पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Friday 16 December 2016

सांगली जिल्हास्तर स्काउट गाईड मेळावा २०१६-१७ दिघंची ता.आटपाडी मेळावा सन २०१६-१७ स्थळ;- तालुका क्रिडा संकुल ,मायणी रोड, दिघंची ,

सांगली जिल्हास्तर स्काउट गाईड मेळावा २०१६-१७ दिघंची ता.आटपाडी

सांगली जिल्हास्तर स्काउट ,गाईड,कब ,बुलबुल  मेळावा सन २०१६-१७ 
स्थळ;-  तालुका क्रिडा संकुल ,मायणी रोड,
दिघंची ,तालुका -आटपाडी,जि.सांगली
दिनांक २२,२३,२४ डिसेंबर २०१६ 
http://surajmansurtamboli.blogspot.in/p/blog-page_44.html?m=1
 

सांगली जिल्हास्तर स्काउट गाईड मेळावा २०१६-१७ दिघंची ता.आटपाडी

सांगली जिल्हास्तर स्काउट ,गाईड,कब ,बुलबुल  मेळावा सन २०१६-१७ 
स्थळ;-  तालुका क्रिडा संकुल ,मायणी रोड,
दिघंची ,तालुका -आटपाडी,जि.सांगली
दिनांक २२,२३,२४ डिसेंबर २०१६ 

गणित प्रशिक्षण

राज्यातील १ ली ते ५ वी ला अध्यापन करणाऱ्या शासकीय    ( जि.प./स्थानिक स्वराज्य संस्था) व खाजगी अनुदानित शाळामधील २५ % शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणेबाबत प्रशिक्षणासाठीची गुगल फॉर्म लिंक https://www.research.net/r/mathstraining ही आहे . या लिंकच्या मदतीने आपल्या जिल्ह्यातील  जास्तीत जास्त संबंधित शिक्षकांकडून मागणी पत्र भरून द्यावे. ही लिंक विदया प्राधिकरणाच्या वेबसाईटवर दि. १९/१०/२०१६पासून उपलब्ध आहे. या लिंकचे नाव गणित प्रगल्भीकरण प्रशिक्षण मागणी प्रपत्र असून विदया प्राधिकरणच्या वेबसाईटवर यापूर्वी गणित व भाषा प्रशिक्षणापेक्षाही लिंक भिन्न असून  https://www.research.net/r/mathstraining या लिंकवरील मागणी पत्रात माहीती भरलेल्या शिक्षकांनाच २५ % प्रशिक्षणासाठी गृहीत धरण्यात येईल. ही बाब संबंधित शिक्षकांच्या निदर्शनात आणून द्यावी. गुगल फॉर्मवर माहिती भरण्याची अंतिम मुदत ३१/१२/२०१६ ही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत या लिंकचा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसार करावा.
 -  गणित विभाग विद्याप्राधिकरण

Sunday 11 December 2016

शाळा सिध्दी online माहिती 

🌞 प्रिय शिक्षक बंधू भगिनी 🙏
✨ *शाळा सिद्धी आॅनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया* ✨

🔵 इंटरनेट सुरु करा.
🔵 Google Chrome ओपन करा.
🔵 Address बार मध्ये *"14.139.60.151/sse/login.php"* टाईप करुन Enter  दाबा.
🔵 NPSSE ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये Login च्या box मध्ये *"Create New Account"* या पर्यायावर क्लिक करा.
🔵 Add User ची विंडो ओपन होईल. त्यामध्ये *"User Name / UDISE"* च्या पुढे आपल्या शाळेचा UDISE कोड टाईप करा.
🔵 त्याखाली असलेल्या *"Password"* च्या समोर आपल्या आठवणीत राहील असा पासवर्ड टाईप करा. *लक्षात ठेवा : प्रत्येक लॉगीनच्या वेळी हा पासवर्ड आपल्याला टाकावा लागणार असल्यामुळे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे.*
🔵 त्याखाली *"E-mail"* च्या समोर आपल्या शाळेचा ई-मेल आय डी टाईप करा. शाळेचा ई-मेल आय डी तयार नसेल तर तो Gmail. Com वर जाऊन तयार करुन घ्या. किंवा आपल्या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्या.
🔵 त्याखाली *"Role Type"* या पर्यायासमोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔵 वरिल सर्व बाबी बरोबर नमुद केल्याची खात्री झाल्यावर सर्वात खाली असलेल्या *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.

✨ *आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी झालेली आहे.* ✨

🔷 आता आपल्या शाळेचा *"DASHBOARD"* बघूया.
🔹डेस्कटॉपवर वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या *"LOGIN"* या पर्यायावर क्लिक करा.
🔹LOGIN विंडो दिसेल. त्यामध्ये *"USER TYPE"* च्या समोर *"School User"* हा पर्याय निवडा.
🔹त्याखाली आपल्या शाळेचा *"UDISE Code"* टाईप करा.
🔹पासवर्ड टाकून *"Submit"* या पर्यायावर क्लिक करा.
*आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसू लागेल.*

✨ *शाळेची Basic Information भरणे.* ✨

🔵 आपल्या शाळेचा Dashboard समोर दिसल्यावर त्याच्या डाव्या बाजूला *"Basic information"* दिसते. त्यामध्ये *Learner's* या पर्यायाखाली :
1) Demographic Profile
2) Attendance Rate
3) Performance in key subjects
4) Learning Outcomes
*Teachers* या पर्यायाखाली
1) Numbers of Teachers
2) Teacher's Attendance

