पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Saturday 25 November 2017

अध्यापनात 4D APP ,MODERN TECHNOLOGY चा वापर, VR BOX चा वापर*

अध्यापनात  4D  APP ,MODERN  TECHNOLOGY  चा वापर, VR  BOX  चा वापर*
                   





*https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*
*ऑगमेंटेड रिऍलिटी कलासरूम आणि 4D अध्यापन*.
*EVERY  DAY WE TRY TO GIVE  SOMETHING  NEW  TO  OUR  STUDENTS*'

     *TECHNOSAVY  VISION 2020*
*दप्तरविना शाळा-शनिवार* *E-LEARNING*

     *अध्यापनात  4D  APP ,MODERN  TECHNOLOGY  चा वापर, VR  BOX  चा वापर*
*शिक्षणामध्ये  आधुनिक  technology  चा वापर*
*पुस्तके करू जिवंत....*
*जिल्हा परिषद शाळेत 4D* *अध्यापनाचा वापर*
 *आज मोबाईल,संगणक,टॅब, प्रोजेक्टर इत्यादी आधुनिक साधनांचा अध्यापनात वापर केला जातोय.e-learning* *पध्दत्ती ने अध्ययन अध्यापन* *क्रिया आनंददायी,मनोरंजक व प्रभावी होते आणि हे शक्य होते*
*विदयार्थ्यांना प्रत्यक्ष कृती व अनुभव दिल्यानेच*...!
*यासाठी गरज आहे ती कल्पकतेची, आणि धडपडीची*....!*
*आज आपण अशा एका नाविन्यपूर्ण व 3D/4D अध्यापनात  4D  APP ,MODERN  TECHNOLOGY  चा वापर, VR  BOX  चा वापर* *आश्चर्यकारकVR app चा अभ्यास करणार आहोत कि  ज्या मुळे *विद्यार्थी ,शिक्षक,पालक,लहान मोठे सर्वाना च प्राण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार व  आश्चर्या सोबत मनोरंजन व आनंद मिळणार आहे*
*होय*.
*या app मुळे कागदावरील प्राणी प्रत्यक्ष  वर्गात, मुलांमध्ये,आपल्यात आलेत व त्यांचा आवाज काढत आहेत असे वाटणार....!*
*म्हणजेच प्राणी व त्यांचे आवाज दोन्ही प्रत्येक्षच.......*

    *https://surajmansurtamboli.blogspot.in/?m=1*

 *सुरज मन्सुर तांबोळी*

Friday 24 November 2017

सरल महत्वाचे* : *सूचना क्रमांक* : *११३५* *दिनांक* : *२४/११/२०१७

*सरल महत्वाचे* :
*सूचना क्रमांक* : *११३५*
*दिनांक* : *२४/११/२०१७*
*प्रदीप भोसले,पुणे*

*(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )*
__________________________________________
➡ *जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाची सूचना*

*टीप: सदर पोस्ट मध्ये इतरांनी हस्तक्षेप करून गैरसमजूत होईल असे काही लिहिण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता लक्षात घेता अशा चुकीच्या पोस्ट वाचून आपले नुकसान होऊ नये म्हणून ही पोस्ट आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉग ला देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.पोस्ट बाबत सत्यता पडताळण्यासाठी ब्लॉगला भेट द्या.* __________________________________________

➡ *सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येते की,जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात न्यायालयीन प्रक्रियेमुळे झालेला विलंब,जिल्हास्तरावरून भरलेल्या माहिती मधील चुका दुरुस्त करावयासाठी लागलेला वेळ यामुळे चालू शैक्षणिक वर्ष संपत आले तरी बदली प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने तसेच पुढील शैक्षणिक वर्षाच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेला देखील या वर्षीप्रमाणे वेळ होऊ नये म्हणून सदर प्रक्रिया त्वरित सुरू करावयाची असल्याने दोन शैक्षणिक वर्षांच्या जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया मधील कालावधी अतिशय कमी राहील जी बाब प्रशासकीय दृष्ट्या योग्य ठरणार नाही यामुळे मधला मार्ग म्हणून वरिष्ठ स्तरावर चालू शैक्षणिक वर्षीच्या जिल्हा अंतर्गत बदल्या त्वरित न करता सन २०१७-१८ व सन २०१८-१९ या दोन्ही शैक्षणिक वर्षाच्या बदल्या एकत्ररित्या सन २०१८-१९ मध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे,याची नोंद घ्यावी.*

➡ *दरवर्षी जिल्हाअंतर्गत  बदली प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण होऊन शिक्षक बांधवांची देखील अडचण होणार नाही हे विचारात घेऊन जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया विहित कालावधी व सुनिश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे होणे आवश्यक असल्याने जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेकरिता नियोजित वेळापत्रक तयार करण्याचा शासनाने गांभिर्याने विचार केलेला आहे.असे वेळापत्रक नजीकच्या काळात लवकरच शासन स्तरावरून प्रसिद्ध होत आहे.*

 ➡ *या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना आपल्या जिल्ह्यातील ३१ मे २०१८ ही तारीख सन सन २०१८ च्या बदली प्रक्रियेसाठी संदर्भ दिनांक म्हणून विचारात घेऊन बदली पात्र शिक्षक,बदली अधिकार प्राप्त शिक्षक,शाळेमध्ये समाणिकरनासाठी रिक्त ठेवावयाचे उपशिक्षक,विषयनिहाय पदवीधर शिक्षक व मुख्यध्यापकांची पदे,एकूण रिक्त पदे  यांची सुधारित  माहिती ceo लॉगिन मध्ये भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन मध्ये ही माहिती भरण्यासंदर्भात लवकरच विभागनिहाय वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व जिल्ह्यांनी सदर माहिती आपल्या स्तरावर त्वरित तयार करून ठेवावी व देण्यात येणाऱ्या वेळापत्रकाप्रमाणे तत्परतेने भरावी.या वेळी या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारे चूका होणार नाही अशी दक्षता घेण्याच्या सक्त सूचना आज मा.श्री.असिम  गुप्ता साहेब,सचिव,ग्राम विकास मंत्रालय यांनी दिलेल्या आहेत.*

➡  *सदर माहिती ceo लॉगिन ला भरल्यानंतर लगेचच जाहीर करण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार शिक्षकांना संवर्गनिहाय फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या वेळी फॉर्म भरताना फक्त ३१/०५/२०१८ या तारखेच्या अनुषंगाने नव्याने जे शिक्षक बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त होतील त्यांनीच नव्याने फॉर्म भरावयाचे आहेत हे लक्षात घ्यावे.चालू वर्षी ज्या शिक्षकांनी आपले फॉर्म भरलेले आहेत अशा शिक्षकांनी आपले फॉर्म नव्याने भरण्याची आवश्यकता नाही याची नोंद घ्यावी.परंतु या वर्षी फॉर्म भरलेल्या ज्या शिक्षकांना आपल्या फॉर्म मधील पसंतीक्रमामध्ये वा इतर माहितीमध्ये काही बदल करावयाचा असेल तर तशी सुविधा देखील देण्यात येणार आहे,हे लक्षात घ्यावे.*

➡  *या वर्षी जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली नाही म्हणजे यानंतर ही प्रक्रिया पार पडणार नाही,२७/०२ च्या शासन निर्णय रद्द केला जाईल किंवा त्यात काही बदल केला जाईल तसेच इतर कोणत्याही बाह्यशक्तीमुळे अशा प्रकारे पारदर्शी online बदली होणार नाही असे कोणास वाटत असेल तर तो गैरसमज आहे अशा स्पष्ट सूचना मा.सचिव महोदयांनी आजच्या vc मध्ये दिलेल्या आहेत.त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व शिक्षक बांधवांनी संयम ठेवून पुढील थोडा काळ बदली आदेशासाठी वाट पाहण्याचे आवाहन देखील मा.सचिव महोदयांनी केलेले आहे याची नोंद घ्यावी.*

 ➡ *जे शिक्षक बांधव बदली प्रक्रिया त्वरित पार पाडावी म्हणून मागील काही दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत अशा सर्व शिक्षक बांधवांना पुढील काही दिवसातच बदली प्रक्रिया नव्याने सुरू होणार असल्याच्या सुचना देखील आजच्या vc मध्ये दिलेल्या आहेत.तसेच अशा सर्व शिक्षक बांधवांनी आपले उपोषण थांबवावे असे आवाहन देखील या वेळी करण्यात आलेले आहे,याची सर्व शिक्षक बांधवांनी नोंद घ्यावी.*

