स्वयंसेवक भारतीय तसेच स्वयंसेवक nri आहे व व तिसरा प्रकार आहे तो म्हणजे स्कूल. स्कूल ,शाळा लॉगिन होय.यातील विद्यांजली पोर्टलवर स्कूल लॉगिन करणे.

 शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल वरती अधिकाधिक शाळांनी आपली नोंदणी करणे.अपेक्षित आहे.म्हणजेच लॉगीन करणे आवश्यक आहे,'यासाठी सर्वप्रथम खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करावे


विद्यांजली पोर्टल नोंदणी लिंक |vidyanjlai poratl link  

vidyanjli registration

       Click here 


School Ragistration link 

   Click here



 

 विद्यांजली पोर्टल वर असे करा registration


आपल्याला अगोदर portal वर registration वकरावे लागते.ते कसे ते पाहूया.....


1.विद्यांजली पोर्टलच्या संकेतस्थळावर गेल्यावर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन tab वरती क्लिक करावे.


2. शाळेचा यु-डायस व captcha टाकणे.


स्कूल रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेचा यु-डायस अगदी अचूकपणे टाकून captcha टाकावा व नंतर सबमिट बटनावर क्लिक करा.


3.शाळेचा तपशील 


यानंतर शाळेचा तपशील आपल्यासमोर येईल.ती माहिती चेक करून head master mobile no टाकून email addres टाकावा.आपल्याला get otp यावर क्लिक करा.


या पद्धतीने registraion होईल यानंतर लॉग इन करावे.


लॉगिन करणे|log in karane

log in option वर क्लिक करणे आपला mobile no हाच तुमचा login id असेल, त्यांनतर आपण 6 अंकी कोड टाकून लॉग इन करावे. आपण कायम पासवर्ड देखील तयार करु शकता. यासाठी genrate password वर क्लिक करा व password तयार करून घ्या. या नंतर सेंड लिंक वर क्लिक करा.व त्यांनतर mail वर जाऊन लिंक वर क्लिक करून आपला password तयार करून log in करा.


ज्यांना pasword जनरेट करायचे नाही ते ठरवा फोन कोड च्या माध्यमातून देखील log in करू शकता.


प्रोफाइल अपडेट करा | profile update

आपला पता,इतर माहिती भरा व school sync यावर क्लिक करा यानंतर profileअपडेट होईल.


request टाकणे |request takne

आपल्या  शाळेला  हव्या असणाऱ्या सुख सुविधा किंवा साधनांच्या बाबतीत आपण माहितीवरून रिक्वेस्ट पाठवू शकतो अशा पद्धतीने आपण आपले पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करू शकतो.


जर कोणी उत्सुक असतील तर त्या संस्था,व्यक्ती आपल्याशी म्हणजे शाळेला मदत करू शकतात.थोडक्यात लोकसहभाग वाढवणे असे यात अपेक्षित आहे


थोडक्यात काय तर आपल्या शाळेची भौतिक आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून वाढ करायचे असेल तर आपल्याला विद्यांजली पोर्टल वरती शाळा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या शाळेसाठी असणाऱ्या गरजा लक्षात घेऊन रिक्वेस्ट देखील पाठवायची  आहे.या संदर्भात जर कोणी   इच्छुक असतील ते आपल्या शाळेला मदत करतील आणि आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देता येईल.


आमची ही विद्यांजली पोर्टल माहिती  संदर्भात ओळख करून देणारी त्याचबरोबर विद्यांजली  पोर्टल कोणते काम करणार आहे? आणि विद्यांजली पोर्टल वरती रजिस्ट्रेशन कसे करायचे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती पाहिली आमचा हा लेख आपणास कसा वाटला ते नक्की कळवा ही माहिती इतरांना देखील पाठवा . पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद!

No comments :

Post a Comment