पृष्ठे

या ब्लॉगचा उद्देश महाराष्ट्रातील शिक्षकांना इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरील शैक्षणिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी हा आहे याच प्रामाणिक उद्देशाने या ब्लॉगवर माहिती संकलित करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवरील माहिती सोबत ब्लॉगरसहमत असेल असे नाही आणि या ब्लॉग मध्ये जोडलेल्या लिंकमध्ये बदल अथवा हैक झाल्यास ब्लॉगर जबाबदार राहणार नाही

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

IF YOU WANT READ WEBSITE CONTENT IN ENGLISH ,MARATHI,OTHER LANGUAGE THEN USE GOOGLE TRANSLATE FOLDER WHICH ON LEFT SIDEBAR

सुस्वागतम ,सुरज मन्सुर तांबोळी

सुस्वागतम ,आपले ब्लॉग वर सहर्ष स्वागत आहे,सदर चे ब्लॉग संग्रहीत आहे,ब्लॉगर सदरच्या माहितीशी सहमत असेलच असे नाही

Wednesday 28 November 2018

*गोवर व रूबेला माहिती Student portal वर भरण्याबाबत.*

*गोवर व रूबेला माहिती Student portal वर भरण्याबाबत.*

*शाळेतील लसीकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी लसीकरणाचा अहवाल Student Portal वरील मुख्याध्यापक Login द्वारे नोंद करून लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यात आपले अमूल्य सहयोग द्या.*

*गोवर व रूबेला माहिती Student portal वर भरण्याबाबत.*

 *तालुकास्तरावरुन म्हणजे Beo   लॉगिनवरून  आपल्या शाळेचे लसीकरण कोणत्या तारखेला आहे याची नोंद BEO LOGIN  ने करायची आहे.*


*ती माहीती BEO LOGIN ने भरल्यावरच आपण शाळेच्या Student portal वरून माहिती भरू शकतो.*

*ही माहिती BEO LOGIN ने भरल्यावरच लसीकरण झालेल्या शाळेच्या HM ने STUDENT PORTAL  मध्ये HM लॉगिन ला MAINTENANCE टॅब मध्ये जाऊन भरायची आहे*

*For more info Plz visit*

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login

स्टुडंट पोर्टल लगीन करून मेन्टेनन्स मध्ये गोवर रूबेला टॅबवर क्लिक करावे त्यानंतर अॅक्च्युअल डेट मध्ये प्रत्यक्ष लस दिलेली तारीख भरावी त्यानंतर सेव करून स्टुडन्ट डिटेल्समध्ये जाऊन विद्यार्थी निहाय लस दिली होय /नाही ही माहिती भरावी लस दिली नसल्यास नसल्यास नाही म्हणून न देण्याचे कारण पुढे सिलेक्ट करा
    *गोवर-रुबेला लसीकरण सरल ऑनलाईन माहिती बाबत*

प्रति
मुख्याध्यापक सर्व शाळा ----------

==================
मा. शिक्षण संचालक (प्राथमिक व माध्यमिक) यांनी दि. २७.११.२०१८ रोजी vc मध्ये दिलेल्या, सूचनांनुसार लसीकरण झालेल्या बालकांची नोंद SARAL पोर्टल वर करणे आवश्यक आहे. त्याकरिता BEO लाॅग इन वरुन Student portal मध्ये आरोग्य विभागाच्या नियोजनानुसार सर्व शाळांची उदाहरणार्थ  Plan date 28/11/18 नमूद करण्यात आलेली आहे  त्याआधारे शाळांनी त्यांच्या लाॅग इन मधून *प्रत्यक्ष लसीकरण झालेल्या दिवशीच दिनांक नमूद करून* इयत्तानिहाय विद्यार्थ्यांच्या नावासमोर Y/N नमूद करावे. त्यामुळे लसीकरण झालेल्या बालकांची संख्या (Data) राज्यस्तरावर automatically सादर होईल. याबाबत सर्वांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी*.



Monday 19 November 2018

भाषासंगम उपक्रम

भाषासंगम उपक्रम


*विषय : “एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत - भाषा संगम” कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत .*
*1)* भारत सरकारने राष्ट्रीय
एकात्मता वाढीसाठी “एक भारत श्रेष्ठ भारत (EBSB)” हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने *दि.२० नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०१८* या कालावधीत *“भाषा संगम”* हा उपक्रम सर्व शाळांमधे सर्व भारतीय भाषांबद्दल अधिक प्रेम व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने घ्यावयाचा आहे.
        