 ➡ *मागील काही महिन्यांपासून सर्व शिक्षकामध्ये बदली व्हावी वा न व्हावी याबाबत आपसात मतभेद दिसून येत आहेत. या बाबत मा.सचिव महोदयांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.शिक्षक बदली हा विषय आपल्या सेवेचा एक अविभाज्य भाग असला तरी या विषयाला अधिक महत्व न देता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे अशा सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत.*

➡ *आज vc मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे सन २०१७-१८ हे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी संगणक प्रणालीद्वारे बदली झालेल्या सर्व शिक्षकांच्या बदलीचे आदेश हे ceo लॉगिन ला उपलब्ध करून देण्यात येणार असून दिनांक ०१/०५/२०१८ ला बदली झालेल्या सर्व शिक्षकांना आपल्या जुन्या शाळेतून कार्यमुक्त करण्यात येऊन नवीन शाळेत हजर करून घेतले जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेप विरहीत व उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील कायम केलेली शासनाची धोरणात्मक online बदली प्रक्रिया १००% पार पाडण्यात येणार असल्याने बदली बाबत कोणीही अधिक काळजी करू नये ही सर्व शिक्षक बांधवांना विनंती.*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

➡ *राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.*

                               *लिंक*
                        *goo.gl/j9nFGk*

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*
Mobile no. :9404683229
*(Dont call,only whatsapp message)*
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

Thursday 23 November 2017

प्रतिनियुक्ती अर्ज संदर्भात

*प्रतिनियुक्ती अर्ज संदर्भात*

महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरण व सर्व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थांमध्ये प्रतिनियुक्ती साठी अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज भरण्याची अंतिम तारीख *३ डिसेंबर २०१७* (रात्री ११ वाजे पर्यंत) आहे.

इच्छुक असल्यास खालील लिंक वर अर्ज भरावा..

लिंक- https://www.research.net/r/drmdeput2017


- डॉ.सुनिल मगर
संचालक,
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे

Thursday 16 November 2017

MahaDBT Portal School HM User Name & Password

MahaDBT Portal School HM User Name & Password

 इ.५वी,इ.८वी शिष्यवृत्ती पाञ विद्यार्थींचे www.mahadbt.gov.in   या वेबसाइट
 Online Registration करुन शिष्यवृत्ती साठी आवश्यक माहीती भरावी व school login वरुनverify  करावी.

     या करिता मा.शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे., यांच्या कडुन प्राप्त
उदा.युजर नेम. headm  अंडरस्कोर व आपल्या शाळेचा (युडायस नंबर....)
* sampal user name
 पुढील प्रमाणे उदा. (headm_27110409308 ) व

✅ पासवर्ड- india@123

या डिफाँल्ट पासवर्ड चा वापर करुन नविन पासवर्ड तयार करुन विद्यार्थी ने भरलेली माहीती आवश्यक पुराव्यासह तपासुन व्हेरीफाय करावी चुकीची माहीती व्हेरीफाय करुन पाठविल्यास विद्यार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचित राहील्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी.
        

Tuesday 14 November 2017

बिरसा मुंडा

बिरसा मुंडा

भगवान बिरसा मुंडा, "धरती आबा" ज्यांची पृथ्वीचे वडील या अर्थाने , आदिवासी मध्ये ओळख आहे असे बिरसा मुंडा यांनी 1890 च्या ब्रिटीश सरकारच्या विरोधात एक भव्य लढा लढविला होता. पहिल्या काळात इंग्रज, जमीनदार यांनी दडपशाही वाढत्या केल्यानंतर, 1895 मध्ये बिरसा मुंडा यांची नियुक्ती आदिवासींच्या मनात (आपल्या अनुयायांसोबत) ब्रिटीश विरुद्ध एक निर्णायक युद्ध तुतारी अश्या पद्धतीने झाली. त्यांच्या विरोधात  ब्रिटिशांनी\ एकनिष्ठ ठिकाणी सुमारे दोन वर्षे नियोजित हल्ला मालिका केल्यानंतर, मुंडा वॉरियर्स कॉल, गाव "सेल, रकाब" कडे "डोंबारी हिल" वर एकत्र (जवळपास 20 कि.मी. लांब रांची-जमशेदपूर महामार्ग पासून) सुरू ठेवली. सरकारी दस्तऐवज असे सांगतात कि मुंडा यांची नियुक्ती, गनिमी युद्ध भाडे अवलंब, रांची आणि खुंती ब्रिटिश हल्ला या बद्दल गुन्हे दाखल करून हा निर्णायक हल्ला आयोजित केला होता. यात  मुख्यतः अनेक जण, पोलीस पुरुष ठार झाले आणि सुमारे 100 इमारती/घरे जाळण्यात आली. या "उलगुलान" (बंड) ला शमविण्यासाठी  नंतर आयुक्त श्री ए. क. फोबस  उपायुक्त श्री एच. सी. स्ट्रेटफीड यांनी स्वत चे नियम असणारी, आदिवासीन विर्दुः लढण्यासाठी आणि (उलगुलान) चिरडण्या करीता दोन सैन्य कंपनी तुकड्या दाखल केल्या.
        बंड प्रमाण कमी करण्यासाठी आयुक्तने 500 रुपये बक्षीस हे बिरसांन अटक करीण्याकरिता जाहीर केले होते. यावरून अंदाज येईलच कि ब्रिटीश प्रशासनासाठी हि बाब किती हादरा देणारी होती. "डूम्बारी हिल" येथे आणि "जालियान वाला बाग" येथे ब्रिटीश सरकारने हे बंड हाणून पाडण्याकरिता किती स्वैर गोळीबार केला आणि कित्येक शंभर लोक मारले गेले याची नोंद आहे मात्र अंदाजे खरी नोंद नाही सापडत. या सर्वाचा प्रतिशोध घेणे गरजेचे होते म्हणून नंतर ब्रिटिश सैन्यावर मुंडा वॉरियर्सने खूप हल्ला केला. पण यामध्ये आदिवासी समाजाचे देखील भरपूर असे नुकसान झाले. संपूर्ण डोंगराळ  भाग हा मृतदेहांनी सजून जणून नटून बसला होता. इंग्रज सरकारला हे सुंदरी विश्व कमी वाटत होते कि काय म्हणून, त्यांनी इतपर्यंतच न थांबता पाशवी कत्तल केल्यानंतर मृतदेह टेकडीच्या खोल जंगलात आणि झऱ्यात टाकण्यात आलली. जायबंदी झालेले अनेक आदिवासी जिवंत पुरले. संपादकीय मार्च 25, 1900, मुत्सद्दी प्रकाशित मते,  हा आकडा अंदाजे 400 असावा जो डोंबारी टेकडीवर झालेला अमानुष हत्याकांड होता. परंतु, नंतर प्रशासन खरं दडपल आणि फक्त अकरा जण ठार झाले अस जाहीर केल.  त्यानंतर 7 जानेवारी ते जानेवारी 9, 1900 या दिवशी दोन दहशत निर्माण करण्याकरिता विमा दावा केला की, मृत मध्ये बिरसा मुंडा हे देखील आहेत. त्याने आदिवासी क्षेत्रावर भीती आणि वाद पसरेल.

मार्च 3, 1900 उपायुक्त रांची,  पत्र दिनांक 12 नोव्हेंबर 1900 सीआर-1397 पहा. त्यात आजून माहिती समोर आली जवळपास 460 आदिवासी सापडत नव्हते 400 आदिवासी संपादकीय अनुसार जर मारले गेले होते तर बाकीचे जिवंत असायला हवे होते,  त्यामध्ये 15 जणांना विविध गुन्हे आरोपी केले होते. त्यातच कोणाकडून तरी माहिती मिळाली कि, चक्रधरपूर मध्ये जामकोपाई  वनात बिरसा मुंडा झोपलेले आहेत. आन इंग्रज शासनान झोपलेल्या असलेल्या मुंडाना अटक केली. उरलेले त्यांच्या सोबत होते त्या 45 लोकांवर दोषी करार करीत गुन्हे दाखल झाले. एकाला फाशीची शिक्षेचा पुरस्कार प्राप्त झाला, 39 जणांना जन्मठेप सुनावली गेली आणि 23 लोकांना 14 वर्षे पर्यंत अटी ग्राह्य धरून शिक्षा कायम करण्यात आली. यात सोबत असणारे तर होतेच परंतु सहकारी दुसरे देखील सोबत आले होते. त्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. 10 पेक्षा कमी महिन्यांत चाचण्या दरम्यान तुरुंगात आदिवासी नायक बिरसा मुंडा यांचा जो चल करण्यात आला तो न सांगता येनारां होता. बिरसा मुंडा यांचा मृत्यू ९ जून १९०० रोजी रांची येथे डीस्टीलरी पुला जवळ दफन करण्यात आले. परंतु काही लेखक आणि काही जाणकार यांच आस म्हणन आहे की, त्यांचा मृत्यू नेसर्गिक नाही झाला तर काही म्हणतात त्यांना इथे पुरल गेलच नाही. काहींच म्हणन आहे की, बिरसा मुंडा यांचे मरण हे गुपीत ठेवण्यात अल.