*वरील प्रत्येक पर्यायासमोर क्लिक केल्यावर त्यामध्ये भरावयाच्या माहीतीची विंडो ओपन होते. ती सर्व माहिती भरुन झाल्यावर खात्री करुन Submit पर्यायावर क्लिक करायला विसरु नका.*

✨ *7 क्षेत्र व 45 मानकांची माहीती भरुन स्वमूल्यमापन अहवाल भरणे.* ✨
 बंधू भगिनींनो!  Learners व Teachers ची माहीती भरल्यावर त्याच विंडोमध्ये आपल्याला *"7 KEY DOMAINS AS CRITICAL PERFORMANCE AREAS OF SCHOOL* च्या खाली सर्व 7 क्षेत्र दिसतील.
*शाळा सिद्धी मध्ये आपण चर्चा करीत असलेल्या प्रत्येक क्षेत्रातील मानकांची चांगल्या पद्धतीने उपलब्धता वाटल्यास तशी नोंद स्वयं - मूल्यमापन अहवालात करावी. उगाच खोट्या नोंदी करु नये.*
स्वयं मूल्यमापन करतांना प्रत्येक क्षेत्र विकसित करणे आवश्यक आहे. ते कसे करावे या साठी आपण प्रत्यक्ष चर्चेत भाग घेणे आवश्यक आहे.

*बंधू भगिनींनो! आजच आपल्या शाळेची नोंदणी शाळा सिद्धी साठी करून आपल्या परिसरातील शाळांसाठी आपली शाळा आदर्श बनवूया.* सर्वांना उज्ज्वल भविष्याच्या हार्दीक शुभेच्छा! 🙏💐

: *अतिशय महत्त्वाचे : Learners आणि Teachers याची माहिती भरतांना ती 2015-16 व 2016-17 या दोन्ही सत्रांची भरावी.*




Saturday 10 December 2016

परदेशी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शिक्षक/अधिकारी यांनी स्वखर्चाने जाणेसाठी अर्ज

शिक्षक अभ्यास परदेश दौर्‍यासाठी पुढील लिंकवर आपली माहीती भरावी.http://www.research.net/r/teacherstudytour

परदेशी शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शिक्षक/अधिकारी यांनी स्वखर्चाने जाणेसाठी अर्ज

महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांनी महाराष्ट्रातील शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हाव्यात व त्यासंदर्भात माहिती व्हावी यासाठी परदेशातील काही शिक्षणप्रणाली व तेथील शाळा यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव मा. श्री.नंदकुमार साहेब यांनी यासाठी अनोखी कल्पना मांडली.आजपर्यंत फक्त काही दर्जाचे अधिकारीच शासकीय खर्चाने परदेश दौरा करत होते.हा जरी शासकीय खर्चाने नसला तरी ज्या शिक्षकांना अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा बनवायच्या आहेत पण त्या संदर्भातील सर्व माहिती उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी शासनाने स्वतः पुढाकार घेऊन हा परदेश दौऱ्याचे आयोजन केले आहे.त्यातील पहिली तुकडी आता सिंगापूर दौऱ्याला रवाना सुद्धा झाली.

यासाठी काय काय करावे?
जर आपण शिक्षण विभागाशी निगडीत असाल आणि तुमची तीव्र इच्छा असेल तर खाली दिलेला फॉर्म भरा.
https://www.research.net/r/teacherstudytour

सदर studytour साठी चा जो खर्च आहे तो प्रत्येकाने स्वतः करावयाचा आहे पण या अभ्यास दौऱ्याचे सर्व नियोजन महाराष्ट्र शासन करणार आहे.त्यामुळे कोणाचीही धावपळ होणार नाही.

Monday 5 December 2016

आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा निर्मिती Link

*महाराष्ट्र राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दीपस्तंभ शाळा निर्मितीसाठी अर्ज*

राज्याने मागील वर्षापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायला सुरुवात केली आहे. त्यास शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही ज्याच्यात महाराष्ट्रातील शिक्षक कमी दिसतात. शिक्षकांचा हा उत्साह पाहूनच राज्य शासनाला राज्यातील शिक्षणाचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्याचा निर्णय दिनांक १४ ऑक्टोबर २०१६  च्या शासन निर्णयानुसार घेतला आहे.  राज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याची यानिमित्ताने आपणास संधी मिळाली. सुरुवातीस १०० शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाचे करावयाच्या ठरविण्यात आले असून उत्साही, मेहनती, नित नवीन शिकणारे आणि समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवणारे शिक्षक, ज्यांची शाळा संकल्पना पत्रात  दिलेले निकष पूर्ण करतात त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.  संकल्पना पत्र (Concept Note) विद्या प्राधिकरणाच्या www.mscert.org.in पाहता येईल.

तर दिपस्तंभ शाळेसाठीचे निकष पूर्ण करणा-या शाळांनी  https://www.research.net/r/maharashtrainternationalschools लिंकवर दि. ९ डिसेंबर २०१६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

Thursday 1 December 2016

माध्यमिक शिष्यवृती परीक्षा २०१६-१७ online माहिती 

माध्यमिक शिष्यवृती परीक्षा online माहिती  २०१६-१७
http://www.mscepune.in

http://www.puppss.in/default.aspx

      VDO  DOWNLOAD CLICK HERE