*2)* देशातील २२ भाषांमधील सामान्यत: बोलली जाणारी पाच साधी वाक्ये परीपाठामधे विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावयाची आहेत. यासाठी आवश्यक असलेली माहितीपुस्तिका      https://goo.gl/PfNDUu   या लिंकवर उपलब्ध आहे.
*3)*“भाषा संगम” अंतर्गत घ्यावयाच्या उपक्रमाचे वेळापत्रक माहिती पुस्तिकेच्या (पान क्र II ) वर दिले असून पुढीलप्रमाणे कृतिकार्यक्रम घ्यावा.
   i) ज्या तारखेला  जी भाषा संवादासाठी सुचवली आहे, त्या भाषेची ५ वाक्ये परिपाठात वाचावीत. (उदा. दिवस पहिला - असामी, दिवस दुसरा - बंगाली) शिक्षक, पालक, शासकीय कर्मचारी किंवा ग्रामस्थ यांना अशी वाक्ये वाचण्यासाठी निमंत्रित करावे .
ii) काही विद्यार्थ्यांना या वाक्यांवर  आधारित भित्तीपत्रके (posters) तयार करण्यास सांगावीत व तयार केलेली भित्तीपत्रके शाळेमध्ये सर्वत्र लावावीत. व या संदर्भाने इतर काही पुरक उपक्रम घ्यावेत.

*4)* सोबत दिलेल्या माहिती पुस्तिकेच्या पान क्र.V वरील मुद्दा क्र. 3 ( i ते xii ) नुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेत राबवलेल्या दैनंदिन कार्यक्रम व उपक्रमांचे videos, photoes “Bhasha sangam youtube channel” वर दररोज सायंकाळी 5 वाजेपर्यंत अपलोड करावेत.
*5)* या उपक्रमासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्राचार्य DIECPD यांनी काम पहातील.
जिल्हा नोडल अधिकारी यांनी वरील माहितीचे दिनांकनिहाय संकलन करून या कार्यालयाच्या  marathilangdept@maa.ac.in  या इमेलवर दररोज  पाठवावी.
*6)* क्षेत्रीय स्तरावर कार्यरत सर्व अधिकाऱ्यांनी “भाषा संगम” कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने शाळाभेटी कराव्यात.
*अधिक माहितीसाठी उपक्रमाचे राज्य संपर्क अधिकारी डॉ.जगराम भटकर (उपसंचालक भाषा विभाग) (९४२३७२८४८६) यांच्याशी संपर्क करावा.*
  
*(विद्या प्राधिकरण ) पुणे*

Wednesday 14 November 2018

अंतरजिल्हा बदली 2018-19

*आंतर जिल्हा बदली फॉर्म भरणे अंतिम मुदतवाढ*
*दिनांक 20/11/2018 दुपारी 5 वाजेपर्यंत*

****************************************
आंतर जिल्हा बदली संदर्भाने*
--------------------
*Verify tab active*
आतापर्यंत ज्या बांधवांनी आंतर जिल्हा बदलीमध्ये फॉर्म भरलेले असुन draft मध्ये save केले होते.ते आता आपला फॉर्म verify करु शकतील.कारण verify tab active झालेला आहे.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की एकदा verify केलेला फॉर्म कोणत्याही परीस्थितीत delete किंवा change करु शकत नाही.
महत्त्वाचे म्हणजे *आंतरजिल्हा बदलीचा  फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत   सोडवण्यात आला आहे.*

*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे
*************-******
*अंतरजिल्हा बदली विशेष*
*(एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात )*

*अंतरजिल्हा बदलीचा  फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत   सोडवण्यात आला आहे.*

*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे.*

Monday 5 November 2018

Online service book

सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक)ऑनलाईन संदर्भात खालील महत्वाची माहिती

♐सर्व्हिस बुक मध्ये ऑनलाईन ची घाई ,अथवा गडबड करू नये  आपल्या सर्विसबूक मध्ये सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करूनच किंवा आपल्या पंचायत समितीमधील तज्ज्ञांच्या माहितीनुसार(ट्रेंन तज्ञ) माहिती तपासून घ्यावी
♐ ऑनलाईन सर्व्हिसबुक  सर्व्हिस बुक अपडेट करने शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेनन *त्यांचा अात्माच....!*

त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे

♐ स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक अाहे.