१८९५ मध्ये बिरसा आंदोलन सुरु झाले होते. याची कल्पना तेथील जमीनदार, सावकार, तसेच इंग्रज यांना झाली होती. झारखंड म्हणजे संस्कृती, धर्म आणि राजकारण यांचा मेल घातलेला भूभाग होता. आणि या मुले आज जे सामुहिक प्रशासन किंवा 5 व 6 अनुसूची किंवा पेसा कायदा याबद्दल जे बोलाल जात ते इथे आधीपासूनच होत. इथेच नाही पूर्ण आदिवासी भागांमध्ये या गोष्टी आधीपासूनच विकसित पथावर होत्या. या सर्व गोष्टीना डावलून आन त्याला कुठल्या हि प्रकारे धक्का न देता, इंग्रजांना आपल साम्राज्य स्थापन करन अशक्य होत, त्यामुळे त्यांनी स्थानिक जमीनदार आणि वतनदार, सावकार यांना ह्ताशी धरल. परंतु यांच्या विरोधात बिरसा आंदोलन हे पूर्ण राजनीतिक स्वशासन घेऊन उभ ठाकल. इंग्रज शासन बिरसा उलगुलानला आपला अंत या देखाव्यात पहात होती. बिरसा मुंडाच्या नेतृत्वात हे आंदोलन आदिवासी सांस्कृतिक अस्मिता जपणार आणि आदिवासी अस्तित्वाची रक्षा करणार एक स्वयंपूर्ण अस राजकारणाची जोड भेटलेल स्वात्यंत्र आंदोलन झाल होत. त्यांनी भारतातील पाहिलं असहकार आणि अहिंसा चळवळ घडवून आंदोलन केल, पण आमच्या इतिहासाचा दिखावा झाला खोट तितक मोठ अश्या पद्धतीने या असहकार चळवळीचे जनक दुसर्यांच्या नवान खपवल गेल. इंग्रजांविरुद्ध लढा देताना पहिला निर्णय झाला तो म्हणजे लगान न भरण. समाजिक विषमता, आर्थिक शोषण, सावकारशाही, जमीनदार, प्रस्थापित व्यवस्था यांच्या विरोधात त्यांनी खूप असा मोठा लढा निर्माण केला. ज्यात संपूर्ण झारखंड ने असा सहभाग दर्शविला की, जस काही समुद्रात अचानक उसळलेली लाट. आदिवासी समाजाचा आदर्श समाज या कल्पने वर आधारित होता त्यामुळे ते सर्व जन एकमेकांसाठी काहीही करण्यास तयार होते शेवटी समाज हि संकल्पना खूप मोठी असते. त्यांचे एकमेकांचे प्रेम पाहून सर्व सावकार, जमीनदार, ब्रिटीश सरकार यांना आधी चिंता वाटायला लागली आन नंतर त्यांचा थरकाप उडाला, आज देखील आपल्याला सर्वांना हीच गरज आहे.  २४ ओगस्ट १८९५ मध्ये बिरसाना अचानक अटक करण्यात आली त्यांच्यावर केस दाखल होऊन, जेल झाली. कालांतराने महाराणी विक्टोरिया च्या जंयती निमित्त त्यांना सोडण्यात आले. जसे ते बाहेर आले त्यांनी हे आंदोलन खूप तीव्र केले, असहकार चळवळ काय असते ते इथे इंग्रज सरकारला खरे समजले. असहकार म्हणजे सरकारला काही मदत करायची नाही. त्यांनी ठरवले कि शेतीच करायची नाही, जर शेतीच केली नाही तर त्यात पिकनार काय? आन पिकलेच नाही तर शेतसारा भरण्याचा संबंध च येत नाही. असे सलग ३ 4 वर्षीपर्यंत केले, त्यामुळे इंग्रज सरकार पूर्ण हादरून गेले होते. आदिवासींनी जंगलात येईल ते खाले पण जमीन कसली नाही. अश्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वात हजारो क्रांतीकारक डोंबारी पहाडावर ८ जानेवारी १९०० ला इंग्रज सरकारच्या गोळीबाराचे धनी झाले. याच प्रकारे वरील माहिती संक्षिप्त स्वरूपात झाली त्यांची थोडी खोलातील माहित पाहू.


मृत शरीर डीस्टीलरी पुलाजवळ (अंदाजे)
नगर निगम प्रभाग -7 खसरा क्रमांक 91 प्लॉट न.- नाही,
क्षेत्र 95 एकर

मृत्यू 25 वर्षे दरम्यान वय
आईचे नाव कारमी मुंडा
वडिलांचे नाव सगुणा मुंडा
बिरसा मुंडाचे प्राथमिक शिक्षण कुंती ब्लॉक च्या शालेत इयत्ता तिसरा उत्तीर्ण पर्यंत झाले. पुढील शिक्षण पाचवी पर्यंत त्यांनी बुरुजू येथे केले. त्यापुढील शिक्षणासाठी त्यांनी छीबासा येथे लुचेर्ण मिशनरी शाळा आहे तिथे घेतले. इथे शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी खिर्च्न धर्म स्विकारला. त्यांचे ख्रिस्ती नाव डेव्हिड ठेवण्यात आले.
बिरसा मुन्डांचे जन्म्ठीकान आणि जन्मतारीख यात आज देखील एकमत नाहीये. न सरकारकडे योग्य पुरावे आहेत, न इतिहासाकडे. त्यांचा जन्म नोव्हेंबर १८७५ उलीहातु यथे आणि मृत्यू ९ जून १९०० रोजी रांची येथे केंद्रीय तुरुंगात झाला. ते तिघे भावू होते पासना, बिरसा आणि भानू.

त्यांचा थोडक्यात क्रम

1887 घरी मध्यमवर्गीय शिक्षण नंतर परतले
1888 ख्रिस्ती धर्म समजल्यावर पुन्हा आपल्या मूळ सरना पंथात म्हणजे आदिवासी अस्तित्वात परत.
1889 आदिवासी चळवळीला सुरु
1890 आदिवासी विचार प्रचार आणि राजकारणात आले
1895 दोन वर्षे जेल
1897 सुटका
1897 पूर्ण मुंडा बंड (उलगुलान)







थोडी मोठी माहिती

झारखंड राज्य, त्याच्या मर्यादा आणि नियम पाहता त्याकाळात या राज्याला त्याच्या जन्माआधीच स्वप्न पडलेलं असावं कि हे बिरसा एक उलगुलान असलेल बंड आपल्या अस्तित्वाला सोन्याचा झळ देऊन जाईल. ब्रिटीश सरकार आणि त्यांना मदत करणारा सावकारी वर्ग तसेच जमीनदार वर्ग यांचा मुख्य उद्देश होता की, चोरी आणि नफा. ब्रिटिशांकरवी आदिवासींच्या जल, जमीन, जंगल यांचा नाश करून त्यांचे अस्तिव संपविणे हा आताचा लढा नाहीये हा खूप पूर्वीपासून सुरु असलेला लढा आहे. त्यांही शेवटचे झाड सुधा सोडायचे नाही असे ठरवले होते. ब्रिटिश सरकारने छोटा नागपूर पठार प्रदेशात संथाळ किल्ला गाठला,जो आज देखील जसाच तसा आहे. त्याकाळी हिंदू लोक(जमीनदार, सावकार,  तसेच जिल्हाबाहेरील, आणि ख्रिचन मिशनर्या यांचा असलेला ब्रिटीश कर महसूल, म्हणजे दिकू कर प्रणाली हो सर्वांच्या डोई जड झाली होती.संथाल वासी या गोष्टीने आश्चर्यचकित झाले होते कि, स्वात्यंत्र, शांतता- प्रेमळ लाजराबुजरा असणारा आदिवासी समाज त्याला देखील हा नियम लागू का? इंग्रजांनी सावकार आणि जमीनदार यांच्या मदतीने तिथे व्यापार सुरु केला. यावेळी आदिवासी आणि ब्रिटीश यांच्यात वाद देखील झाले. दरम्यान प्रदेश हा व्यापारी कृषी तत्वावर तयार करण्या आला. कलकत्यातील व्यापाऱ्यांनी भागीरथी च्या बाजूने कंपनी सुरु केली. ब्रिटीश अधिकारी कित्येकदा कमी किमतीमध्ये फक्त मीठ, तंबाखू आणि कपडे असे विकत नेत. यावर त्यांनी भरपूर कमविले, हळूहळू संथाल साध्या अवस्थेतून कर्ज बाजाराकडे जाऊ लागला. शेवटाला उरले सुरले देखील व्यापारी वर्गाने आणि जमीनदारांनी लुटून नेले. इग्रजांची व्यापारी वर्गसोबत जवळीक असल्या कारणाने सर्व स्न्त्हाल हा तोट्यात गेला.