♐याबाबत चा त्रास मग जेव्हा सेवा निव्रुत्ति जवळ येते त्यावेळेस जाणवतो.

♐त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.


*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇
१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*.
गटविम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात...

१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे .

२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.

३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणित झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.

४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे.

५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.

६.गटविमा नोंदिवर गशिअ/
    मुअ यांची स्वाक्षरी नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे सेवानिव्रुत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना   वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या   नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.

*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे *कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी*.

*कर्मचा-याची बदली झाल्यानंतर  त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद अादेश क्रमांकासह व दिनांकासह  सेवापुस्तिकेत असणे अावश्यक आहे.*

सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.

१. कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद  सेवापुस्तिकेत नसणे.

२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.

३.  नोंद घेतलेली असते पन त्यावर गशिअ  ची स्वाक्षरी नसणे.

४.कधि कधि कार्यमुक्ती ची नोंद असते पन उपस्थितिची नोंद नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  बदली झालेल्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिव्रुत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवुन प्रस्ताव परत केला जातो.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलिच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.

       

*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे

*वारसाबाबत   नामनिर्देशन*.

*अाजच्या बेभरवशाच्या  काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्या मुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर  सेवापुस्तिकेत  नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढिल मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद  असणे अावश्यक आहे.*

*अापण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास सहा महिण्यानंतर  ते बदलू शकतो*

*सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.*

१. नामनिर्देशाना ची नोंद 
     सेवापुस्तिकेत नसणे.

२.  चार प्रकारच्या
       नामनिर्देशन
      नोंदी पुर्णनोंद नसणे.

३.  नोंद घेतलेली असते पन
      त्यावर गशिअ  / मुअची
      स्वाक्षरी नसणे.

४.सुरुवातिला केलेल्या
   नामनिर्देशनात कालांतराने
  वारसाच्या नावात बदल
  अथवा वारसात बदल
   झाला असेल तर त्याबाबत
   नोंद अद्यावयत नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशना बाबतच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*

 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर अाढळणा-या काही त्रुटी.....!* 👇👇

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे

*मुळवेतन व ग्रेड पे बाबत नोंदी*.

*आजही एखाद्या        कर्मचा-याला त्याचे मूळवेतन विचारले तर ते सांगतांना गोंधळ दिसुन येतो एकतर तो वेतनबँड सांगतो किंवा मुळवेतनासह पुन्हा ग्रेड पे सांगतो*

याबाबत दोन संकल्पना आजही स्पष्ट होणे गरजेचे आहे.

*पेबँड म्हणजे अापली वेतनश्रेणी व ग्रेड पे*

*बँडपे म्हणजे वेतनश्रेणीतील मूळवेतन + ग्रेड पे.*

*सहाव्या वेतन अायोगा मध्ये ग्रेड पे ही नविन संकल्पना असल्यामुळे याबाबत वेतनवाढिच्या व मुळवेतनाच्या नोंदी करताना ब-याचदा गोंधळ दिसुन येतो. उदा.एखाद्या कर्मचा-याचे वेतनबँड ५२००-२०२०० मधे मूळवेतन ८९००+२८०० एकूण  ११७०० असेल तर ब-याचदा नोंद करताना ११७००+२८०० अशी नोंद केल्या जाते. त्यामुळे पुढिल वर्षाची वेतनवाढ देताना चूक होवु शकते. त्यामुळे मुळवेतन व ग्रेडपे स्वतंत्रपणे दर्शविणे आवश्यक अाहे*

*अजुन एक महत्वाची बाब म्हणजे कर्मचा-याच्या मूळवेतनात कोणत्याही कारणामुळे बदल झाला असेल तर त्याची सविस्तर नोंद वेतननिश्चिति करुन सेवापुस्तकेत असणे आवश्यक आहे*

*जुलै-२०१४ मधे प्रा.पदवीधर वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचे....!*👇

*जुलै-२०१४ मधे मोठ्या प्रमाणावर प्रा.शिक्षकांना पदवीधर प्रा.शिक्षकाची वेतनश्रेणी देण्यात आली.*

*त्या नंतर दि.२१/११/२०१६ च्या आदेशाने ती रद्द करण्यात आली.*

*मा.हायकोर्टाने दिलेल्या दि.२०/२/१८ च्या आदेशानुसार  दि.२१/११/२०१६ चे वेतनश्रेणी रद्द करणेबाबत चा आदेश  रद्द केल्यामुळे . मा.मुकाअ जि प अो्ैबाद यांनी  दि.१५/५/२०१८ ला वेतनश्रेणी  पुन्हा लागु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात अाले*.

*यामूळे संबंधित पदवीधर प्रा.शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत तीन प्रकारच्या वेतननिश्चिति नोंद असणे आवश्यक अाहे.*

१. जुलै-२०१४ च्या आदेशाने पहिली वेतन निश्चिति.

२. दि.२१/११/२०१६ च्या आदेशाने  वेतनश्रेणी रद्द बाबत वेतननिश्चिती.

३. मा.मुकाअ यांच्या आदेशानुसार पुन्हा वेतनश्रेणी लागु करण्याबाबत वेतननिश्चिती.

*पदविधर वेतनश्रेणी रद्द झाल्यानंतर काही शिक्षकांची वेतनश्रेणी मासिक बिलात रद्द झाली परंतू सेवापुस्तिकेत त्याबाबत वेतननिश्चिती करुन रद्द केल्याचे आढळुन येत नाही*

*ज्या शिक्षकांनी १५/५/१८ पर्यंत  पदवीधर वेतनश्रेणीची वेतननिश्चिति केली नसेल तर त्यांनी फक्त जुलै १४ च्या आदेशानुसार एकदाच वेतननिश्चिती करावी.*

*त्यामुळे कर्मचा-याने आपल्या मूळवेतना बाबतच्या सर्व  नोंदी अचुक आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*

*पुढे येणा-या काही महिण्यात  कर्मचा-यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी  होणार अाहे ....!*

        👇
*१. सातवा वेतन अायोग.*

येत्या काही महिण्यात सर्वांना बहुप्रतिक्षित असा सातवा वेतन आयोग लागु होणार असल्यामुळे जर मुळवेतना बाबतच्या काही त्रुटी असतिल तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.
त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.

*अागामी वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचुक होण्यासाठी वेतनाबाबत च्या त्रुटी काळजीपुर्वक वरिष्ठ कार्यालयाकडुन पुर्ण करुण घेणे आवश्यक अाहे .*

*त्यासाठी महत्वाचे म्हणजे*
*जि.प.च्या वित्त विभागाकडुन सेवापुस्तिकेची अाज पर्यंत मिळालेल्या *सर्व वेतन अायोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे.वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.*

*वरिल सर्व बाबिंची पडताळणी झालेली असेल अाणि पडताळणीत जि.प.लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व अाक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच*

*२.सर्व्हिस बुक online*

सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.

परीणामी  कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.

*यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळिच दुरुस्त होणे गरजेचे अाहे.*

* सेवापुस्तिका कार्यालयात जमा करण्यापुर्वी..

१. मूळ सेवा पुस्तिकेत
   कार्यमुक्तिबाबत सविस्तर 
     नोंद व
     मा.गशिअ यांची स्वाक्षरी
     असल्याबाबत खात्री
       करणे.

२. यापूर्वि  केलेल्या नोंदींवर
    मा.गशिअ यांची स्वाक्षरी
        असल्या बाबत खात्री 
        करणे.
     उदा. गटविमा नोंद
            नामनिर्देशन नोंद
            रजा मंजुरि नोंद
             प्रशिक्षण नोंद
             जादा अदाई वसुलि.
           स्थायित्वा बाबत नोंद
      मराठि/हिंदी परीक्षा सुट.

३. कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
     रजेचा हिशोब पुर्ण   
   असल्याबाबत खात्री करा .

४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
     सेवा पडताळणी बाबत
     नोंद असल्याची खात्री
      करा .

५. ज्या शाळेवर उपस्थित झाले त्या बाबत अादेश क्रमांका सहित सविस्तर उपस्थिति बाबत नोंद मूळ सेवा पुस्तिकेत करवून घ्या.

६. L.P.C. वर स्वता:चा
    शालार्थ ID असल्याबाबत
    खात्री करा.

*७.अत्यंत महत्वाचे*
   *माहे फेब्रु..२०१८ च्या
   वेतनातुन वै.अपघात विमा
   वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.*

८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.
उदा.   Mscit रिकव्हरी
         5.5.10 नुसार रिकव्ह
          गटविमा फरक.इ.