बिरसा मुंडा (१८७५- १९००) हे त्यांच्या सथीदारानमध्ये बिरसा भगवान म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांचे नेतृत्व हे एक क्रांती आणणारे उलगुलान घडविणारे धोरणात्मक असे होते. त्यांच्या साथीदारांनी इंग्रजांविरुद्ध फक्त धनुष्य बाण, आन भाले यांनी लढा दिला. त्यांचे वाढते प्रभाव आणि होणारे प्रखर नेतृत्व हि सरकार साठी एक दुख: ची बाब होती. शेवटी यांना देखील त्यांच्यातीलच कोणी तरी फसवून तुरुंगात धाडले. मृत्यू हा कॉलरा ने झाला असे सरकारी अहवाल सांगतो परंतु बाकी अभ्यासक हे खोट आहे अस मानतात. वयाच्या २५व्य वर्षी त्यांनी त्यांच्या सहकार्यांसाठी एक आदर्श असे जीवन निर्माण करून दिले होते जगण्यासाठी. बिरसा मुंडा यांनी उठावासाठी त्यांच्या समाजाची ताकत, नियम हे एकवटून दाखवले आणि त्याचा प्रभाव आपल्या समोर ठेवला. त्यांच्यासर्व हालचाली या धर्मासारख्या गोष्टींच्या देखील विरोधात होत्या. जेव्हा डेव्हिड म्हणून खीरच शाळेतून पुन्हा बिरसा मुंडा म्हणून ते आदिवासींमध्ये आले तेव्हा त्यांना समजले की, हे सर्व लोक आदिवासी संस्कृतीचा विध्वंस करत आहेत. बिरसा मुंडा हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे म्हणून त्यांना नेमण्यात आले होते ख्रिचन धर्माच्या प्रसारासाठी. आजही आदिवासींमध्ये याच गोष्टी होत आहेत, त्यांच्या स्वत च्या अस्त्तीवापासून त्यांना दूर करण्यासाठी आदिवासींमध्ये बाबा सोडले जातात हरीनाम कीर्तनाच्या नावाखाली आदिवासींची संस्कृती धोक्यात आणली आहे. सत्संगाच्या नावाख्ली आदिवासींनी आपली परंपरा चुलीत घातली आहे. बिरसा मुंडा यांनी ख्रिचन धर्मासोबत बंड केल. देवाला आणि मिशनरीच्या कार्यक्रमाला ते मानत नव्हते. मिशनरीचे काम करण्याचे स्वरूप असे होते कि समाजातील तळागाळात पोहोचलेला माणूस सापडणे आणि त्याला देवाचा माणूस म्हणून घोषित करणे. जसे कि आजचे आदिवासी भागात फिरणारे महाराज मंडळी.
ब्रिटीशांच्या डोक्यात त्यावेळी अजून एक बाब पक्की होती कि भारत हा पूर्ण ख्रिस्त मी करायचा.
पूर्ण रांची मध्ये आजही संथाल जागा तितकीच सुरक्षित आहे जितकी बिरसा होते तेव्हा होती. आज हि आदिवासी क्षेत्र असणारे हे झारखंड खूप श्रीमंत आहे इथे खूप अशी खनिज संपत्ती आहे. आजही इथे भरपूर लोकांचा डोळा आहे. आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांना संपवून या जागा आपल्या घशात घालणे हे सर्रास पणे सुरु आहे. आधुनिक संस्कृती जे देईल ते सर्व त्यांना नवीन आणि परक आहे. आदिवासींची जंगल, जमिनी, खनिजे यावर सीमाशुल्क त्यांच्याकडून च घेण हि थट्टा केली तर कोणी का नाही रागवणार, आपल्याच घरात रहायला आपण भाडे भरायचे. आदिवासी समाज हा एकीकडे आहे आहे आणि संपूर्ण आधुनिक भारत देश एकीकडे आहे. अश्या प्रकारे ठाम विधाने आजही आहेत जे जाणीव करून देतात कि, बिरसा मुंडा अजून हि जिवंत आहेत.
एकेकाळी परत बिहार च्या छोटा नाग्पूर प्रदेशात मुंडा जमाती चा रांची येथे जवळपास ५५० चौ. भूभाग हा लढाई मय झाला होता. उलगुलान, चळवळ, सावकार, जमीनदार, डाकू, कंत्राटदार, मिशनरी आणि ब्रिटीश साम्राज्यवादी यांच्या अंत करणासाठी सैन्य निर्माण केले. “काहीही करू पण आधी हे” अश्या पद्द्ध्तीने आदिवासिना स्वतचा मान सन्मान मिळवून देण्यासाठी निर्भयपणे लढण्यासाठी त्यांना शिक्षण देन आणि त्यांचं जीवनाला एक नवा अर्थ देणे हे गरजेचे झाले. झारखंड मधील आदिवासींच्या चळवळी मध्ये जर कोणी प्रेरणास्थानी झाले असतील तर ते बिरसा मुंडा होते.  इतर अनेक आदिवासी तरूण जसे, ख्रिश्चन झाले. पण, आपण स्वाभिमान प्राप्त करण्यासाठी ते लवकरच पुन्हा आदिवासी झाले. ब्रिटिश भारतात येण्याआधी, जंगले हि आदिवासीची आई होती. ब्रिटिशांनी त्यांच्या वन, जमीन यांवर तसेच त्याचे इतर कायदे आनले आणि त्यांच्या नैसर्गिक अधिकारावर बंदी घातली. त्यांनी तो प्रदेश, आदिवासी स्थलांतर ज्याद्वारे मध्ये, सावकार, जमीनदार, व्यापारी, महाजन ओळखळे जात त्यांच्या नवे करू लागले. ते आदिवासींच्या जमिनी हिसकावून त्यांच्याशी एक गुलाम-सारखे अस्तित्व त्यांना देवू लागले. या दडपशाही विरोधात मुंडा वंशाने सातत्याने तीन दशके लढाई केली. आणि या संघर्षाचा प्रेरणा स्थान हे बिरसा होते. 1894 मध्ये असे म्हणतात कि बिरसा यांच्या अंगावर विज कोसळली आजूबाजूचे सर्व जाळून खाक झाले पपरंतु, बिरसा यांना साठी दुखापत हि नाही झाली तेव्हा पासून बिरसाचे सर्व साथीदार त्यांना भगवान म्हणू लागले इतकेच नाही तर इंग्रज अधिकारी देखील त्यांना भगवान माणू लागले होते. त्यांनी जनतेला जागृत आणि एकत्र करून जमीनदार-ब्रिटिश विरुद्ध जागे करायला सुरुवात केली. धर्म आणि राजकारण यात गावातील लोकांना प्रवचन देणे, आणि आदिवासी म्हणजे काय हे समजावून सांगणे आणि एक लष्करी संघटन उभे केले. त्या दिवशी इंग्रज सरकारचे नियम हे शेवटचे होते. तेव्हा पासून त्यांनी सर्व कर, येणे, रसद थांबवून मिशनरीचे सर्व नियम, अटी तोडल्या, आणि बंडकरी झाले. या वेळी ब्रिटीशांनी विरोध केला आणि बिरसाना २ वर्षे कारावास झाला.
नोव्हेंबर १८९७ मध्ये तुरुंगात काही सजा बाकी असतानाच, ते पुन्हा एकदा आदिवासी चळवळीचे आयोजन करण्यास तयारीला लागले. त्यांनी जमीनदार आणि ब्रिटीश यांच्या विरोधात बंडा चे बियाणे पेरले जे आदिवासींच्या जमिनीवर जोर धरून वाढू लागले. कोण आहे हा इतका आत्मविश्वास जागविणारा म्हणून भीती इंग्रज लष्करा मध्ये होऊ लागली. त्यांनी स्वतची अश्यां दोन बाटालीयनची स्थापना केली. डिसेंबर २४, १८९९ ला सशस्र संघर्ष म्हणून हा दिवस ठरविला गेला. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला हल्ले करायला सुरवात केली. पहिल्या टप्प्यात जवळील पोलीस चौक्या यांवर हल्ला करण्यात आला त्यावेळी 32 जन पळून गेले. आठ पोलिसांची हत्या करण्यात आली. जमीनदारांची जवळपास 89 घरे जाळून खाक केली; संथाल मधील चर्च आणि ब्रिटिश मालमत्ता राखरांगोळी झाले. 550 चौरस मीटर पर्यंत ज्वाला पसरल्या होत्या. छोटा नागपूर प्रदेशात स्वत रांची उपायुक्त लष्कराला आदेश देतात यावरून ठरविले जाईल कि संघर्ष सुरवातीलाच किती प्रखर होता. पहिला संघर्ष टप्पा हा ५ जानेवारी १९९० रोजी झाला.
दुसर्या दिवशी उलगुलान चळवळ दुसरा टप्पा सुरू झाला. हे हल्ले फक्त ब्रीटीशांविरुध नव्हते तर एकत्रीत पणे हे सावकार, जमीनदार, ठेकेदार, यांचे विरुद्ध देखील होते. युद्ध करण्यासाठी बंदुकीची गोळी विरुद्ध धनुष्य बाण हा अनोखा संघर्ष पाहायला मिळत होता. आपल्या विषारी बाणाने त्यांनी अनेक इंग्रज सैनिक आणि पोलीसे यांना जमिनोदोस्त केल. अनेक व्यापाऱ्यांची घरे जाळून खाक केली. या संघर्षाच्या ठिणग्या इतक्या झाल होत्या कि त्या मध्ये अनेक सावकारांची, व्यापाऱ्यांची घरे जाळून खाक झाली. या सशस्त्र संघर्ष ज्वाला  इतक्या प्रखर आणि तेज होत्या कि त्या सर्वदूर पसरत गेल्या. पण असे एकले जाते कि ब्रिटीश सैन्यात कोणीतरी अमानुष आदिवासी होता ज्यान गद्दारी चा हात धरून आपल्याच साथीदारांविरुद्ध त्यांची मदत केली. त्यांच्या बंदुकीला तो वाकला, धनुष्य व बाण यांची शक्ती त्याच्या समोर कमी पडू लागली. संपूर्ण रांची गाव सैन्याला ताब्यात देण्यात आले. शेवटी, 3 फेब्रुवारी रोजी, 1900 बिरसा यांना नेण्यात आले. त्यांच्यावर 482 इतर गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी ठरविण्यात आले होते. प्रकरणांमध्ये सजा सुरु असताना, त्यांना तुरुंगात रक्ताच्या उलट्या झाल्या, 9 जून 1900 या दिवशी भगवान स्वरूप बिरसा मुंडा निसर्गात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूचे लक्षण हि कॉलरा चा नसताना देखील इंग्रज सरकारने कॉलरा झाला आन त्यान मृत्यू झाला अस घोषित केल. भ्याड पणाचा कळस म्हणावा त्याप्रमाणे वागणूक हि दिसते. इंग्रज सरकारने त्यांची जेल मध्ये हत्या करून तिला कॉलरा मृत्यूच स्वरूप दिल. आजही बिरसा मुंडा हे सरंजामशाहीचा मोठा विरोध आणि त्या वेळी संघर्षाचे प्रतिक म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात.

आज आदिवासींमध्ये सगळीकडेच या बाबी पहावयास मिळत आहेत, कि ते धर्मांतरित होत आहेत. त्यांनी हिंदू धर्माच्या परंपरा आपल्या मध्ये इतक्या रुजवल्या आहेत कि त्यांना त्याचं स्वत च अस्तिव समजत नाहीये. बिरसा यांनी जेव्हा ख्रिचन धर्म स्वीकारला होता तेव्हा बरेच से त्यांचे सोबत असणारे त्यांनी देखील तो धर्म स्विकारला होता. परंतु बिरसा यांनी तो सोडून परत आपल्या आदिवासी संस्कृतीला स्वीकारलं होत. परंतु त्यांच्या सोबत गेलेले काही परत नाही आले, त्यात काहीपरत हि आले, त्यांच्या मृत्यू नंतर इकडे तोपर्यंत जे होते त्यांनी ख्रिस्ती अनुयायी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊ लागले. नंतर ते वैष्णव मध्ये सुरु झाले. काहींनी आदिवासी जीवन परत अंगीकारल तुळसीच्या वनस्पतीची उपासना करून पवित्र धागा आणि ठराविक हिंदू धर्मासारखे दिसणारे हळद मध्ये रंगविलेली मेंढ्याची कातडी परिधान करून पुन्हा आदिवासींच्या जीवनात दाखल झाले. त्यांनी बिरसा मुंडा यांना देवाचा आदेश म्हणून माणू लागले. त्यांनी सर्व हिंदू धर्माच्या परंपरा ठोकरल्या आणि आपल्या येथील परंपरा बंद केल्या यज्ञ, धार्मिक निष्ठा, धर्माचे पालन या सर्वांना वेशीवर टंगल. आपल्या बिरसाचा आदेश म्हणून त्यांच्या अनुयायांनी तिथे प्राथमिक शिक्षणाची सोय के. आणि ते आपल्या आदिवासी बांधवाला सुधारविण्याचा प्रयत्न करू लागले.
बिरसा मुंडा यांणी सरदार चळवळीचा टप्पा एका प्राथमिक शिक्षणाला लागणाऱ्या कालावधी पेक्षा लवकर पूर्ण केला होता.

1895 पर्यंत बिरसा मुंडा हे धार्मिक शुधार्क आणि वन अधिकारांच्या चळवळीचे प्रणेते होते धार्मिक सुधारक आणि raiyats 'वन आणि इतर अधिकार आंदोलकाची होते, परंतु ती लवकरच राजकीय देखील स्वरूप घेऊ लागली होती. आन त्यांमुळे ब्रिटीश सरकारच्या मुसक्या आवळल्या जाऊ लागल्या. आजून तर पूर्ण भारतभर लेन पसरल देखील नव्हत तरी देखील इंग्रज सरकारने, ब्रिटीश विरोधी मार्ग अवलंबला म्हणून कठोर कारवाई करत दोन वर्षे सश्रम कारावास दिला होता.

त्यांचा मृत्यू आजही कोणी आदिवासी मान्य करत नाही. मुळात त्यांच्या बाबतीत घडलेला तो काल कोणताही मध्यमवर्गीय शन करत नाही आदिवासी सोडून सुद्धा, आदिवासी तर आहेतच पनं बाकी समाज देखील होता. त्यांनी आपल्या अनुयायावर इतके प्रभावी मत बिंबवले होते कि त्यांना ते भगवान मानत असत. ते त्यांना सूर्य देवाचा पुत्र, कोणी रोग बरा करणारा, अश्या बऱ्याच चमत्कारिक नावाने ओळखले जात. त्यांनी त्यांच्या हयातीत आदिवासी असून देखील इतर धर्मांच्या पालन करणार्यांवर देखील हल्ला चढवला जो कि वैचारिक होता. त्यांनी त्यांच्या हयातीत पुन्हा एकदा आदिवासी संस्कृतीला सुगीचे दिवस दिले होते. आज ते दिवस कुठे गेले आहेत?
जय आदिवासी।   जय बिरसा    जय एकलव्य

Sunday 12 November 2017

बालदिन

 

जन्म : १४ नोवेंबर १८८९ (अलाहाबाद)

मूत्यू  : २७ मे १९६४

नाव   : पंडित जवाहरलाल नेहरू



महात्मा गांधीच्या विचारधारेशी सावली प्रमाणे उभे राहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देश्याच्या स्वातंत्र्याच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी त्यांनी सायमन कमिशनला विरोध करण्याच्या कार्यक्रमात लखनौला लाठीमार सहन केला. ते त्यांच्या निर्णयाला शेवट पर्यंत चिकटून राहिले. निस्सीम देशभक्तिमुले ते १९२९ च्या कॉंग्रेस चे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ ला भारताला स्वतंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान झाले. १७ वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले. भारताच्या आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले.

भवितव्यासाठी त्यांनी स्वताला या कार्यात झोकून दिले. 

           देशाप्रमाणे जगाला शांततेचा संदेश देऊन, ” पंचशील” हि लाख मोलाची देणगी जगाला दिली. “शांतीदूत” हि पदवी बहाल करून त्यांना सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलांवर जीवापाड प्रेम करीत असत. लहान मुले त्यांना खूप आवडत असत. मुले देशाचे भावी आधारस्तंभ आहेत हि जाणीव त्यांच्या ठायी होती. २७ मे १९६४ रोजी या थोर नेत्याने या जगाचा निरोप घेतला व आकाशातील ताऱ्यामधून एक तेजस्वी तारा निखळला. 
 