*चट्टोपाध्याय अायोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ??*

*साधारण पणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. अाणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटि पुर्ण केल्या नंतरच ..*

*मागच्या वर्षी   शासनाने काढलेल्या २३ अाक्टो २०१७  मधील चट्टोपाध्यायच्या  सुधारीत जी.आर. मधील नियम व अटी बघितल्या तर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा  निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही.*

*विशेष करुन संभ्रम पडतो  तो  निवडश्रेणी बाबत.*

*उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्या तरच.*

*परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी  ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.*

*याचे कारण असे की , ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी अाहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० अाहे.*

*वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो की,  मी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा  माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून  मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत  झाली .मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ????*

*तर वरिल प्रश्नाचे उत्तर  राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही*

*याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचा-याला दोनदा चट्टो.वरिष्ठश्रेणी देता येत नाही.*

*प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० अाहे.*

*अाणि  प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक  शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००*
*असल्यामुळे वरिल प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित नियमानुसार तरी कोणतिही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.*

माहितिस्तव 👇👇

**********************       *प्राथमिक शिक्षक*

*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -२८००*

*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे  ४२००*

*निवडश्रेणी ग्रेडपे ४३००*

********************

*प्रा.प.शि./ मुअ/माध्य.शिक्षक*

*मुळवेतन श्रेणी*
*ग्रेड पे -४३००*

*वरिष्ठश्रेणी.ग्रेडपे  ४४००*
V
*निवडश्रेणी ग्रेडपे ४८००*

*ही माहिती तज्ञ यांच्याकडून घेतलेली असून यापेक्षाही काही अपडेट राहिले असल्यास खात्री करून घ्या.

Sunday 4 November 2018

आंतरजिल्हा बदल्या-2018* 🔥 🍁 *बदली विशेष-मोबाईल OTP*

**अंतरजिल्हा बदली विशेष*
*(एका जिल्ह्यातुन दुसर्या जिल्ह्यात )*

*अंतरजिल्हा बदलीचा  फॉर्म भरतांना otp येऊन error येत असल्याबाबतचा प्रॉब्लेम NIC मार्फत   सोडवण्यात आला आहे.*

*आता otp येऊन फॉर्म सबमिट होत आहे.*
***-****************************************
🔴 *आ‌ं.जि.ब. verify tab active झाले आहे.( WITH  OTP)* 💐👍👍🔴


***************************************
🔥 *आंतरजिल्हा बदल्या-2018* 🔥

🍁 *बदली विशेष-मोबाईल OTP* 🍁

          आंतरजिल्हा बदल्या-2018 अर्थात 3 रा टप्पा सुरु झालेला आहे. *दि.02.11.208 ते दि.15.2018*  या कालावधीत बदली इच्छुक शिक्षकांना बदली फॉर्म भरता येतील.
           *'Online बदली प्रक्रियेत बदली फॉर्म भरला नसताना बदली झाली,आमच्या परस्पर अन्य कुणीतरी आमचा बदली फॉर्म भरला'* अशा प्रकारच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या.
           असा प्रकार घडू नये यासाठी Online बदली प्रकियेत या टप्प्यापासून *महत्वपूर्ण* बदल करण्यात आला आहे.
            बदली अर्ज भरताना आता शिक्षकांना आपला *मोबाईल क्रमांक* नोंदवावा लागणार आहे.अर्ज Save करुन ज्यावेळी *Verification* करावयाचे आहे,त्यावेळी System कडून नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर *OTP* येईल.तो *OTP* नोंदवल्यानंतरच बदली अर्ज *VERIFY* होईल.बदली अर्जाच्या *Print* मध्येही नोंदवलेला मोबाईल क्रमांक येणार आहे.त्यामुळे परस्पर अर्ज भरला किंवा अर्ज भरला नसताना बदली झाली अशा तक्रारी होणार नाहीत.
         *एप्रिल 2019 मध्ये सुरु होणाऱ्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतही मोबाईल OTP चा वापर होणार आहे.*
           बदली प्रक्रियेत दुसरा आणखी एक *महत्वपूर्ण* बदल करण्यात आला आहे.यानुसार एकदा Save केलेला अर्ज *Delete* केला तर तो शिक्षक चालू बदली प्रक्रियेत *पुन्हा अर्ज करु शकणार नाही.* सदरहू शिक्षकाचे नाव *Transfer Portal* मध्ये चालू प्रक्रियेत पुन्हा दिसणार नाही.
          सध्या फक्त *Application* ही tab उपलब्ध असून *Verification* ही tab अजून आलेली नाही.