    हिंदी माहिती 
भारत के प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू इंग्लैण्ड गए वहा उनकी मुलाकात ब्रिटेन के पूर्व प्रधानमंत्री चर्चिल से हुई.पिछली बातो को याद कर चर्चिल ने पूछा-आपने अंग्रेजो के शासन में कितने वर्ष जेल में बिताये थे? तब नेहरू जी ने कहा-लगभग 10 वर्ष.तब अपने साथ किये गए व्यवहार के लिए आपको हमसे घृणा करनी चाहिए-चर्चिल ने सवालियां अंदाज में पूछा. नेहरू जी ने उत्तर दिया-बात ऐसी नहीं है.

हमने ऐसे नेता के साथ काम किया है जिसने हमें दो बातें सिखायी है- एक तो यह की किसी से डरो मत और दूसरी,किसी से घृणा मत करो. हम उस समय आपसे डरते नहीं थे, इसलिए अब घृणा भी नहीं करते.

पंडित जवाहरलाल नेहरू एक कुशल राजनीतिज्ञ के साथ-साथ उच्च कोटि के विचारक भी थे. उनकी राजनीति स्वच्छ और सोहार्दपूर्ण थी. स्वतंत्रता संग्राम के समय उन्होंने जेल में रहकर अनेक पुस्तको की रचनाये की. ‘मेरी कहानी,विश्व इतिहास की झलक,भारत की खोज’ उनकी प्रसिद्ध रचनाएँ थी.राजनीति और प्रशासन की समस्याओ से घिरे रहने के बावजूद वे खेल,संगीत,कला आदि के लिए समय निकल लेते थे.बच्चो के तो वे अति प्रिय थे.आज भी वे बच्चो के बीच ‘चाचा नेहरू’ के नाम से लोकप्रिय है.उनके जन्मदिन 14 नवम्बर को हमारा देश ‘बाल दिवस’ के रूप में मनाता है.
पंडित जवाहरलाल नेहरू का जन्म इलाहाबाद में 14 नवम्बर सन 1889 को हुआ.इनके पिता मोतीलाल नेहरू प्रसिद्ध वकील थे.माता स्वरूपरानी उदार विचारो वाली महिला थी.नेहरू जी की आरम्भिक शिक्षा घर पर ही हुई.अपने शिक्षको में एक एफ.टी.ब्रुम्स के सानिध्य में रहकर जहाँ इन्होने अंग्रेजी साहित्य और विज्ञान का ज्ञान प्राप्त किया वही मुंशी मुबारक अली ने इनके मन में इतिहास और स्वतंत्रता संग्राम के प्रति जिज्ञासा पैदा कर दी.यही कारण है की उनके मन में बचपन से ही दासता के प्रति विद्रोह की भावना भर उठी.

उच्च शिक्षा के लिए नेहरू जी को विलायत (इंग्लैंड) भेजा गया.वहां रहकर उन्होंने अनेक पुस्तकों का गहन अध्ययन किया.वकालत की शिक्षा पूरी करने के बाद वे भारत लौट आये और इलाहबाद हाईकोर्ट में वकालत करने लगे पर वकालत में उनका मन नहीं लगा.उनके मन में तो देश को स्वतंत्र कराने की इच्छा बलवती हो रही थी.इसी समय उनकी भेंट महात्मा गाँधी से हुई.इस मुलाकात से उनकी जीवन-धारा ही बदल गयी.

उस समय देश में जगह-जगह अंग्रेजो का विरोध लोग अपने-अपने तरीको से कर रहे थे.1919 में जलियांवाला बाग में अंग्रेज अफसर जनरल डायर द्वारा स्वतंत्रता सेनानियों की नृशंस हत्या की गयी.इससे पूरे देश में क्रोध की ज्वाला धधक उठी.1920 में गांधीजी द्वारा असहयोग आन्दोलन चलाया गया.पंडित जवाहरलाल नेहरू भी पूर्ण मनोयोग से स्वंतन्त्रता संग्राम में कूद पड़े.
सन 1921 में इंग्लैण्ड के राजकुमार ‘प्रिन्स ऑफ़ वेल्स’ के भारत आने पर अंग्रेज शासको द्वारा राजकुमार के स्वागत का व्यापक स्तर पर विरोध किया गया.इलाहाबाद में विरोध का नेतृत्व पंडित नेहरू को सौपा गया.इनके साथ पिता मोतीलाल नेहरू भी थे.दोनों को गिरफ्तार कर लिया गया.यह जवाहर की प्रथम जेल यात्रा थी.इसके बाद उन्हें नौ बार जेल यात्रा करनी पड़ी,किन्तु वे विचलित नहीं हुए.
लम्बे संघर्ष के बाद अंततः 15 अगस्त 1947 को देश आजाद हुआ.पंडित जवाहरलाल नेहरू स्वतन्त्र भारत के प्रथम प्रधानमंत्री बने.लम्बी अवधि की परतन्त्रता के बाद देश के आर्थिक हालत अत्यंत जर्जर हो चुकी थी.अपनी दूरदर्शिता और कर्मठता से नेहरू ने कृषि और उद्योगों के विकास हेतू पंचवर्षीय योजनाओ की आधारशिला रखी.
आज देश में जो बड़े-बड़े कारखाने,वैज्ञानिक प्रयोगशालाएं और विशाल बांध आदि दिखाई पड़ते है,इन्ही पंचवर्षीय योजनाओ की देन है.भाखड़ा नांगल बांध को देखकर नेहरू जी ने कहा था-

मनुष्य का सबसे बड़ा तीर्थ,मंदिर,मस्जिद और गुरुद्वारा वही है,जहाँ इन्सान की भलाई के लिए काम होता है.

नेहरू जी ने देश के चहुंमुखी विकास हेतू अनेक कार्य किये वे जानते थे की बिना अणुशक्ति के देश शक्ति संपन्न नहीं हो सकता.अतः उन्होंने परमाणु आयोग की स्थापना की.वे परमाणु ऊर्जा को सदैव विकास के कार्यो में लगाने के पक्षधर थे.ट्राम्बे के परमाणु संस्थान में उन्होंने एक बार कहा था-
चाहे जो भी हो,हम किसी भी हालत में अणुशक्ति का प्रयोग विनाशकारी कार्यो के लिए नहीं करेंगे.

पंडित जवाहरलाल नेहरू बिना थके प्रतिदिन 18 से 20 घंटे कार्य करते थे.महान कवि राबर्ट फ्रॉस्ट की निम्नलिखित पंक्तियाँ उनका आदर्श थी-
वन है सुन्दर और सघन पर मुझको वचन निभाना है 
                                             नींद सताए इसके पहले कोसों जाना है,
                                                  मुझको कोसों जाना है.

नेहरू जी ने अपने जीवन का प्रत्येक क्षण देश सेवा में लगाया.वे स्वतन्त्रता संग्राम में देश के लिए लड़े 





 पंडित जवाहरलाल नेहरू❒*  

    
         भारताचे १ ले पंतप्रधान
               ◆ कार्यकाळ ◆
(१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)

🔹जन्म  :~ १४ नोव्हेंबर १८८९
     अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत
🔸मृत्यू  :~ २७ मे १९६४
           नवी दिल्ली, भारत
🔹पत्नी  :~ कमला नेहरू
🔸अपत्ये  :~ इंदिरा गांधी
🔹व्यवसाय :~  बॅरिस्टर

                     ♦ जवाहरलाल नेहरू
      हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

                  ● राजकीय आयुष्य ●
   🔷जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    🔶१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.

   🔷 सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

  🔶१९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

बाल दिवस १४ नोव्हेंबर - संपूर्ण माहिती

बाल दिवस 14 नोव्हेंबर 2017

मुलांचे हक्क, काळजी आणि शिक्षण याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन दरवर्षी साजरा केला जातो.मुले देशाच्या यश आणि विकासाची गुरुकिल्ली आहे कारण ते आपल्या देशाला नवीन आणि तांत्रिकदृष्ट्या नेतृत्व करतील. ते मौल्यवान मोत्यांप्रमाणे चमकदार आणि आकर्षक आहेत.पालकांना इशावाराद्वारे दिलेली भेटवस्तू आहेत . मुले ही निर्दोष, प्रशंसनीय, शुद्ध आणि प्रेमळ असतात.14 नोव्हेंबर (पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वाढदिवस) संपूर्ण भारताला बालदिन म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्म 14 नोव्हेंबर रोजी झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच ते पंतप्रधान बनले. दर वर्षी बालदिन साजरा केला जातो, कारण पालकामध्ये या दिवसाची जाणीव राहावी.



➤ बालक  दिवस का साजरा केला जातो ?

बाल दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू या महान व्यक्तीच्या जन्म दिवसाच्या रुपात साजरा केला जातो.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी तरुणांच्या कल्याणाकरिता अतिशय उत्तम काम केले.त्यांनी भारतातील मुलांचे शिक्षण, प्रगती आणि कल्याणासाठी भरपूर काम केले.ते मुलांबद्दल खूप प्रेमळ होते आणि त्यांच्यातच चाचा नेहरू म्हणून प्रसिद्ध झाले.भारतातील तरुणांच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी त्यांनी भारतीय शैक्षणिक संस्था इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली होती.त्यांनी पंच व वार्षिक योजना तयार केली ज्यात भारतात कुपोषणापासून संरक्षण करण्यासाठी मोफत प्राथमिक शिक्षण, शाळेत मुलांसाठी दूध, मोफत अन्न यांचा समावेश होता. बालकाचा चाचा नेहरूंसाठी प्रेम आणि आवड बघता त्यांचा जन्मदिन म्हणून बालक दिन म्हणून साजरा केला जातो.भविष्यकाळात राष्ट्राची संपत्ती म्हणून यशस्वी होण्यासाठी, प्रत्येकाच्या जीवनात बालपण हा एक महत्वाचा क्षण आहे, बालपण योग्य मार्गावर जाण्याची आवश्यकता असते. अयोग्य दिशेने चांगले आयुष्य गमावू शकतो. हे केवळ शिक्षण, काळजी आणि प्रगतीसाठी योग्य मार्ग देऊनच करता येते.

➤पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल थोडे

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे महान नेते होते आणि 1 9 47 मध्ये भारत स्वतंत्रतेनंतर तत्कालीन पंतप्रधान म्हणून भारताचे नेतृत्व करत होता. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 188 9 रोजी झाला, प्रसिद्ध वकील मोतीलाल नेहरू आणि अलाहाबादच्या रक्षा राणीचा जन्म झाला. अतिशय प्रतिभाशाली असल्याने, त्यांचे नाव जवाहरलाल ठेवण्यात आले होते.त्यांनी नंतरचे शिक्षण इंग्लंड येथून केले आणि भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतीयांना मदत करायला सुरुवात केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे पहिले पंतप्रधान झाले. ते एक महान कवी होते. त्यांच्या काही प्रसिद्ध लेखांमध्ये 'विश्व इतिहासची झलक', 'भारतीय शोध' इत्यादी आहेत.गुलाबांची फुले त्यांना मुलांप्रमाणे आवडते असे,ते म्हणतात की मुले उद्यानचे कोठार आहेत. ते असेही म्हणत असत की मुले भविष्यात विकसित होणाऱ्या समाजाची निर्मिती करतील कारण ती देशातील मूळ ताकद असतात. 
बाल दिवस कसा साजरा करावा -


  • मुलांना भेटी आणि चॉकोलेट वितरित करा
  • विविध स्पर्धा जसे की: फॅन्सी ड्रेस, वादविवाद, स्वातंत्र्यसैनिक, देश, कथा आणि प्रश्नोत्तर स्पर्धांसंबंधीचे भाषण.
  • मनोरंजन, गायन, नृत्य आणि इतर संगीत वादन यांसारख्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाद्वारे आयोजित केले जाते.
  • अनाथ मुलांना संगीत वाद्ययंत्र, स्टेशनरी, पुस्तके, कपडे आणि खेळणी वितरीत करून मनोरंजन करता येते.
  • स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित काही कार्यक्रमांचे आयोजन करू शकता.
  • कोडी, मिष्टान्न आणि चीनी खजिना शोधा शोध इत्यादि काही क्रिडा उपक्रमांचे आयोजन करू शकता.
  • प्रतिकूल परिस्थितीतील मुलांनासाठी सुप्रसिद्ध संगीतकार,आरोग्यविषयक कार्यक्रम आणि आरोग्य, संगोपन आणि मुलांच्या प्रगती  भाषण आयोजित केले जाऊ शकतात. 
  •     

    पंडीत जवाहरलाल नेहरू

    *🌸पंडीत जवाहरलाल नेहरू🌸*

     हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जात.

    *🌸वैयक्तिक आयुष्य🌸*

    श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी ही कन्या झाली. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्‍नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.

    *🌸राजकीय आयुष्य🌸*

    जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रुची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसूखच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.

    १९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरूल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरित झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
    सप्टेंबर १९२३ मध्ये पंडित नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठी हल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरू केली. १९२९ साली पंडित नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य हेच ध्येय निश्चित केले गेले.

    १९३० ते १९३५ दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि अशाच अन्य सत्याग्रहांमुळे नेहरूंना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोडा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

    *🔹नेहरूंनी लिहिलेली🔹*

    आत्मकथा (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद - ना.ग. गोरे)
    इंदिरेस पत्रे (मूळ इंग्रजी- Letters from a Father to His Daughter; मराठी अनुवाद - वि. ल. बोडस)

    भारताचा शोध (मूळ इंग्रजी -Discovery of India, मराठी अनुवाद - साने गुरुजी)

    *🔹नेहरूंवर लिहिली गेलेली पुस्तके🔹*

    अग्निदिव्य : कमला नेहरू (धनंजय राजे)

    आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. डी.डी. पाटील, प्रा. ए.आर. पाटील)

    आपले नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - साने गुरुजी)

    गोष्टीरूप जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - श्यामकांत कुलकर्णी)

    जवाहरलाल नेहरू (मूळ इंग्रजी लेखक - एस. गोपाल; मराठी अनुवाद - पुरुषोत्तम आत्माराम चित्रे)

    नवभारताचे शिल्पकार - पं. जवाहरलाल नेहरू (लेखक - सदानंद नाईक)

    नेहरू : नवभारताचे शिल्पकार (मूळ इंग्रजी लेखक - एम.जे. अकबर; मराठी अनुवाद - करुणा गोखले)
    नेहरूंची सावली (नेहरूंचे सुरक्षारक्षक के.एफ. रुस्तमजी यांच्या रोजनिशींतून पी.व्ही. राजगोपालन यांनी संपादित केलेल्या इंग्रजी पुस्तकाचा सविता दामले यांनी केलेला मराठी अनुवाद)

    पंडित जवाहरलाल नेहरू (लेखक - डॉ. नीला पांढरे)
    पंडित जवाहरलाल नेहरू (बालवाङ्‌मय, लेखक - राजा मंगळवेढेकर)

    पंडित जवाहरलाल नेहरू : व्यक्ती आणि कार्य (महाराष्ट्र सरकार)

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2017

*राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2017*

*सर्वप्रथम दिनांक 13 नोव्हेंबर 2011 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीकरिता आपल्याला शुभेच्छा*💐💐💐💐

*सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांना महत्वाची सूचना*


📌दिनांक 13 नोव्हेंबर 2017 रोजी होणाऱ्या चाचणीचे सीलबंद साहित्य सोमवारी सकाळी 9:00 वाजेपर्यंत (सकाळची शाळेला 7:30 )आपल्या शाळेवर खास दूतामार्फत येत असल्यामुळे मुख्याध्यापकांनी व संबंधित शिक्षकांनी साहित्य स्वीकारण्यासाठी  हजर रहावे.

📌चाचणीे साहित्य चाचणी पुस्तिका सीलबंद असल्याची खात्री करूनच स्वीकारावे. तसे हमीपत्र भरून द्यावे.

📌चाचणीचे आलेले साहित्य क्षेत्रीय अन्वेषकाने ( FI) मागणी करेपर्यंत कुलूपबंद ठेवावे.

📌क्षेत्रीय अन्वेषक शाळेवर दहा वाजेपर्यंत पोहोचले नाही तर तालुका समन्वयकांना लगेच फोन करून कळवावे.

📌चाचणी पूर्वीची माहिती भरतांना क्षेत्रीय अन्वेषकांना आवश्यक तेथे आवश्यक ती मदत करावी.

*पुढील माहिती पुरविणे आवश्यक आहे*

📝ज्या वर्गाची/तुकडीची चाचणीसाठी निवड झाली त्याची विद्यार्थी हजेरी

📝चाचणीसाठी निवडलेल्या सर्व
विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक

📝 विद्यार्थ्यांचे लिंग
1-मुलगा
2- मुलगी

📝विद्यार्थ्यांचा प्रवर्ग
1-अजा (SC)
2-अज (ST)
3-इमाव  (OBC, NT, VJA, SBC चा समावेश)
4-खुला/सर्वसाधारण।(Open/General)

📝विशेष गरजा असलेले विद्यार्थी (CWSN)
1 चलनवलन विषयक दिव्यांगत्व
2-अंध अधू दृष्टी
3- कर्णबधिर
4-मूकबधिर
5-गतिमंदत्व
6-इतर दिव्यांगत्व

📝चाचणीसाठी निवड झालेल्या वर्गाची/तुकडीची दिनांक 13/11/2017 ची हजेरी घेतल्यानंतर गैरहजर विद्यार्थ्यांची नावे

📝वर्गाच्या/तुकडीच्या हजेरीपुस्तकानुसार विद्यार्थ्यांचा रोल नंबर

📝चाचणी होत असलेल्या वर्ग/तुकडीला शिकविणाऱ्या शिक्षकाचे नाव

एका वर्गाला/ तुकडीला एकापेक्षा जास्त शिक्षक शिकवत असतील तर  (कंसात शिक्षक संकेतांक दिला आहे)
भाषा (01) शिक्षकांचे नाव
गणित (02) शिक्षकांचे नाव
प.अ./ विज्ञान (03) शिक्षकाचे नाव
सा. शास्त्र (04)  शिक्षकाचे नाव
एकच शिक्षक एका पेक्षा जास्त विषय शिकवत असेल तर (05)


📝याव्यतिरिक्त इतर आवश्यक माहिती पुरवून सहकार्य करावे.
****************
  NAS -नॅशनल अचिव्हमेंट सर्वेक्षण  
-----------------------------------------------
          थोडक्यात माहिती पाहू या 


प्रश्न:- N.A.S चाचणी/सर्वेक्षण किती तारखे ला होणार आहे ?
उत्तर:-  N.A.S चाचणी/सर्वेक्षण दि. 13 नोव्हेंबर 2017होणार आहे

प्रश्न:- N.A.S हया  चाचणी/सर्वेक्षण चे कार्यक्षेत्र किती व कोणते आहे ?
उत्तर:- N.A.S हि चाचणी/सर्वेक्षण देशभरातील  प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे

प्रश्न:- प्राथमिक शाळेतील कोणत्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्राथमिक शाळेतील इ. 3 री व 5 वी च्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे

प्रश्न:- उच्च प्राथमिक शाळेतील कोणत्या वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग 8 वी च्या  वर्गाची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे

प्रश्न:- प्रत्येक जिल्ह्यात वर्ग तिसरी व पाचवी च्या किती वर्गांची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येकी जिल्ह्यात  वर्ग तिसरी व पाचवी च्या प्रत्येकी  61 + 61 = 122 वर्गांवर  चाचणी/सर्वेक्षण होणार आहे   

प्रश्न:- प्रत्येकी जिल्ह्यात वर्ग आठवी च्या किती वर्गांची चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येकी जिल्ह्यात वर्ग आठवी च्या  51 वर्गांवर हे चाचणी/सर्वेक्षण होणार आहे.

प्रश्न:- प्रत्येकी जिल्यात  वर्ग तिसरी व पाचवी व आठवी  च च्या किती वर्गांची  चाचणी/सर्वेक्षण होणार आहे
उत्तर:- प्रत्येक जिल्ह्यातील एकूण 61+61+51= 173वर्गांवर हे चाचणी/सर्वेक्षण होणार आहे.

प्रश्न:- या  चाचणी/सर्वेक्षण दुसरे नाव काय आहे
उत्तर:- या चाचणी/सर्वेक्षणाला राष्ट्रीय संपादणूक चाचणी असेही म्हणले जाते.

प्रश्न:- ह्या चाचणी/सर्वेक्षण ला प्रत्येक जिल्ह्यातील शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी कसे निवडले आहेत
उत्तर:- ह्या चाचणी/सर्वेक्षण साठी शाळा आणि त्यातील वर्ग NCERT यांनी स्वतः Random पद्धतीने निवडलेले आहेत.

 -----------------------------------------------

📌 शाळा निवडताना NCERT कडून S,R1 आणि R2या प्रकारात शाळांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

📌 S (selected), R1 (reserve 1) आणि R2 (reserve 2) या प्राधान्यक्रमानुसार व अपेक्षित निकषानुसार शाळा फायनल केल्या जातील.

📌 या सर्वेक्षणाअंतर्गत निवडलेल्या शाळेतील निवडलेल्या वर्गामध्ये दि. 13 नोव्हेंबर 2017 रोजी चाचणी होणार आहे.

📌 चाचणीचे स्वरूप:- objective/MCQ (पर्यायी) प्रकारचे प्रश्न या चाचणी मध्ये असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असतील. त्यातील योग्य पर्यायाला विद्यार्थ्यांनी गोल (●) करणे अपेक्षित आहे.

📌 इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषागणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन विषयावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)

📌 इयत्ता 8 वी साठी भाषागणितपर्यावरण शास्त्र  (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार विषयावरआधारित एकूण60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120मिनीट)

📌 चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न  इयत्तानिहाय क्षमतावर आधारित असणारच आहेत

📌 या सर्वेक्षणासाठी जिल्हास्तरावर DMU (District Monitoring Unit) स्थापन केले आहे. यामध्येDIECPD प्राचार्यशिक्षणाधिकारीज्येष्ठ अधिव्याखाताअधिव्याखाताउपशिक्षणाधिकारी,गटशिक्षणाधिकारी यांचा समावेश आहे.

📌 चाचणीच्या दिवशी हे DMU भरारी पथक म्हणून जिल्हास्तरावर काम करेलजिल्ह्यातील कोणत्याही शाळेवर भेट देण्याचे त्यांचे नियोजन असणार आहे.

📌 चाचणी घेण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक शाळेमध्ये शासकीय स्तरावरून किमान एक पर्यवेक्षक (Field Investigator) उपलब्ध करून दिला जाणार आहे. यांच्या मार्फतच संबधित वर्गाची चाचणी शाळांनी घ्यावयाची आहे.

📌 आपल्या शाळांसाठी उपलब्ध करून दिलेले पर्यवेक्षक (F.I.) चाचणीच्या एक-दोन दिवस अगोदर आपल्या शाळेला भेट देतील व शालेय स्तरावर झालेल्या चाचणी संबधीच्या नियोजनाची पहाणी करतील.

📌 प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी चाचणी च्या एक दिवस अगोदर जिल्हा/तालुका स्तरावरून सीलबंद स्थितीमध्येच ताब्यात घ्यायच्या आहेत.

📌 आपल्याला मिळालेल्या सीलबंद लिफाफ्यातील प्रश्नपत्रिका या पर्यवेक्षकासमोरच बाहेर काढायच्या आहेत व त्यावर पर्यवेक्षकाची व दोन साक्षीदारांची स्वाक्षरी घ्यायची आहे.

📌 निवडलेल्या वर्गातील जास्तीत जास्त 30विद्यार्थ्यांसाठी चाचणी होणार आहे मात्र वर्गाची पटसंख्या 30 पेक्षा जास्त असतील तरीही चाचणीच्या दिवशी 100% (सर्व) विद्यार्थ्यांना हजर ठेवण्याची जबाबदारी सर्वस्वी शाळेची आहे.

📌 चाचणी सोडवणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे चाचणीच्या दिवशी निळा/काळा बोलपेन असावा असे नियोजन शाळेने करावयाचे आहे
.
📌 निवडलेल्या वर्गांतील सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्र. शाळेने आपल्या दप्तरी ठेवावे व चाचणी दिवशी आलेल्या पर्यवेक्षकाकडे द्यावेत

📌 चाचणी पूर्ण झाल्यावर पर्यवेक्षकाच्या मदतीने प्रश्नोत्तरपत्रिका व इतर साहित्याचे used व unusedप्रकारात वर्गीकरण करून ते दोन वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये सीलबंद करायचे आहेत.

📌 उत्तरपत्रिकांचे हे सीलबंद लिफाफे राज्यस्तरावर जाणार आहेत.

📌 या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी राज्यस्तरावरOMR पद्धतीने होणार असून प्रत्येक तालुकानिहाय निकाल वेबसाइटवर NAS च्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे.

📌 यातून प्रत्येक तालुक्याची तुलना करता येईल,राज्यातील/जिल्ह्यातील कुठला तालुका कुठल्या क्षमतेमध्ये मागे-पुढे आहे हे समजेल

📌 आलेल्या निकालावरून NCERT, SCERT आणिDIECPD यांचेकडून कृतीकार्यक्रम तयार केला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी संबधित तालुक्यांना करावयाची आहे.